जागतिक दिवस
----
ठळक घटना, घडामोडी
१९९५ - पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
१९९५ - गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
१९४४ - दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.
१८३९ - बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना
जयंती/जन्मदिवस
१९८६ - सुरेश रैना – क्रिकेटपटू
१९४० - ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
१९१५ - दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे.
१९०७ - हरिवंशराय बच्चणन – हिन्दी कवी
१८८१ - डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
१८७४ - चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
१८७० - दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
१८५७ - सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ
No comments:
Post a Comment