चालू घडामोडी 26 नोव्हेंबर 2017
लोकसत्ता,
सकाळ,
महाराष्ट्र टाईम्स,
तरुण भारत
अन्नसुरक्षा योजना होणार बंद?
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये योजनेचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, टप्प्याटप्प्यांने योजना बंद करण्याचे संकेत अन्न व पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) दिले.
दुष्काळामुळे उपासमार होऊ नये म्हणून राज्य शासनाने ऑक्टोबर २०१५पासून मराठवाडा; तसेच विदर्भातील १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली होती, मात्र गेल्या दोन वर्षांत मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुष्काळी स्थिती नाही यामुळे या योजनेचा शासनाकडून आढावा घेणे सुरू झाले असून, टप्प्याटप्प्यांने त्या योजनेतील धान्यवितरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात ३६ लाख ६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ऑक्टोबर २०१५पासून प्रत्येक महिन्यात शासनाकडून पुरवण्यात आलेले सुमोर ८५ ते ९० टक्के धान्याची उचल शेतकरी करतात, मात्र आता सरकारला दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यासारखे वाटू लागले असल्याने योजनेच्या पारदर्शकतेचा आढावा घेण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता कमी झाली असली तरी शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाण कायम आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जालना जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली असून, उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळ सपंल्यानंतर ही योजना बंद करण्याबाबत मागील काही महिन्यांपासून शासनाकडे विचार सुरू होता.
काय आहे योजना...?
दुष्काळामुळे राज्य सरकारने ऑक्टोबर २०१५मध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू केली. त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येतो. या योजनेत दरमहा मराठवाड्यात दहा हजार ८१८ टन गहू आणि सात हजार २१२ टन तांदूळ वितरित करण्यात येतो.
आता दुष्काळाची तीव्रता कमी झाली आहे. या योजनेंतर्गत धान्य वितरण चालू ठेवावे की नाही, याचा आढावा घेतला जाईल. लगेच धान्यपुरवठा बंद केला जाणार नाही, मात्र पुरवठ्याची गरज आहे की नाही, हे आढावा घेतल्यानंतर समोर येईल.
- गिरीष बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री
जिल्हानिहाय लाभार्थी
औरंगाबाद ः ५६७००७
जालना ः २४९३८१
परभणी ः ३६५६९८
हिंगोली ः २१३६९१
बीड ः ६६६३९९
नांदेड ः ६८७९९१
लातूर ः ३८२४४०
उस्मानाबाद ः ४७३६५८
एकूण ः ३६०६२६५
No comments:
Post a Comment