Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, November 27, 2017

    अँडर्स सेल्सियस

    Views
    अँडर्स सेल्सियस

    एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ

    जन्मदिन - २७ नोव्हेंबर १७०१

    अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.
    स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.
    या काळातच त्यांनी जर्मन, ब्रिटन, फ्रान्स व इटली येथील वेधशाळांना भेटी दिल्या होत्या. १७४० मध्ये त्यांनी अप्साला वेधशाळा उभारली व ते त्या वेधशाळेचे संचालक झाले. त्यांनी व इतरांनी १७१६–३२ या काळात न्यूरेंबर्ग येथे उत्तर ध्रुवीय प्रकाशाचे ( ऑरोरा बोरिअ‍ॅलिसचे) ३१६ वेध घेतले होते. त्यांनी १७३३ मध्ये प्रसिद्ध केले. मध्यान्हवृत्ताचा चाप मोजण्याचा त्यांनी पुरस्कार केला होता व यासाठी संघटित केलेल्या मोहिमेत त्यांनी भाग घेतला होता. या मोहिमेमुळे पृथ्वी ध्रुवांपाशी काहीशी चपटी आहे, या न्यूटन यांच्या उपपत्तीची खात्री पटली. स्वीडीश अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेसपुढे सादर केलेल्या संशोधनपर लेखात त्यांनी तापमापकाचे वर्णन केले होते (१७४२) घ्ए डिसर्टेशन ऑन न्यू मेथड ऑफ डिटरमिनिंग द डिस्टन्स ऑफ द सन फ्रॉम द अर्थङ (१७३०) आणि घ्डिस्क्विझीशन ऑन ऑब्झर्व्हेशन्स मेड इन फ्रान्स फॉर डिटरमिनिंग द शेप ऑफ द अर्थङ (१७३८) या इंग्रजी शीर्षकार्थांनी लिहिलेले त्यांचे लेखही मोलाचे आहेत. त्यांचे काही महत्त्वाचे लेख स्वीडिश अ‍ॅकॅडेमीच्या इतिवृत्तात प्रसिध्द झाले होते. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते.

    सेल्सिअस यांच्या नावे प्रसिध्द असलेला तापक्रम हा पाण्याचा गोठणबिंदू ०° आणि उकळबिंदू १०० असतो, या गृहितांवर आधारलेला आहे. या दोन निर्धारित बिंदूंच्या दरम्यान १०० अंशांचे अंतर असल्याने या तापक्रमाला कधीकधी सेंटिग्रेड ( शतमान) तापक्रम म्हणतात. हा तापक्रम जेथे मेट्रिक (दशमान) एकके स्वीकारण्यात आली आहेत. तेथे सर्वसाधारणपणे वापरतात, तसेच वैज्ञानिक कामांत हा तापक्रम सर्वत्र वापरला जातो. अप्साला येथे सेल्सिअस यांचे निधन झाले.

    No comments:

    Post a Comment