🔹व्हीनस फ्लायट्रॅप
व्हीनस फ्लायट्रॅप (मक्षिका-पंजर)
(शब्दशः अर्थ : ‘व्हीनसचे कीटक जाळे’)
व्हिडीओ पाहा
ही एक मांसाहारी वनस्पती आहे. ही वनस्पती प्राण्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ‘पचवते’. हिच्या भक्ष्यांमध्ये मुख्यत: उडणाऱ्या व अष्टभुज कीटकांचा समावेश असतो.
महान जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने अशा वनस्पतींबद्दल ‘इन्सेक्टिव्होरस प्लॅन्ट्स’(कीटकभक्षक वनस्पती) हे पुस्तक लिहिले. अशा वनस्पतींसाठी पहिल्यांदाच ही संज्ञा वापरली गेली.
ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणार्या काही वनस्पती कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजन ची गरज भागवतात. अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते.
No comments:
Post a Comment