Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, September 26, 2017

    ‘सहज बिजली हर घर’ सौभाग्य योजनेची घोषणा

    Views

    ‘सहज बिजली हर घर’ सौभाग्य योजनेची घोषणा


    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांसाठी ‘सहज बिजली हर घर’ सौभाग्य योजनेची घोषणा केली असून या योजनेच्या माध्यमातून देेशातील सर्व कुटुंबांपर्यंत वीज पोहोचवण्यात येणार आहे. या योजनेप्रमाणे गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येणार असून त्यासाठी 16320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

    👉  2011 च्या जनगणनेच्या आधारे मिळेल वीज कनेक्शन

    सौभाग्य योजनेत 2011 च्या सामाजिक आर्थिक आणि जातवार जनगणनेत नोंदणी असलेल्या गरिबांना मोफत वीज कनेक्शन मिळेल. जनगणनेत नावे नसलेल्यांना जोडणीसाठी 500 रुपयेच द्यावे लागतील. ते बिलातच 10 महिन्यांत घेतले जातील. घरात एक एलईडी बल्ब व मोबाइल चार्जरसाठी कनेक्शन मिळेल.


    👉  योजनेंतर्गत काय-काय मिळेल?

    या योजनेंतर्गत एक LED लाइट, एक चार्जिंग पाँइट. एक स्मार्ट मीटर. हे एक प्री-पेड कनेक्शन असणार आहे. म्हणजे मोबाइल, डीटीएच कनेक्शन प्रमाणे वीज कनेक्शनही मोबाइलवर रिचार्ज करता येईल. हे रिचार्ज भीम (BHIM) अॅपवर करता येईल.

    👉  काय आहे योजनेचा उद्देश?

    सौभाग्य योजनेबद्दल सरकारने सांगितल्यानुसार, प्रत्येक घरात वीजेचे कनेक्शन आल्यानंतर रॉकेलचा वापर कमी होईल. ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य यामध्ये सुधारणा होईल. महिलांचा मोठा त्रास कमी होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याशिवाय प्रत्येक घरात रोडिओ, टीव्ही, मोबाइल कनेक्टिव्हिटी वाढेल. यामुळे अर्थव्यवस्था वाढेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

    👉 गावांसाठी 14 हजार कोटी रुपयांचे बजेट

    केंद्राने योजनेसाठी 16320 काेटींचे बजेट ठेवले आहे. सरकारी मदत म्हणून 12320 कोटी रुपये दिले जातील. ग्रामीण घरांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी 14025 कोटी व शहरी घरांसाठी 1732.50 कोटी खर्च होतील.

    No comments:

    Post a Comment