कोण आहेत रोहिंग्या मुसलमान...??
हे सांगितले जाते की जगात रोहिंग्या मुसलमानअसे अल्पसंख्याक समुदाय आहे ज्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रमाणात अत्याचार होत आहे.
नेमके रोहिंग्या कोण आहेत? यांच्यापासून म्यांमार ला काय अडचण आहे?ते बांग्लादेशला का पडून जात आहे? यांना आत्तापर्यंत नागिरीकत्व का मिळाले
नाही ?आंग सान सू ची जगात मानवाधिकाराच्या चैंपियन म्हणून ओळखली जाते मग ते असतांना त्याच्यावर इतके अत्याचार का होत आहे?
जाणून घ्या सर्व काही-
रोहिंग्या कोण आहेत?
म्यांमार मध्ये बहुसंख्य लोक बौद्ध आहे. एका सर्वेक्षणानुसार १० लाख रोहिंग्या मुसलमान आहे.या मुसलमानांच्या बाबत सांगितले जाते की मुख्य स्वरूपात ते अवैध बांग्लादेशी प्रवाशी आहे. सरकारने त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला आहे.करी हे म्यांमार मध्ये अनेक वर्षांपासून राहत होते.रखाईन स्टेट मध्ये २०१२ पासून सांप्रदायिक हिंसा सुरू आहे. यामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमवला तर १ लाखापेक्षा जास्त लोकांनी विस्थापन केले.
रोहिंग्या मुसलमान आज पण मोठ्या संख्येने कॅम्प मध्ये राहत आहे. रोहिंग्या मुसलमानांना मोठ्या प्रमाणात भेदभाव व वाईट वागणूक सहन करावी लागत आहे. लाखोच्या संख्येने कोणतेही कागदपत्रे नसून ते बांगलादेशात राहत आहेत. त्यांनी शंभर वर्षे अगोदर म्यांमार छोडून दिले होते.
नेमके रखाईन राज्यात काय होत आहे?
म्यांमारच्या मौंगडोव सीमा वर ९ पुलीस अधिकारिंना मारून टाकले, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मागच्या महिन्यात रखाईन स्टेट मध्ये सुरक्षा दलाने ऑपरेशन सुरू केले होते. सरकारच्या काही अधिकारींनी दावा केला की हे
हल्ले रोहिंग्या समाजाच्या लोकांनी केले होते. याच्या नंतर सुरक्षा दलाने मौंगडोव जिल्याच्या सीमा पूर्ण पणे बंद करून दिल्या आणि एक व्यापक ऑपरेशन सुरू केले.
का या सर्व गोष्टीवर म्यांमार सरकार दोषी आहे ?
म्यांमार मध्ये २५ वर्षा नंतर मतदान झाले होते. त्यात नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू ची ची पार्टी नेशनल लीग फोर डेमोक्रेसीला मोठ्या मतांनी विजय मिळाला. पण संवैधानिक नियमांमुळे मतदान जिंकून देखील त्या राष्ट्रपती बनू शकल्या नाही. सू ची स्टेट काउंसलरच्या पदावर आहे. तरी पण असे सांगितले जाते की पूर्ण कमान सू ची यांच्याच हातात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सू ची निशाण्यावर आहेत. त्याच्यावर आरोप आहेत की मानवाधिकारची चैंपियन असून सुद्धा ते शांत का आहे. सरकारला प्रश्न विचारले जात आहे की रखाईन मध्ये पत्रकारांना का जाऊ दिले जात नाही. राष्ट्रपती चे प्रवक्ता झाव हती ने असे म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर या सर्व गोष्टीची चुकीची माहिती रिपोर्टिंग केली जात आहे.
काय करत आहे आंग सान सू ची?
आंग सान सू ची आपल्या देशाची सद्याची नेता आहे. जरी देशाची सुरक्षा आर्म्ड फोर्सेजच्या हातात आहे. जर सू ची अंतराष्ट्रीय दवाबाने रखाईन स्टेट संबंधी विश्वसनीय तपास करेल तर त्यांना आर्मी विरुद्ध काम करण्याचा जोखीम उचलावी लागेल. त्यामुळे त्यांची सरकार अडचणीत सापडेल.
मागच्या ६आडवळ्यात आंग सान सू ची पूर्ण पणे शांत आहे.ते या गोष्टीवर पत्रकारांशी सुद्धा काहीच बोलल्या नाही.जेव्हा या गोष्टीवर त्यांच्यावर दबाव आणला तेव्हा त्यांनी सांगितले होते की, रखाईन स्टेट मध्ये जे होत आहे ते ' रुल ऑफ लॉ 'च्या नुसार होत आहे. या गोष्टीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप बोलले जात आहे.म्यांमारमध्ये रोहिंग्याच्या विरुद्ध आर्मी जे कार्य करीत आहे त्याला म्यांमारचे लोक मोठ्या प्रमाणात समर्थन करत आहेत.
आंग सान सू ची |
बांग्लादेशला आपत्ती
बांग्लादेशचे विदेश मंत्रालयांनी बुधवारला म्यांमारच्या राजदूतशी या गोष्टीवर मोठी चिंता व्यक्त केली. बांगलादेश ने सांगितले की चिंतातूर लोक सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाण शोधत येत आहे.
बांग्लादेश ने सांगितले की सीमेवर अनुशासनाचे पालन झाले पाहिजे.बांग्लादेश अथॉरिटी नुसार सीमा ओलांडून येणाऱ्यांना म्यांमारला परत पाठवले जात आहे.एमनेस्टी इंटरनेशनल ने यावर निंदा व्यक्त करत सांगितले की हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे.
बांग्लादेश रोहिंग्या मुसलमानांना शरणार्थीच्या स्वरूपात स्वीकार करत नाही. रोहिंग्या आणि शरण पाहिजे असे लोक १९७० पासून
म्यांमारहुन बांग्लादेशला येत आहे.
सैटलाइट फोटो |
या आठवड्याच्या सुरुवातील ह्यूमन राइट्स वॉच ने एक सैटलाइट फोटो जारी केली होती. याच्यात दाखवले गेले आहे की मागच्या ६ आठवड्यात रोहिंग्या मुसलमानाच्या १२०० घरांना नष्ट करण्यात आले.
आजच्या माहितीनुसार बांग्लादेशने रोहिंग्या मुसलमानांसाठी दार उघडे केले
No comments:
Post a Comment