Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, September 17, 2017

    तब्बल ५६ वर्षे रेंगाळलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण होणार

    Views
    तब्बल ५६ वर्षे रेंगाळलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण होणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले होते. सरदार सरोवर प्रकल्प हे जगातील दुसरे सर्वात मोठे धरण ठरणार आहे.
    ५६ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सरदार सरोवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर विस्थापीतांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला. प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे हक्क व मागण्यांसाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले ‘नर्मदा बचाव आंदोलन’ देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या आंदोलनाची व्याप्ती भारतापुरती मर्यादित राहिली नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या आंदोलनाची दखल घेतली गेली. शेवटी जागतिक बँकेने सरदार सरोवर प्रकल्पाचा निधी परत घेतला होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पाचे लोकापर्ण होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना सरदार सरोवर प्रकल्पातून फायदा होणार आहे.
    सरदार सरोवर प्रकल्पाची उंची १२१.९२ मीटरवरुन १३८ मीटरपर्यंत वाढण्यात आली आहे. उंची वाढवल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आता या धरणात ४.७३ दशलक्ष घटनमीटरपर्यंत पाणी साठवता येणार आहे. या धरणामुळे सुमारे १० लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार असून कोट्यवधी लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या एकूण वीजनिर्मितीपैकी सुमारे ५६ टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशमधील बरवानी येथे शनिवारी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले.

    No comments:

    Post a Comment