Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, September 29, 2017

    चालू घडामोडी 29 सप्टेंबर 2017 [text]

    Views

    🔹राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे वितरण

    राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 27 सप्टेंबरला ‘जागतिक पर्यटन दिवस’ च्या निमित्ताने संस्‍कृती मंत्रालयाच्या वतीने प्रवास, पर्यटन आणि आतिथ्‍य उद्योगाच्या विविध श्रेणींमध्ये ‘राष्‍ट्रीय पर्यटन पुरस्‍कार 2015-16’ चे वितरण करण्यात आले.

    श्रेणी - पुरस्‍कार प्राप्तकर्ते यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -

    ▪️हॉल ऑफ फेम पुरस्‍कार:

    पर्यटनाच्या व्‍यापक विकासासाठी सर्वश्रेष्‍ठ राज्‍य – गुजरात, मध्यप्रदेश
    सर्वेश्रेष्‍ठ स्थानिक टूर ऑपरेटर - मॅसर्स हीट ट्रॅवल्‍स अँड टूर्स इंडिया प्रायवेट लिमिटेड, सिलिगुडी
    सर्वश्रेष्‍ठ पर्यटक गाइड – के. काशीनाथ राव (तेलंगणा); रमा खांडवाला (मुंबई)
    सर्वश्रेष्‍ठ वन्‍यजीव गाइड - सईब खान (सातपुडा राष्‍ट्रीय उद्यान, पचमढी, मध्‍यप्रदेश)

    ▪️प्रचार व प्रोत्‍साहन यासाठी पुरस्‍कार:

    इंग्रजीमध्ये उत्‍कृष्‍ट प्रकाशन - मध्‍यप्रदेश पर्यटन (पुस्‍तक ’द हार्ट ऑफ इंक्रेडिबल इंडिया’)
    हिन्‍दीमध्ये उत्‍कृष्‍ट प्रकाशन - मध्‍यप्रदेश पर्यटन (सिंहस्‍थ 2016 विवरणिका)
    अन्‍य विदेशी भाषेत उत्‍कृष्‍ट प्रकाशन - केरळचे पर्यटन विभाग (स्‍पेनिश); तेलंगणाचे पर्यटन विभाग (मेंडरिन)

    ▪️सर्वश्रेष्‍ठ स्वयंपाकी (शेफ):

    पुरुष - अरविंद राय (द अशोक होटल, नवी दिल्‍ली)
    महिला - मधुमिता महंता (द ललित ग्रेट इस्‍टर्न, कोलकाता)

    ▪️अन्य:

    सर्वश्रेष्‍ठ फिल्‍म प्रोत्‍साहन अनुकूल राज्‍य – मध्यप्रदेश
    रोमांचक पर्यटनासाठी सर्वश्रेष्‍ठ राज्‍य – मध्यप्रदेश
    सर्वश्रेष्‍ठ वारसा यात्रा - इंडिया सिटी वॉक्‍स द्वारा लीडिंग फ्रॉम द फ्रंट : बीईंग गांधी – गांधी यात्रा
    स्वच्छता पुरस्‍कार - तेलंगणा राज्य शासन
    सर्वश्रेष्‍ठ पर्यटन फिल्‍म - ‘विजिट मैसूरू’ (मॅसर्स सेफ वील्ज टूर अँड ट्रॅवल्स, मैसूरू)

    पर्यटनाच्या व्‍यापक विकासासाठी सर्वश्रेष्‍ठ राज्‍य/केंद्रशासित प्रदेश - आंध्र प्रदेश (पहिला), राजस्‍थान (दूसरा), केरळ आणि गोवा (संयुक्त - तिसरा)
    याप्रसंगी ‘अतुल्‍य भारत 2.0 अभियान : एक वारसा जपा’ प्रकल्प आणि ‘अतुल्‍य भारत’ च्या नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

    🔹अपंग सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जम्मू-काश्मीर शासनाची योजना

    स्वयं-रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज प्रदान करून अपंग सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी जम्मू व काश्मीर शासनाने एक योजना सुरू केली आहे. योजनेनुसार, कायम रहिवासी असलेल्या 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या सैनिकाला किंवा त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांपर्यंत 4-7% इतक्या वार्षिक व्याजदराने कर्ज प्रदान केले जाणार. ही योजना राष्ट्रीय अपंगत्व वित्त व विकास महामंडळ (NHFDC) यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आली आहे.

    🔹केंद्र शासनांतर्गत चिकित्सकांचे सेवानिवृत्ती वय 65 वर्षापर्यंत वाढवले

    AYUSH मंत्रालय आणि रेल्वे अंतर्गत कार्यरत चिकित्सकांच्या (doctor) समावेशासह केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्य करणार्‍या चिकित्सकांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्य करणार्‍या चिकित्सकांमध्ये AYUSH मंत्रालय, संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग (भारतीय ऑर्डिनेंस फॅक्टरी), आरोग्य आणि रेल्वे मंत्रालयाअंतर्गत दंत चिकित्सक तसेच आणि उच्च शिक्षण विभागाच्या उच्च शिक्षण आणि तांत्रिक संस्थांमधील चिकित्सकांचा समावेश आहे. निर्णयानुसार चिकित्सक वयाच्या 62 वर्षांपर्यंत प्रशासकीय पद धारण करणार आणि त्यानंतर ते गैर-प्रशासकीय पदांवर काम करतील. केंद्र शासनाच्या विविध मंत्रालये व विभागांतर्गत असलेल्या सुमारे 1445 डॉक्टरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

    🔹‘पंडित दीनदयाल उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल प्रकल्प’ चा शुभारंभ

    भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने आता ग्रामीण भारतामध्ये विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी प्रथमच ‘पंडित दीनदयाल उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल प्रकल्प’ नावाने एक नवा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भूविज्ञान आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते 22 सप्टेंबर 2017 रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल प्रकल्प’ चा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत उत्‍तराखंडमध्ये समूह पद्धतीच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी योग्य विज्ञान व तंत्रज्ञान यासंबंधी कृतींचे आयोजन केले जाणार. उत्‍तराखंडमधील ग्रामीण गावांमधील काही समूहांना दत्तक घेऊन त्यांना तंत्रज्ञान आधारित साधनांच्या वापरामधून कालबद्धरीतीने त्यांना स्‍व-शाश्वत समूह बनविण्यासाठी सक्षम करणे, ही या कार्यक्रमाची योजना आहे. प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांच्या कालावधीत 6.3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

    ▪️कार्यक्रमाचे स्वरूप

    गैंदिखाता, बजीरा, भिगुन (गढवाल) आणि कौसानी (कुमाऊं) या गावांमधील चार समूहांची निवड केली गेली. कार्यक्रमामधून उत्‍तराखंड राज्याच्या 60 गावांच्या चार निवडलेल्या समूहांमध्ये जवळजवळ एक लाख लोकांचा प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रूपाने लाभ होणार. दुग्ध, मध, मशरूम, हर्बल टी, वन उत्पादने, फलोत्पादन आणि स्थानिक पिके, औषधी आणि सुगंधी वनस्पती आणि पारंपारिक हस्तकला आणि हातमाग या क्षेत्रात प्रक्रिया आणि मूल्यवर्धन पद्धती आणल्या जाणार.
    सोलर ड्रायिंग तंत्रज्ञानाद्वारे किवी, स्ट्रॉबेरी, चेरी, तुळसी, अद्रक, बडी इलायची तसेच कोल्ड प्रेस तंत्रज्ञानाद्वारे जर्दाळचे तेल काढणे.

    स्थानिक स्त्रोत तसेच उपलब्ध स्थानिक कौशल्य वापरले जाईल आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निवडक समुहांचे स्थानिक उत्पन्न आणि गुणवत्ता वृद्धिंगत केली जाईल. या कार्यक्रमामुळे ग्रामिणांना स्थानिक रोजगार आणि उपजीविका उपलब्ध होणार आणि अधिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल. यामुळे रोजगारासाठी गावांमधून बाहेर जाण्याची आवश्यकता निर्माण होण्यास अवरोध लागणार. पुढे या कार्यक्रमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल.

    🔹आसामध्ये SATH कार्यक्रमाचा शुभारंभ

    22 सप्टेंबर 2017 रोजी गुवाहाटीमध्ये SATH (सस्टेनेबल अॅक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल) नामक कार्यक्रमाचा शुभारंभ केला गेला. SATH कार्यक्रम हा आसाम राज्य शासन आणि NITI आयोग यांचा संयुक्त उपक्रम आहे. आसाममधील मुख्य आरोग्य समस्या ओळखणे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता उपाययोजना करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. NITI आयोगाने SATH कार्यक्रमांतर्गत आसाम, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांची निवड केली.

    🔹इराणने ‘खोरामशाहर’ नामक नवीन क्षेपणास्त्र विकसित केले

    इराणने लष्करी संरक्षणास बळकट करण्याच्या उद्देशाने ‘खोरामशाहर’ नामक नवीन क्षेपणास्त्र विकसित केले. नवे क्षेपणास्त्र 2,000 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते.

    🔹केरळचे मुख्यमंत्री करणार ieMalayalam.com च्या मोबाईल अॅपचे अनावरण

    केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या हस्ते ieMalayalam.com या इंडियन एक्स्प्रेस समूहातील वेबसाईटच्या मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. केरळमधील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस समूहाने जानेवारी महिन्यात ieMalayalam.com ही वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटला अल्पावधीतच वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.

    आता याच ieMalayalam.com वेबसाईटचे ‘मोबाईल अॅप’ सुरु करण्यात येणार आहे. हे अॅप iOS आणि अँड्रॉईडवर उलब्ध असणार आहे. हे अॅप युजर फ्रेंडली असेल. ieMalayalam.com च्या वेबसाईटवर थेट बातमीवर जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे, तसाच पर्याय अॅपमध्येही असणार आहे. या अॅपमध्ये बातमी सेव्ह करून वाचण्याचा पर्यायही वाचकांना उपलब्ध असेल.

    शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात Kerala@60 चेही अनावरण होणार आहे. यामध्ये केरळमधील ६० विचारवंतांच्या मुलाखतींचा समावेश आहे. केरळबद्दल या विचारवंताना काय वाटते, हे यातून केरळच्या जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. Kerala@60 मधील पहिल्या १२ मुलाखती या दिग्गजांच्या असणार आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन, ओमान चंडी, अभिनेते मोहनलाल, गायक के. एस. चित्रा, दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन आणि इतरांचा समावेश आहे. हे १२ व्हिडिओ शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहेत.

    🔹मार्च 2018 पर्यंत आंध्रप्रदेशाला हागणदारी मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू

    ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून आंध्रप्रदेशाला मार्च 2018 पर्यंत हागणदारी मुक्त (ODF) राज्य म्हणून घोषित करण्यात येईल, अशी आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली. ‘स्वच्छता ही सेवा’ हे भारताचे एक महत्वपूर्ण अभियान आहे, जे 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या दरम्यान चालणार आहे. स्वच्छतेविषयी साधलेले टप्पे तसेच यासंबंधी जागरूकता वाढविण्यासाठी आणि या कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वच्छतारथाचे उद्घाटन उत्तराखंड राज्यात झाले.

    🔹हिमाचल प्रदेश शासनाने पर्यटन स्थळांसाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली

    हिमाचल प्रदेश शासनाने 21 सप्टेंबर 2017 रोजी पर्यटन स्थळांसाठी आपली पहिली इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली. इलेक्ट्रिक बस सेवा मनाली आणि रोहतांग या दोन टप्प्यादरम्यान चालणार आहे आणि यासाठी 10 बस सुरू करण्यात येतील. 13,000 फूट उंचीवर ही सेवा सुरू झाल्याची पहिलीच वेळ आहे.

    🔹प्रथमच ‘AICTE-ECI छात्र विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले

    नवी दिल्लीत 19 सप्टेंबर 2017 रोजी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) आणि भारतीय अभियांत्रिकी परिषद (ECI) च्या वतीने प्रथमच ‘AICTE-ECI छात्र विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार AICTE मान्यताप्राप्त पदवी व पदविका पातळीचे शिक्षण देणार्‍या तांत्रिक संस्था/विद्यापीठांना देण्यात आले.

    ▪️पुरस्कार विजेत्या संस्था -
    संगणक शास्त्र (पदविका) - PSG पॉलीटेक्निक कॉलेज, तामिळनाडू
    विद्युत अभियांत्रिकी (पदवी) - सम्राट अशोक टेक्नॉलॉजीक इंस्टीट्यूट (पदवी), मध्य प्रदेश
    स्थापत्य अभियांत्रिकी (पदवी) - सेंट जोसेफ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
    यांत्रिक अभियांत्रिकी (पदवी) - पूर्णिमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, राजस्थान
    संगणक शास्त्र (पदवी) - सीजीसी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंजाब
    इलेक्ट्रॉनिक्स (पदवी) - स्कॉल्स स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, करुकुट्टी
    जैवतंत्रज्ञान (पदवी) - कुमारगुरु कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी

    ▪️पुरस्काराविषयी:

    AICTE-ECI छात्र विश्वकर्मा पुरस्कार हा राष्ट्राच्या वाढीसाठी आणि विकासाच्या दिशेने तंत्रज्ञान क्षेत्रात विशिष्ट विषयामध्ये महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्ती आणि संस्था/संघटना यांना दिला जाणारा पुरस्कार आहे. मान्यताप्राप्त महाविद्यालयातील पदवी व पदविका शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभिनव उपाययोजनेसाठी हा पुरस्कार दिला जात आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अभियंता; सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार; सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार या 3 श्रेणींमध्ये प्रत्येकी 3 पुरस्कार दिले जात आहे.

    🔹नवी दिल्लीत देशातल्या पहिल्या ‘पेंशन अदालत’ चे उद्घाटन

    नवी दिल्लीत 20 सप्टेंबर 2017 रोजी प्रधानमंत्री कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते देशातल्या पहिल्या ‘पेंशन अदालत’ चे उद्घाटन करण्यात आले. निवृत्तीवेतन विभागाकडून ‘पेंशन अदालत’ ची एक श्रृंखला सुरू केली जात आहे. हे व्यासपीठ निवृत्‍त कर्मचार्‍यांना एकल सुविधा प्रदान करून त्यांच्या तक्रारींचे उपशमन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे. यात संबंधित विभाग बँक तसेच केंद्रीय आरोग्य सेवा योजनाचे प्रतिनिधी यांचादेखील सहभाग असणार आहे. याप्रसंगी, ‘अनुभव’ व्यासपीठावर सर्वोत्कृष्ट योगदान देणार्‍या सेवानिवृत्‍त कर्मचार्‍यांना ‘अनुभव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. ‘अनुभव’ व्यासपीठावर सेवानिवृत्‍त कर्मचारी शासनासोबत केलेल्या कामाचा आपला अनुभव सामायिक करतात.

    🔹सलमान रश्दी लिखित ‘द गोल्डन हाऊस: ए नॉव्हेल’ पुस्तक

    सलमान रश्दी लिखित ‘द गोल्डन हाऊस: ए नॉव्हेल’ पुस्तकाचे प्रकाशन रँडम हाऊस या प्रकाशनाने केले आहे. सलमान रश्दी यांनी अनेक काल्पनिक तसेच ‘द विझार्ड ऑफ ओज’ यासारख्या अकाल्पनिक कथांचे लेखन केलेले आहे. ‘द व्हिन्टेज बुक ऑफ शॉर्ट स्टोरीज’ चे ते सह-संपादक आहेत. त्यांना 1993 साली ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या लिखाणाला बुकर पारितोषिक मिळाले.

    🔹जगात दर 10 मुला-मुलींमध्ये एक बळजबरीने कामगार बनतो: ILO

    आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (IOM) च्या भागीदारीने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि वॉक फ्री फाऊंडेशन2 या संघटनांनी केलेल्या संयुक्त संशोधनातून जगभरातील आधुनिक गुलामगिरीचे खरे प्रमाण दिसून आले आहे.

    ▪️बालमजुरी

    जगभरात 152 दशलक्ष लहान मुले-मुली (64 दशलक्ष मुली आणि 88 दशलक्ष मुले) बालमजूर आहेत आणि जगभरातील दर 10 मुला-मुलींमध्ये एक या प्रमाणात हा आकडा आहे.
    बालमजुरीमध्ये 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची सर्वाधिक संख्या आफ्रिकेत (72.1 दशलक्ष) आहे. त्यानंतर आशिया आणि प्रशांत महासागर प्रदेश (62 दशलक्ष), अमेरिका (10.7 दशलक्ष), युरोप व मध्य आशिया (5.5 दशलक्ष) आणि आखाती देश (1.2 दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो.
    बालमजुरीमध्ये अडकलेले 5 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींमधील सुमारे एक तृतीयांश शिक्षणापासून वंचित आहेत. त्यात या वयोगटातील 38% धोकादायक कामात गुंतून आहेत आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील दोन तृतीयांश आठवड्यात 43 तासांपेक्षा अधिक काम करतात.
    आधुनिक गुलामगिरी आणि बालमजुरीत गुंतलेल्या 40 दशलक्ष मुला-मुलींपैकी 70.9% प्रामुख्याने कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यानंतर सेवा क्षेत्रात 17.1% तर उद्योगात 11.9% बालमजुर काम करतात.

    ▪️आधुनिक गुलामगिरी

    अंदाजे 40 दशलक्ष मुलं-मुली आधुनिक गुलामगिरीत अडकले आहेत. त्यात सुमारे 25 दशलक्ष बळजबरीने बालमजुर बनले आहेत आणि 15 दशलक्ष मुला-मुलींचा सक्तीने विवाह लावण्यात आला आहे.
    आधुनिक गुलामगिरीत अडकल्या स्त्रिया व मुली यांची संख्या एकूण 29 दशलक्ष (किंवा एकूणच्या 71%) इतकी आहे.
    आधुनिक गुलामगिरीत अडकल्या एकूण महिलांमध्ये 99% वेश्याव्यवसायात अडकलेले आहेत तसेच 84% महिलांचा सक्तीने विवाह झालेला आहे.
    आधुनिक गुलामगिरीत दर चारमध्ये एक या प्रमाणात मुला-मुलींची संख्या आहे. ही संख्या जवळपास 10 दशलक्ष इतकी.

    ▪️बळजबरीने कामगार

    सन 2016 मध्ये सुमारे 25 दशलक्ष लोक बळजबरीने काम करत होते, त्यापैकी 16 दशलक्ष घरगुती काम, बांधकाम, शेती यासारख्या खाजगी क्षेत्रांत काम करत होते.
    सुमारे 5 दशलक्ष लोक सक्तीने लैंगिक शोषणात अडकले होते.

    ▪️बळजबरीने विवाह

    सन 2016 मध्ये अंदाजे 15.4 दशलक्ष लोक बळजबरीने विवाहबद्ध झालेत. त्यात एकूण 6.5 दशलक्ष प्रकरणे मागील 5 वर्षांत (2012-2016) घडलेली आहेत.
    बळजबरीने विवाहबद्ध झालेल्यांमध्ये एक तृतीयांशहून अधिक तर फक्त लहान मुल-मुली होत्या.

    शाश्वत विकास ध्येय 8.7 हे सन 2025 पर्यंत बळजबरीने मजुरी, आधुनिक गुलामगिरी, मानवी तस्करी तसेच बालमजुरीला आळा घालून त्यांचे उच्चाटन निश्चित करणे यासंबंधीचे आहे. यासंबंधी कार्य करण्याच्या उद्देशाने सरकार, संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटना, खाजगी क्षेत्र, कामगार संघटना आणि नियोक्ते यांच्या संघटना यांच्या भागीदारीने होणार्‍या सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासह यासंबंधी माहिती आणि निश्चित आकडेवारी प्रदान करण्यात आली आहे.

    🔹'बोट लॅब'च्या सहाय्याने ब्रह्मपुत्रा नदीचा अभ्यास केला जाणार

    ब्रह्मपुत्रा नदीचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग एका नौकेवर प्रयोगशाळा उभी करणार आहे. प्रस्तावित जहाज ‘ब्रह्मपुत्रा बायोडायव्हर्सिटी बायोलॉजी बोट (B4)’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नौकेवर बैठकीसाठी दोन मोठ्या खोल्या आणि एक सुसज्जित प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे. संशोधक नदीच्या विविध पात्रातले नमुने गोला करणार, पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात चाचण्या घेणार आणि नदीतील जैवविविधतेचा अभ्यास करणार.

    🔹प्रसिद्ध अभिनेत्री शकिला यांचे निधन

    ‘बाबूजी धीरे चलना.....’ या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शकिला यांचे निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. 50, 60 च्या दशकात चित्रपटभूमी गाजवणार्‍या अभिनेत्री शकिला यांनी 'हातिम ताई' (1956), 'आर पार' (1954), ‘CID’ (1956), 'श्रीमान सत्यवादी' (1960), 'चायना टाउन' (1962) आणि अश्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसून आल्या.

    🔹AAI हिरासर (गुजरात) येथे हरितक्षेत्र विमानतळ बांधणार

    भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने गुजरातच्या हिरासर (राजकोट जिल्हा) येथे नवीन हरितक्षेत्र विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश (लखनऊ, अलाहाबाद) आणि झारखंड (देवघर) येथील विमानतळांना अद्ययावत करण्यात येणार आहे.
    या नव्या आणि जुन्या बांधकामांसाठी सुमारे 1500 कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आला आहे.
    सौराष्ट्र प्रदेशातली वाहतूक मागणी क्षमता पूर्ण करण्यासाठी हिरासर येथे नवीन हरितक्षेत्र विमानतळ बांधण्यात येत आहे. यासाठी लागणारा भूखंड गुजरात राज्य शासन मोफत उपलब्ध करून देणार आहे.

    ▪️भारतीय विमानतळ प्राधिकरण बद्दल

    भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ची 1 एप्रिल 1995 रोजी स्थापना करण्यात आली. हे प्राधिकरण नागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्य असून विमानतळ व त्याला संलग्न पायाभूत संरचनेचे निर्माण, सुधारणा, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठी जबाबदार आहे. हे भारतामधील एकूण 185 विमानतळे व्यवस्थापित करते.

    🔹JNPT ने सलग अकराव्यांदा ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’ जिंकला

    जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) ला अधिकृत भाषेच्या उत्कृष्ट वापरासाठी स्वायत्त संस्था व मंडळासाठी 'बी' विभागाच्या श्रेणीत सन 2016-17 साठी ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’ मिळाला. हिंदी दिनानिमित्त नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. JNPT ने मिळवलेला हा सलग 11 वा पुरस्कार आहे.

    🔹स्टर्लिंग के. ब्राउन - सर्वोत्कृष्ट नाटक अभिनेत्याचा एमी पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिका वंशीय अमेरिकन

    स्टर्लिंग के. ब्राउन हा सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्याचा एमी पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिका वंश असलेल्या अमेरिकेचा रहिवासी ठरला आहे. त्याला हा पुरस्कार ‘धिस इज अस’ या NBC नाटक मालिकेमधील भूमिकेसाठी मिळाला आहे.

    ▪️इतिहास घडविणारे इतर विजेते –
    रिझ अहमद (‘द नाईट ऑफ’ मालिका) - प्रमुख भूमिकेसाठी एमी पुरस्कार जिंकणारा पहिला दक्षिण आशियाई पुरुष.
    डोनाल्ड ग्लोवर (‘अटलांटा’ मालिका) – विनोदी दिग्दर्शनासाठी एमी पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिका वंशाची अमेरिकेची रहिवासी.
    लीना वेथ (‘मास्टर ऑफ नन’ मालिका) - विनोदी लिखाणासाठी एमी पुरस्कार जिंकणारी पहिली आफ्रिका वंशाची अमेरिकेची रहिवासी.
    ज्युलिया लुईस-ड्रेफस (व्हीप) - एकाच भूमिकेसाठी सलग सहाव्या वर्षी विनोदी मालिकेमधील सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा एमी पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री.

    ▪️एमी पुरस्कार
    एमी पुरस्कार हा अकॅडेमी ऑफ टेलिविजन आर्ट्स अँड सायन्सेस कडून दिला जाणारा पुरस्कार आहे. हे पुरस्कार प्रथम सन 1949 मध्ये देण्यात आले होते. हे पुरस्कार प्राइमटाइम टेलीव्हिजन प्रोग्राम, प्राइमटाइम क्रिएटिव्ह आर्ट्स आणि प्राइमटाइम इंजीनियरिंग अश्या तीन श्रेणींमध्ये दिले जातात.

    🔹त्रिपुरा - कुटुंब कल्याण जिल्हा समिती नेमणारे पहिले राज्य

    महिलांकडून पती व पतीच्या नातेवाईकांच्या विरोधात त्रास देण्याच्या उद्देशाने होणार्‍या बनावट आणि पक्षपातीपणाच्या तक्रारींना हाताळण्यासाठी कौटुंबिक कल्याण जिल्हा समित्यांची स्थापना करणारे त्रिपुरा हे देशातले पहिले राज्य ठरले आहे. या समित्यांमध्ये स्वयंसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा सेवानिवृत्त अधिकारी किंवा सेवा देणार्‍या अधिकाऱ्यांच्या पत्नी यांचे सदस्यत्व असू शकते.

    🔹गूगलने भारतात त्याचे ‘तेज’ अॅप सुरू केले

    भारतात डिजिटल देयकांचा वाढत चाललेला कल बघता गूगल या तंत्रज्ञान कंपनीने ‘तेज’ नावाचे मोबाईल अॅप सुरू केले आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते 18 सप्टेंबर 2017 रोजी या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

    ▪️‘तेज’ अॅप

    ‘तेज’ अॅप ही एक युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) देयक सेवा आहे, ज्याच्या माध्यमातून एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे हस्तांतरित केले जाऊ शकते आणि त्यासाठी खाते क्रमांक, IFSC कोड किंवा MMID ची गरज नसते.
    अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यामधून तसेच UPI ID, QR कोड आणि फोन क्रमांक याद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची मुभा देते.
    वापरकर्ता दिवसाला फक्त 20 वेळा भरणा करू शकतो आणि 1,00,000 रुपयांपर्यंत रक्कम हस्तांतरीत करू शकतो.
    हे अॅप इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ आणि तेलगू या प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे.
    सर्व प्रमुख भारतीय बँका तसेच डॉमिनोज, रेडबस, जेट एयरवेज आणि PVR यासारख्यांना देयक भागीदार म्हणून गूगलने एकत्र आणले आहे.
    अॅपमार्फत व्यावसायिक वापरकर्ते देखील त्यांच्या वैयक्तिक चालू खात्यामधून पैसे पाठवू वा प्राप्त करू शकतात.
    हे अॅप अँड्रोइड आणि iOS या दोन्ही व्यासपीठावर उपलब्ध आहे.

    ▪️भारतामधील डिजिटल देयकांचा व्यवहार

    भारतामधील पैश्यासंबंधित देयक आणि निवारण प्रणाली ही 2007 सालच्या देयक आणि निवारण प्रणाली अधिनियम अंतर्गत कार्य करते आणि भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा याचे नियमन केले जाते. तत्काळ देयक सेवा (Immediate Payment Service -IMPS) हा भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ (National Payments Corporation of India -NPCI) चा एक पुढाकार आहे. ही एक सेवा आहे ज्याद्वारे बँकांकडून नोंदणी केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या MMID (मोबाइल मनी आयडेन्टिफायर) कोड च्या माध्यमातून एका खात्यातून दुसर्‍या खात्यात तत्काळ पैसे हस्तांतरित केले जाऊ शकते. NPCI ही भारतातली सर्व किरकोळ देयके प्रणालीसाठी एक छत्र-कंपनी आहे. भारतीय रिझर्व बँक आणि इंडियन बॅंक्स असोसिएशन (IBA) च्या मार्गदर्शनाने NPCI ची स्थापना केली गेली. कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत सन 2008 मध्ये स्थापित NPCI चे मुख्यालय मुंबई येथे आहे.

    🔹मर्सिडीस अरोज - पेरूचे नवे पंतप्रधान

    पेरूच्या पंतप्रधान पदावर माजी अर्थमंत्री मर्सिडीस अरोज यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष पेड्रो पाब्लो क्यूझिंस्की यांनी मर्सिडीस अरोज यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. फर्नांडो झवालाच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळाविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला. यानंतर ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. मर्सिडीस अरोज या एक कायदेतज्ञ आणि पेरूच्या दोन उप-राष्ट्राध्यक्षांपैकी एक आहेत. त्या नव्या पुनर्संरचित मंत्रिमंडळाच्या नव्या मुख्यमंत्री आहेत.

    🔹कॅलिफोर्नियात ‘69 वा प्राइम टाइम एमी पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला

    कॅलिफोर्नियात ‘69 वा प्राइम टाइम एमी पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला

    17 सप्टेंबर 2017 रोजी कॅलिफोर्नियामधील डाउनटाऊन लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये ‘69 वा प्राइम टाइम एमी पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. समारंभाचे संचालन स्टीफन कोल्बर्ट या अभिनेत्याने केले.

    या सोहळ्यात अकॅडेमी ऑफ टेलिविजन आर्ट्स अँड सायन्सेस द्वारा निवडण्यात आलेल्या 1 जून 2016 ते 31 मे 2017 या काळात अमेरिकेत प्रदर्शित होणार्‍या दूरदर्शन मालिकांमधील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणार्‍यांना एमी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

    “द हँडमेड्स टेल” ही सर्वोत्कृष्ट नाटक मालिका श्रेणीत पुरस्कार जिंकणारी पहिली वेब दूरदर्शन मालिका ठरली.

    ▪️पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

    सर्वोत्कृष्ट नाटक मालिका - द हँडमेड्स टेल
    सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका – व्हीप
    सर्वोत्कृष्ट अल्पकालीन मालिका - बिग लिटल लाइज
    सर्वोत्कृष्ट रीयालिटी-स्पर्धा मालिका – द व्हॉइस
    नाटक मालिकेतला सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता - स्टर्लिंग के. ब्राउन (धिस इज अस)
    नाटक मालिकेतली सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री - एलिजाबेथ मोस (द हँडमेड्स टेल)
    नाटक मालिकेतला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - जॉन लिथगो (द क्राउन)
    नाटक मालिकेतली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - ऍन डोव्ड (द हँडमेड्स टेल)
    विनोदी मालिकेतला सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता - डोनाल्ड ग्लोवर (अटलांटा)
    विनोदी मालिकेतली सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री - जुलिया लुईस-ड्रेफस (व्हीप)
    विनोदी मालिकेतला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अॅलेक बाल्डविन (सॅटर्डे नाइट लाइव्ह)
    विनोदी मालिकेतली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - केट मॅककिनोन (सॅटर्डे नाइट लाइव्ह)
    मर्यादित मालिकेतला सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता - रिझ अहमद (द नाईट ऑफ)
    मर्यादित मालिकेतली सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री - निकोल किडमन (बिग लिटल लाइज)
    मर्यादित मालिकेतला/चित्रपटातला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अलेक्झांडर स्कार्स्गार्ड (बिग लिटल लाइज)
    मर्यादित मालिकेतली/चित्रपटातली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लॉरा डर्न (बिग लिटल लाइज)
    विविध विषयांवर चर्चा करणारी सर्वोत्कृष्ट मालिका – लास्ट वीक टुनाइट वीथ जॉन ऑलिव्हर
    विनोदी मालिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शन - डोनाल्ड ग्लोवर (अटलांटा)
    नाटक मालिकेसाठी उत्कृष्ट लेखन - ब्रुस मिलर (द हँडमेड्स टेल)
    विनोदी मालिकेसाठी उत्कृष्ट लेखन - अझीझ अन्सारी आणि लीना वैथ (मास्टर ऑफ नन)
    नाटक मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - रीड मोरानो (द हँडमेड्स टेल)

    ▪️एमी पुरस्कार
    एमी पुरस्कार हा अकॅडेमी ऑफ टेलिविजन आर्ट्स अँड सायन्सेस कडून दिला जाणारा पुरस्कार आहे. हे पुरस्कार प्रथम सन 1949 मध्ये देण्यात आले होते. हे पुरस्कार प्राइमटाइम टेलीव्हिजन प्रोग्राम, प्राइमटाइम क्रिएटिव्ह आर्ट्स आणि प्राइमटाइम इंजीनियरिंग अश्या तीन श्रेणींमध्ये दिले जातात.

    🔹गायिका पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

    अंकुश चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता…मन का विश्वास कमजोर हो ना’, ही प्रार्थना आपल्या सुरेल आवाजाने अजरामर करणाऱ्या गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

    संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकाराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली होती. यापूर्वी हा पुरस्कार माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना देण्यात आला आहे.

    पुष्पाताईंचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला. वडील जनार्दन चामरे यांच्याकडून पागधरे यांना लहानपणापासूनच संगीताचे धडे मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु आर. डी. बेंद्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मुंबई आल्या. गीत, गझल, भजन आणि ठुमरी शिकल्या. आकाशवाणीवरही त्यांनी गाणी गायली आहेत. प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी त्यांना ‘प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटात गायनाची संधी दिली. बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, प्रभाकर पंडित, डी. एस. रुबेन, विठ्ठल शिंदे, राम-लक्ष्मण, विश्वनाथ मोरे, यशवंत देव आदी संगीतकारांबरोबर त्यांना गायनाची संधी मिळाली. पुष्पाताईंनी ‘खून का बदला’, ‘बिना माँ के बच्चे’, ‘मुक्कदर का सिकंदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी, ओडिया, बंगाली, मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी आदी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

    🔹गोव्याच्या शिरपेचात पर्यटन क्षेत्रातील दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा सन्मान

    गोवा टुरिझमला जागतिक पर्यटनाच्या दिवशीच दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांसाठी हे पारितोषिक देण्यात आले. गोव्याला ‘पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य’ हा सन्मान मिळाला. तसेच ‘सोशल मीडिया, मोबाईल अॅप’ यांच्या सर्वाधिक उपयोगासाठीही हा पुरस्कार देण्यात आले आहे.

    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला. अल्फॉन्स कन्ननथानम यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती. NTA अर्थात राष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील पुरस्कारांची सुरूवात १९९० पासून करण्यात आली. पर्यटनाला चालना देणाऱ्या राज्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. मागील पाच वर्षांपासून गोवा पर्यटन विभागाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता यामध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कारांची भर पडली.
    पुरस्कार मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे अशी प्रतिक्रिया गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबाबत आणि सन्मानाबाबत अभिमान वाटतो आहे अशी प्रतिक्रिया गोवा पर्यटन विभागाचे संचालक निलेश कारबल यांनी दिली.

    🔹कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा फिरकी गोलंदाज विक्रम आता पाकिस्तानच्या यासिर शहाच्या नावे

    दिग्गज फिरकीपटूंना माघारी धाडत पाकिस्तानचा यासिर शहा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यासिर शहाने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेट यांच्या नावे असलेला विक्रम यासिर शहाने आज मोडला आहे. ग्रिमेट यांनी २८ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता, तर यासिर शहाने २७ व्या कसोटीमध्येच हा विक्रम आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेचा लहिरु थिरीमने हा यासिर शहाचा १५० वा बळी ठरला. या सामन्यात यासिर शहाने पाकिस्तानच्या वकार युनूसच्या २७ सामन्यांमध्ये १५० बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

    🔹भारतातील शिक्षणाची स्थिती चिंताजनक : जागतिक बँक

    जागतिक बँकेच्या अहवालाने भारतातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा भांडफोड केला. भारत अशा 12 देशांच्या यादीत दुसऱया स्थानावर आहे, जेथे दुसरी इयत्तेच्या विद्यार्थ्याला एक शब्द देखील वाचता येत नाही. यादीत मलावी पहिल्या स्थानावर आहे. भारतासह अल्प आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा हवाला देत जागतिक बँकेने ज्ञानरहित शिक्षण देणे विकासाची संधी वाया घालविण्यासह जगभरात मुले आणि तरुणाईसोबत मोठा अन्याय असल्याचे म्हटले.

    जागतिक बँकेने आपल्या अहवालात जागतिक शिक्षणात ज्ञानाच्या संकटाचा इशारा दिला. अशा देशांमध्ये लाखोंच्या संख्येतील तरुण-तरुणी पुढील आयुष्यरात कमी संधी आणि अल्प वेतनाच्या समस्येला तोंड देतात. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठीचे शिक्षण देण्यास अपयशी ठरत असल्याने असे होत असल्याचे अहवालात नमूद आहे.

    ▪️स्थिती बिकट

    जागतिक विकास अहवाल 2018 : लर्निग टू रियलाइज एज्युकेशन्स प्रॉमिसमध्ये ग्रामीण भारतात तिसरी इयत्तेचे 3 चतुर्थांश विद्यार्थी 2 अंकी गणित सोडवू शकत नाही आणि पाचवी इयत्तेचे निम्मे विद्यार्थी देखील यात अपयशी ठरत असल्याचे म्हटले गेले. ज्ञानरहित शिक्षणामुळे गरीबी हटविणे आणि सर्वांसाठी संधी निर्माण करणे तसेच समृद्धी आणण्याच्या मोहिमेला पूर्ण करण्यास अपयश येईल. शाळेत अनेक वर्षांनंतर देखील लाखो मुले वाचू-लिहू शकत नाही किंवा गणिताचा सोपा प्रश्न सोडवू शकत नाहीत.

    ▪️सामाजिक दरी रुंदावणार

    ज्ञानाचे हे संकट सामाजिक दरीला कमी करण्याऐवजी ती आणखी रुंदावत आहे. हे संकट नैतिक आणि आर्थिक स्वरुपाचे आहे. जेव्हा चांगल्याप्रकारचे शिक्षण मिळते, तेव्हा तरुणाईला रोजगार, चांगले उत्पन्न, चांगले आरोग्य आणि गरीबीशिवाय जगण्याची संधी उपलब्ध होते. शिक्षण समुदायांना संशोधनासाठी प्रेरित करते, संस्थांना बळकट करत सामाजिक सामंजस्य वाढविते. हे लाभ शिक्षणावर निर्भर असून ज्ञानरहित शिक्षण देणे संधी वाया घालविणे असल्याचे उद्गार जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी काढले.

    ▪️ठोस पावलांची गरज

    2016 मध्ये ग्रामीण भारतात पाचवी इयत्तेचे केवळ निम्मे विद्यार्थीच दुसरी इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक सहजपणे वाचू शकले. ज्ञानाचे हे गंभीर संकट दूर करण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी ठोस धोरणात्मक पावले उचलण्याची शिफारस अहवालात करण्यात आली.

    🔹जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘प्लेबॉय’मासिकाच्या संस्थापकाचे निधन

    जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘प्लेबॉय’ मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे हेते.

    जगभरात सर्वाधिक विकले जाणारे मॅग्झिन म्हणून ‘प्लेबॉय’ची ख्याती होती.20 शतकात लैंगिक क्रांती घडवणारे मॅग्झिन म्हणूनही प्लेबॉय नावारूपास आले. ‘प्लेबॉय’ हे जगभरातल्या तरूण वयातील मुलांमध्ये प्रचंड आर्कषण असलेले मासिक. नग्न, अर्धन्ग, तरूणींचे बोल्ड फोटो पाहण्यासाठी ‘प्लेबॉय’चा अंक हातोहात विकाला जात असत, अमेरिकेपासून ते जगभरातील कानाकोपऱयात ‘प्लेबॉय’ पोहोचले होते. 1 ऑक्टोबर 1953 राजी ‘प्लेबॉय’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 1970 सालापर्यंत ‘प्लेबॉय’ मासिकाचा खप तब्बल 56 लाखाच्या घरात पोहचला होता. मात्र इंटरनेटचा वापर वाढला आणि ‘प्लेबॉय’बद्दलची उत्सुकता कमी होत गेली. त्यानंतर या मासिकात नग्न फोटो छापणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

    🔹मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांचा वाढवला कार्यकाळ

    केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर 2018 पर्यंत पदावर कायम राहतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी सांगितले. ऑक्टोबर 2014 मध्ये पुढील तीन वर्षांसाठी सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी सांगितले की, सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

    ▪️कोण आहेत सुब्रह्मण्यम?

    अरविंद सुब्रह्मण्यम यांनी पदवीपूर्व शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. तर अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. यानंतरचे एम.फिल. आणि डी. फिलचे शिक्षण त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

    अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन’ आणि 2011 मध्ये‘इक्लिप्स : लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स’ ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. तसेच 2012मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स?’ या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.

    याबरोबरच 1988-92मध्ये ‘गॅट’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून हावर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (1999-2000) आणि जॉन हॉपकिन्सच्या स्कूल फॉर अ‍ॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजमध्ये (2008-12) अध्यापनाचे कार्यही केले आहे.

    🔹महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’

    महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईडच्या पुरस्काराने रामा खांडवाला यांना सन्मानित करण्यात आले तर सर्वोत्कृष्ट एकल रेस्टॉरन्ट पुरस्कार मुंबईतील खैबर या रेस्टॉरन्टला मिळालेला आहे.

    ▪️छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

    पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2015-16 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फोंस, पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, महासंचालक सत्यजीत राजन, आर्थिक सल्लागार लीना सरन मंचावर उपस्थित होत्या. यासह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायाशी निगडीत व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते.

    मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळा’ला देशभरातील महानगराच्या विमानतळामधून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तनेजा आणि कारपोरेट व्यवहार विभागाचे महाव्यवस्थापक राहुल बॅनर्जी यांनी स्वीकारला.

    मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण अशियातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ असून एकूण देशभरातील विमानतळाच्या 17.2% टक्के वर्दळ एकट्या या विमानतळावर असते. रोज किमान 25 ते 40 लाख प्रवासी विमान प्रवास करण्यासाठी चढउतार करतात. 2015 मध्ये या विमानतळाला गुणवत्ता नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. हे विमानतळ देशातील मध्य, दक्षिण आणि पश्चिम प्रदेशातील 29 शहरांना जोडते. या विमानतळावरून दररोज जवळपास 190 विमानांची ये-जा होते. देश-विदेशातील 90 ठिकांणासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाश्यांना सोयीस्कर होते. पर्यटनाचा विचार करता हे विमानतळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवडते विमानतळ आहे.

    ▪️मुंबईच्या रमा खांडवाला यांना सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईड राष्ट्रीय पुरस्कार

    मुंबईच्या रमा खांडवाला यांना 50 वर्षे पर्यटक मार्गदर्शक म्हणून निभावलेल्या कामाबद्दल सर्वोत्कृष्ट ‘पर्यटक मार्गदर्शक’ या राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    श्रीमती खांडवाला या वरिष्ठ पर्यटक गाईड आहेत. मागील 5 दशकांपासून त्या पर्यटन क्षेत्रात काम करीत आहेत. सध्या त्या 91 वर्षाच्या असून आजही पर्यटक गाईड म्हणून सक्रियपणे अनेकांना मागदर्शन करतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रीय सहभाग निभावला असून त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या राणी झांसी महिला सैन्य तुकडीत सेकंड लेफ्टनंट म्हणून काम सांभाळले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सेवा करावी या उद्देशाने त्यांनी पर्यटन मार्गदर्शक म्हणून 1968 पासून सुरूवात केली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांच्या पर्यटन क्षेत्राचा अभ्यास करून महाराष्ट्र दर्शन घडविले. त्यांनी जपानी भाषाही शिकून घेतली. जपानी पर्यटकांसाठी त्या भारतीय दूवा म्हणून काम करीत होत्या. त्यांनी अनेक देशांच्या मान्यवरांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे पर्यटन घडविले आहे.

    पुरस्कार प्राप्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत त्या म्हणाल्या, तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला लोक बोलवूनच घेतील. माझ्या कामामुळे आज मला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपला देश मनाने खूप श्रीमंत आहे. अनेक पर्यटकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती की, आम्हाला भारतातच राहायचे आहे. आज पर्यटक मार्गदर्शकांना अनेक संधी आहेत त्यांनी त्याचे सोने करावे.

    ▪️मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्टचा एकल राष्ट्रीय पुरस्कार

    मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्ट या एकल राष्ट्रीय पुरस्काराने पर्यटन राज्यमंत्री के.जे अल्फोंस यांनी सन्मानित केले. खैबर रेस्टॉरन्ट 1956 पासून सुरू असून आग लागल्यामुळे जुने बांधकाम पाडून 1988 ला नवीन बांधकाम केले आहे. या रेस्टॉरन्टचे डिसाइन हे परवेश्वर गोदरेज यांनी केले असून या रेस्टॉरेन्टच्या आतील भिंतीवरील चित्रे ही जगप्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन आणि एंजोली एला मेनन यांनी काढली आहेत. खैबर रेस्टॉरन्टमध्ये 175 लोकांच्या बसण्याची सुविधा आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातनाम व्यक्तींनी इथल्या व्यंजनांचा लाभ घेतला आहे.

    🔹कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

    कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती व प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने दि.23 नोव्हेंबर 2015 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत पर्यटनाच्यादृष्टीने प्रचलित असा एखादा गावाचा समूह अस्तित्वात असल्यास त्या समूहाच्या पर्यटन विकासास प्राधान्य देण्यात येणार आहे.

    स्थानिक ग्रामस्थांना पर्यटन विकासासाठी सक्षम करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पाठ्यक्रम आयोजित करणे, ग्रामस्थांना प्रशिक्षण देणे, कोकण कृषी विद्यापीठात कोकण पर्यटनास उपयुक्त प्रशिक्षण देण्यासाठी (Demo Structure) उभारण्यास साह्य करणे, स्थानिक ग्रामस्थांना अशा कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास पर्यटनास पूरक उद्योग उभारण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्या कर्जाच्या 4 टक्क्याच्या वरील मात्र 12 टक्क्याच्या मर्यादेपर्यंत व्याजाच्या रकमेचा फरक राज्यस्तरीय समिती मंजूर करणार आहे.

    एक कोटीपेक्षा कमी किमतीच्या छोट्याछोट्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असून सादर करण्यात येणाऱ्या प्रकल्प प्रस्तावाची प्रत्येकी किंमत कमाल रु.3 कोटी व सरासरी एकत्रित प्रस्तावाची कमाल किंमत रु.5 कोटी पेक्षा जास्त नसावी. विभागीयस्तरावरील प्रकल्प प्रस्तावाची किंमत रु.5 कोटीपेक्षा अधिक नसावी. पर्यटनविषयक सोयी सुविधांच्या बांधकामावर जास्तीत जास्त 80 टक्के पर्यंतचा खर्च करण्यात येणार असून 20 टक्के खर्च हा प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी पर्यटनदृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या गावांच्या सौंदर्यस्थळांची सुधारणा/बळकटीकरण करण्यासाठी करण्यात येणार आहे.

    कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत 45 कोटीची विकासकामे प्रस्तावित असून अनेक ठिकाणची कामे सुरु झालेली आहेत. गावातून पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्याची बांधणी, विद्युत व्यवस्था, वाहनतळ उभारणे यासारखी कामे या कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आली आहेत. शासनामार्फत त्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.

    कोकण हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळून गावांच्या सौंदर्यस्थळांचे बळकटीकरण होऊन गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोकणासाठी असणाऱ्या या पर्यटन विकास कार्यक्रमामुळे पर्यटनस्थळाचा विकास होऊन नागरिकांना चांगल्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

    -शैलजा पाटील,
    माहिती सहायक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई.

    🔹स्वच्छतेत कोल्हापूर, सांगली, सातारा प्रथम

    स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्हयास गौरविले जाणार आहे. पुणे विभागात कोल्हापूरसह सांगली व सातारा हे जिल्हेही प्रथम क्रमांकावर आहेत.

    2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.

    स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला 90 % इतके गुण मिळाले आहेत. सोमवार (ता. 25) पर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. केंद्र शासनाकडून या स्पर्धेसाठी कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी 25 पैकी 15 गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी 25 पैकी 25 गुण मिळाले आहेत.

    🔹कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे निधन

    एकेकाळी कॉंग्रेस पक्षाचे चाणक्‍य अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या फोतेदार यांची दिल्लीलगतच्या गुरूग्राममधील रूग्णालयात प्राणज्योत मालवली. ते 85 वर्षांचे होते.

    मूळचे काश्‍मीरचे असणाऱ्या फोतेदार यांना पन्नासच्या दशकाच्या प्रारंभी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं.जवाहरलाल नेहरू यांनी राजकारणात आले. त्यानंतर फोतेदार यांनी कॉंग्रेसमधील स्वत:चे स्थान भक्कम केले. पक्षातील शक्तिशाली नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख बनली. नेहरू यांच्यानंतर इंदिरा आणि राजीव गांधी या दिवंगत माजी पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची नेहमी गणना झाली.

    ऐंशीच्या दशकात इंदिरा यांनी फोतेदार यांना स्वत:चे राजकीय सचिव बनवले. त्यांनी राजीव यांच्याही राजकीय सचिवपदाची धुरा तीन वर्षांसाठी सांभाळली. त्यानंतर राजीव यांनी फोतेदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. कॉंग्रेस पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या कार्यकारिणीचे फोतेदार प्रदीर्घ काळ सदस्य राहिले. निधनापूर्वीही ते कार्यकारिणीचे कायम निमंत्रक होते.

    राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभी फोतेदार जम्मू-काश्‍मीर विधानसभेचे सदस्य होते. ते दोनवेळा राज्यसभेचे सदस्य बनले. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फोतेदार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

    🔹चीन आणि पाकिस्तानचा संयुक्‍त हवाई युद्धसराव

    चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलाने आज पहिल्यांदाच संयुक्‍तपणे हवाई युद्धसराव केला. यामध्ये दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. दोन्ही देशांच्या संयुक्‍त युद्धसरावामुळे संरक्षण सहकार्याच्या बाबतीतही पाकिस्तान आणि चीनचे संबंध किती घनिष्ठ आहेत, हे स्पष्ट झाले.

    “शाहीन’ हा संयुक्‍त युद्धसराव सर्वप्रथम 2011 साली झाला होता. शिन्झियांग या स्वायत्त प्रदेशात 5 ते 25 सप्टेंबर दरम्यान हा सहावा हवाई युद्धसराव झाला. दहशतवाद विरोधी मोहिमेचा युद्धसराव, असे या युद्धसरावाचे स्वरुप होते.

    “शाहीन 6′ नावाच्या या हवाई युद्धसरावादरम्यान पाकिस्तान हवाई दलाचे दक्षिण विभाग प्रमुख एअर व्हाईस मार्शल हसीब पराचा यांनी चीनच्या आय- 11बीएस या लढाऊ विमानातून युद्धसरावाचे निरीक्षण केले, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यावेळी चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे व्हाईस चीफ ऑफ स्टाफ शीन शीन हे देखील सहभागी झाले होते, असे “पीएलए’च्या वेबसाईटवरील वृत्तामध्ये म्हटले आहे.

    🔹कर्नाटक मंत्रिमंडळाची अंधश्रद्धा विरोधी कायद्याला मंजूरी

    कर्नाटक मंत्रिमंडळाने अंधश्रद्धा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्याने
    दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील कुक्के सुब्रम्हण्य मंदिरात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त माडे स्नान (ब्राह्मणांनी भोजनानंतर टाकलेल्या केळीच्या उष्ट्या पानांवरून लोटांगणे घालणे)रिवाजावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र फलज्योतिष शास्त्र वा वास्तुशास्त्रावर बंदी घालण्यात आलेली नाही.

    दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या अंधश्रद्धा विरोधी (मानवी बलिदान विरोध आणि निर्मूलन आणि अन्य दुष्ट आणि अघोरी प्रथा, व काळी जादू यावर बंदी) कायदा 2017 मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. या कायद्यात दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील कुक्के सुब्रम्हण्य मंदिरात केल्या जाणाऱ्या वादग्रस्त माडेस्नानावर (ब्राह्मण जेवल्यानंतर राहिलेल्या उष्ट्या केळीच्या पानांवरून लोटांगणे घालणे) बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यात फलज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र यावर बंदी घालण्यात आलेली नाही.

    महाराष्ट्र हे अंधश्रद्धा विरोधी कायदा करणारे पहिले राज्य आहे.

    No comments:

    Post a Comment