Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, August 8, 2017

    ऑगस्ट महिन्यात आकाशातील ‘या’ गमती-जमती पहायला विसरु नका

    Views
    ऑगस्ट महिन्यात आकाशातील ‘या’ गमती-जमती पहायला विसरु नका

    'ग्रहणे', 'उल्कापात', 'शनीचे कडे' आणि इतर बरेच काही दिसणार



    सध्या सुरु असलेल्या ऑगस्ट महिना आकाश निरिक्षकांसाठी एक महत्वपूर्ण काळ असून या महिन्यांत आकाशात अनेक खगोलीय चमत्कारीक घटना पहायला मिळणार आहेत. या घटना सर्वसामान्यांचे कुतूहल जागवणाऱ्या असणार आहेत. यामध्ये ‘ग्रहणे’, ‘उल्का वर्षाव’, ‘शनि ग्रहाभोवतालचे कडे’ आणि इतर बरेच काही पहायला मिळणार आहे. मात्र, हे चमत्कार काही ठराविक तारखांना दिसणार आहेत. योग्य खगोलीय उपकरणांच्या सहाय्याने या गमती-जमती सहज पाहता येण्यासारख्या आहेत.


    *२ ऑगस्ट :* ‘शनि’भोवतालचे कडे

    गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून ‘शनि’ ग्रह हा पृथ्वीच्या जवळ आला असून २ ऑगस्ट रोजी शनिभोवतालचे भव्यकडे हे प्रामुख्याने रात्रीच्या आकाशात दिसले होते. ‘शनि’ हा चमकदार पिवळसर असा ग्रह आहे. पृथ्वीच्या चंद्रा खालोखाल हा ग्रह प्रकाशमान असतो. चंद्राच्या दक्षिण दिशेला हा ग्रह दिसतो. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान ‘शनि’ आणि त्याचे ‘कडे’ दिसून आले होते. या खगोलीय चमत्काराचा अनुभव जगभरातील अनेक खगोलप्रेमींनी घेतला. त्यासाठी त्यांनी उच्च दर्जाच्या दुर्बिणींचा वापर केला. यामध्ये प्रत्यक्ष ‘शनि’ आणि त्याचा ‘कड्या’तील अंतराचाही अनेकांनी अभ्यास केला. त्याचबरोबर शनिच्या ६२ चंद्रांपैकी काहींचे अनेकांना दर्शनही झाले.

    *७ ऑगस्ट : खंडग्रास चंद्रग्रहण*

    ७ ऑगस्ट अर्थात आजच्या दिवशी पृथ्वी, चंद्र आणि सुर्य हे एकाच रेषेत येणार असून पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण दिसणार आहे. सुमारे २ तासांसाठी हे ग्रहण पाहता येणार आहे. भारतात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या ग्रहणाला सुरुवात होणार आहे. तर मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. या ग्रहणाच्या सर्वोच्च काळात चंद्राचा काही भाग हा पृथ्वीच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. भारतात ही सर्वोच्च स्थिती रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी असणार आहे.

    *१२ ऑगस्ट : उल्कापात*

    त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा खगोलीय चमत्कार १२ ऑगस्ट रोजी पहायला मिळणार आहे. या दिवशी रात्रभर आकाशात उल्का पाताचा वर्षाव होणार आहे. खरंतरं दरवर्षी जुलैच्या मध्यात ते ऑगस्ट महिन्यादरम्यान हा उल्कापात पहायला मिळतो. यावर्षी उल्कापाताची सर्वोच्च स्थिती ही १३ ऑगस्ट रोजी असणार आहे. या दिवशी रात्रीपासून दुसऱ्या दिवशी १३ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही स्थिती पहायला मिळणार आहे. या रात्री आकाश निरिक्षकांना एका तासात १०० उल्कापात इतक्या मोठ्या प्रमाणात पाहता येणार आहेत. पौर्णिमेची रात्र होऊन गेल्यानंतर चंद्राचा प्रकाश काहीसा प्रखर असल्याने या उल्कापाताचे दर्शन होण्यास अडथळे होऊ शकतात. शहरातील रात्रीच्या दिव्यांच्या उजेडाच्या भागापासून दूर होऊन हे पाहता येईल.

    *१६ ऑगस्ट : वृषभ राशीतील रोहिणी नक्षत्र*

    वृषभ राशीतील नारिंगी रंगाचा रोहिणी नक्षत्र (तारा) या दिवशी प्रखरपणे दिसणार आहे. हा तारा पृथ्वीपासून ६५ प्रकाशवर्षे दूर आहे. या रात्री हा तारा चंद्राच्या वरच्या भागात दिसणार आहे. या ताऱ्याला धार्मिक महत्व असल्याचे सांगण्यात येते. या ताऱ्याला वृषभ अर्थात बैलाचा डोळा असेही संबोधले जाते. हिंदू पुराणात रोहीणी नक्षत्राला चंद्राची आवडती पत्नी मानले जाते.

    *१९ ऑगस्ट : ‘शुक्र’ ग्रहाचे दर्शन*

    पृथ्वीचा जुळा ग्रह समजला जणाऱ्या शुक्रग्रहाचे या रात्री दर्शन होणार आहे. चंद्रच्या समोरच्या भागात तो दिसणार आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री ३ वाजल्यापासून याचे दर्शन होणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत शुक्राचे दर्शन होणार आहे.

    *२१ ऑगस्ट : सुर्यग्रहण*

    या दिवशी सुर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येणार असून चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने ठराविक ठिकाणी ठराविक काळासाठी सुर्य पृथ्वीवरून पूर्णत: दिसेनासा होणार आहे. हे खग्रास सुर्यग्रहण अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागातून ९९ वर्षांच्या काळानंतर मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणार आहे. जगातील इतर भागातून ते खंडग्रास स्वरूपात दिसेल. मात्र, तीन तासाचा हा खगोलीय चमत्कार भारतातून पाहता येणार नाही.

    *२५ ऑगस्ट : ‘गुरु’ ग्रहाचे दर्शन*

    आपल्या सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु या दिवशी स्पष्टपणे पाहता येणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत या ग्रहाचे दर्शन होणार आहे. चंद्रच्या खाली उजव्या बाजूला हा ग्रह दिसणार आहे. कन्या राशीतील सर्वाधिक प्रखर ग्रह ‘स्पायका’चे ही या रात्री दर्शन होणार आहे. गुरुच्या खाली डाव्या बाजूला रात्रीच्या वेळी हा ग्रह पाहता येणार आहे.
    ही खगोलीय गंमत पाहण्यासाठी खगोलप्रेमींना चांगल्या दर्जाचे फिल्टर्स आणि दुर्बिणी वापरून या चमत्कारांचा अनुभव घेण्याचा सल्ला काही खगोलतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.