Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, August 8, 2017

    चालू घडामोडी- ८ऑगस्ट

    Views
    रवींद्र जडेजा बनला 'ऑलराउंडर नंबर वन'
    भारताचा ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजा बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे सारत 'आयसीसी'च्या ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. गोलंदाजांच्या यादीत आपले पहिले स्थानही या प्रतिभावान खेळाडूने कायम राखले आहे. ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत जडेजाच्या खात्यावर ४३८ गुण आहेत, तर शाकिबकडे ४३१ गुण आहेत.

    पाक सरकारमध्ये पहिल्यांदाच हिंदू मंत्री
    पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी शपथविधी झाला. अब्बासी यांच्या कॅबिनेटमध्ये यंदा हिंदू खासदार दर्शन लाल यांचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या दोन दशकांनंतर पाकिस्तानच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच एका हिंदू खासदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
    पाकचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी ४७ खासदारांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात १९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
    एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चार प्रातांचा समन्वयक म्हणून नेमण्यात आलं आहे. ६५ वर्षीय दर्शन लाल हे डॉक्टर आहेत आणि सध्या सिंध प्रांतातील मीरपूर येथे प्रॅक्टीस करत आहेत. २०१३ साली ते पीएमएल-एन पक्षाच्या तिकीटावर अल्पसंख्याकांसाठी राखीव जागेवर निवडून आले होते.
    दरम्यान, पाक सरकारमध्ये २०१३ सालापासून रिक्त असलेल्या परराष्ट्र मंत्रीपद आता ख्वाजा आसिफ यांची नियुक्त करण्यात आली आहे. ख्वाजा आसिप हे नवाज शरीफ यांच्या कॅबिनेटमध्ये संरक्षण आणि उर्जा मंत्रिपदी होते.
    डॉ. राजीवकुमार नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष
    नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी डॉ. राजीवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीवकुमार हे नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष असतील. अरविंद पनगरिया यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजीवकुमार यांची त्यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. पनगरिया हे ३० दिवसांच्या नोटीसवर आहेत. ते १ सप्टेंबरला पदमुक्त होतील.
    डॉ. राजीव कुमार हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकं लिहिली आहेत. लखनऊ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले आहे. २०१० ते २०१२ मध्ये ते इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (FICCI)चे सरचिटणीस होते.
    राजीवकुमार हे २००६ ते २००८ मध्ये ते भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य होते. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि अर्थ, उद्योग मंत्रालयांमधील कामाचा त्यांना अनुभव आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर)चे ते सिनिअर फेलो आणि पहले इंडिया फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
    न्या. दीपक मिश्रा देशाचे नवे सरन्यायाधीश
    सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश दीपक मिश्रा हे देशाचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत. केंद्र सरकारने आज या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. विद्यमान सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून त्यांच्याच शिफारशीवरून दीपक मिश्रा यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    न्या. मिश्रा देशाचे ४५वे सरन्यायाधीश म्हणून २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शपथ घेणार आहेत. ६३ वर्षीय मिश्रा हे विद्यमान सरन्यायाधीश खेहर यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. मिश्रा हे ओडिशामधील असून याआधी रंगनाथ मिश्रा आणि जी. बी. पटनायक यांच्या रूपाने देशाला ओडिशाने सरन्यायाधीश दिलेले आहेत. दीपक मिश्रा २ ऑक्टोबर २०१८ रोजी निवृत्त होणार आहेत.
    निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी तसेच याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवरील अखेरच्या क्षणी दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी अशा महत्त्वपूर्ण प्रकरणांत न्या. दीपक मिश्रा यांनी दिलेला निकाल महत्त्वपूर्ण ठरला होता. गेल्या महिन्यात न्या. केहर यांनी न्या. मिश्रा यांच्या नावाची या पदासाठी शिफारस केली होती.
    न्या. दीपक मिश्रा यांची २०११मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नेमणूक झाली. ‘नागरिकांचे न्यायाधीश’ अशी त्यांची सहकाऱ्यांमध्ये ख्याती आहे. एफआयआरच्या प्रतीसाठी तक्रारदार किंवा आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये चकरा माराव्या लागू नयेत यासाठी २४ तासांच्या आत पोलिसांच्या वेबसाइटवर ती प्रत प्रसिद्ध झाली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी दिला होता.