Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, August 24, 2017

    काल आणि पृथ्वीचा वेग

    Views
    *** कुतूहल  ***

    काल आणि पृथ्वीचा वेग
    (काॅपी-पेस्ट,दै लोकसत्ता)

    ‘काल’ या मूलभूत राशीचे मापन करण्यासाठी पूर्वी अतिसूक्ष्म काळासाठी परमाणू, त्रसरेणू, निमिष, क्षण अशी एकके होती आणि मोठय़ा कालमापनासाठी वर्ष, कल्प, युग, महायुग अशी एकके होती. आज मात्र सर्व स्तरांवर आणि पद्धतींमध्ये कालमापनासाठी सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष ही एकके वापरली जातात. कालमापनासाठी ‘सेकंद’ हे सर्वच पद्धतींमध्ये सामाईक आहे.
    मध्य सौरदिनाचा ८६४०० भाग म्हणजे एक सेकंद होय. पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास एक दिवस लागतो. पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर असतो, त्या भागावर सूर्यकिरणे पडतात. सूर्यकिरणे त्या भागावर जितका काळ असतात, तो कालावधी म्हणजे त्या ठिकाणचे ‘दिनमान’ आणि सूर्यकिरणे ज्या काळात नसतात तो कालावधी म्हणजे त्या ठिकाणचे ‘रात्रमान’. एक पूर्ण दिनमान आणि एक पूर्ण रात्रमान म्हणजे ‘एक दिवस’ होय. अशा वर्षांतील सर्व दिवसांच्या सरासरी कालावधीला ‘मध्य सौरदिन’ असे म्हणतात. मध्य सौर दिनाचा कालावधी चोवीस तासांचा असतो. प्रत्येक तासाची ६० मिनिटे आणि प्रत्येक मिनिटात साठ सेकंद असतात. म्हणून एक दिवसाचा काळ म्हणजे
    ६० × ६० × २४ = ८६,४०० सेकंदांचा कालावधी होय.

    स्वत:च्या अक्षाभोवती परिवलन करण्यासाठी पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला ‘दिवस’ म्हटले जाते. सुमारे ३६५.२५ दिवसांमध्ये सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करते. या कालावधीला आपण ‘वर्ष’ असे म्हणतो.
    वेग मापनासाठी अंतर आणि काल या दोन्हींची माहिती असणे आवश्यक असते.  पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघ सुमारे ४०,०७५.०१७ किलोमीटर आहे. ती स्वत:च्या अक्षाभोवती २४ तासांत एक भ्रमण पूर्ण करते. म्हणजे पृथ्वीच्या विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी १६६९.७९ किलोमीटर वेगाने भ्रमण करत असतो. तरीही पृथ्वीवरील सर्व वस्तू परस्पर सापेक्ष स्थिर आहेत असे म्हटले जाते.
    पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे १४,७१,६६,४६२ किलोमीटर आहे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा वर्तुळाकार आहे, असे मानले तर त्या कक्षेचा परीघ सुमारे ९२,४२,०५,३८१ कि.मी. आहे. पृथ्वी दर दिवशी २५,३०,३३६ कि.मी. प्रवास करते. म्हणजे हा वेग सुमारे २९.२९ कि.मी. प्रतिसेकंद आहे.

    – प्रा. दिलीप गोटखिंडीकर
    *मराठी विज्ञान परिषद*
    ➖➖➖➖➖➖
    कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! !