🔹यंदा दुलीप ट्रॉफी आयोजित होणार नाही
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाच्या पाच स्पर्धांपैकी एक असलेल्या दुलीप ट्रॉफीला २०१७-१८ मोसमात बीसीसीआयने आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या बीसीसीआय आयोजित करत असलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाच्या स्पर्धा आहेत.
दुलीप ट्रॉफीची सुरवात १९६१-६२ च्या मोसमापासून होत असून आजपर्यंत ५६ वर्ष ही स्पर्धा खेळवली गेली आहे.
🔹कॉमेडी किंग जेरी लुईस यांचे निधन
प्रसिद्ध अमेरिकन विनोदी अभिनेता जेरी लुईस यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी लॉस वेगासमध्ये निधन झाले. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबतच बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी जेरी यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली आहे.
जेरी लुईस यांचा जन्म १६ मार्च १९२६ रोजी झाला होता. त्यांनी निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या होत्या. जेरी यांनी करिअरच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते व कॉमेडीयन डीन मार्टिन यांच्यासोबत काम केले होते. यानंतर त्यांनी टिव्ही शो आणि कॉन्सर्टमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. हॉलिवूडमध्ये त्यांना कॉमेडी किंग म्हणूनही ओळखले जात होते.
‘द नॉटी प्रोफेसर’,‘ द बेलबॉय’, ‘लेडीज मैन’ यासारख्या चित्रपटांमधून अभिनयही केला आहे. अभिनेता डीन मार्टिन आणि जेरी यांचा ‘मार्टिन आणि लुईस’ हा कॉमेडी शो देखील खूप प्रसिद्ध झाला होता. जेरी लुईस यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
🔹USS इंडियाना पोलिसचे ७२ वर्षांनी सापडले अवशेष
दुसर्या महायुध्दाच्या दरम्यान नष्ट झालेले अमेरिकेचे लढाऊ जहाज यूएसएस इंडियाना पोलिसचे अवशेष तब्बल ७२ वर्षांनी मिळाले आहेत. प्रशांत महासागरात अठरा हजार फूट तळात हे अवशेष सापडले आहेत. इंडियाना पोलिस सिक्रेट मिशन पूर्ण करुन परतताना हे जहाज बुडाले होते. जपानच्या पाणबुडीने या जहाजावर निशाणा साधून जहाज नष्ट केले होते.
सीक्रेट मिशन अंतर्गत हे जहाज अणुबॉम्बचा पुरवठा करण्यासाठी गेले होते. हे अणुबॉम्ब नंतर हिरोशिमामध्ये वापरण्यात आले होते.
जहाजमध्ये ११९६ लोक उपस्थित होते. पैकी ३१६ जणांनाच वाचवण्यात यश आले होते. अमेरिकेच्या नाविक इतिहासात ही दुर्घटना महत्त्वाची मानली जाते.
यूएसएस इंडियाना पोलिसला ३० जुलै १९४५ ला फिलीपिन्सच्या समुद्रानजीक असलेल्या गुआम आणि लायते दरम्यान जपानच्या पाणबुडीने नष्ट केले होते. या घटनेत जवळपास आठशे ते नऊशे लोक डुबत्या पाणबुडीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते.
🔹२९८ भारतीयांना पाकचे नागरिकत्व
गेल्या पाच वर्षांत भारतातून स्थलांतरित झालेल्या २९८ नागरिकांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.
सन २०१२पासून १४ एप्रिल २०१७पर्यंत एकूण २९८ भारतीय स्थलांतरितांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. सत्ताधारी मुस्लिम लीगचे (नवाझ गट) नॅशनल असेब्लीचे सदस्य शकील रोहील असगर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.
सन २०१२मध्ये ४८, २०१३मध्ये ७५, २०१४मध्ये ७६, २०१५मध्ये १५, २०१६मध्ये ६९ आणि १४ एप्रिल २०१७पर्यंत १५ जणांना नागरिकत्व देण्यात आले आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व मिळविणे ही एक अवघड प्रक्रिया आहे; पण भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार येथून बेकायदा पद्धतीने आलेले स्थलांतरित पाकिस्तानमध्ये राहण्यास प्राधान्य देतात. त्यांच्याकडून नागरिकत्व देण्याची मागणी होत असते. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या नागरिकाबरोबर लग्न केलेल्या एका विधवा भारतीय महिलेला गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या आदेशाने नागरिकत्व देण्यात आले होते. तिचा अर्ज सन २००८पासून प्रलंबित होता.
🔹वॉशिंग्टन डीसीप्रमाणे दिल्लीलाही मिळणार सुरक्षा कवच
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे. अमेरिकाच हे सुरक्षा कवच आपल्या देशाला उपलब्ध करून देणार आहे. केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध सध्या तणावाचे आहेत, चीनने तर वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे. अशात राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊनच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यावर क्रूझ मिसाईल, ड्रोन किंवा एअरक्राफ्टद्वारे हल्ला झाला तर यापैकी कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षण व्हावं ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा वापर करण्यात येणार आहे. ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ ही सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याबाबत सध्या केंद्रात चर्चा सुरू आहे अशीही माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या नास्मस या कंपनीने भारतीय वायुदल आणि इतर सरकारी एजन्सींना या यंत्रणेचं प्रेझेंटेशन दिलं आहे.
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी या शहराच्या सुरक्षेची जबाबदारीही २००५ पासून नास्मस या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. फक्त अमेरिकाच नाही तर स्पेन, नेदरलँड, नॉर्वे आणि फिनलँड या देशांच्या सुरक्षेतही नास्मस या कंपनीचं मोठं योगदान आहे.
शत्रू राष्ट्राने एअरक्राफ्ट, ड्रोन किंवा मिसाईल यांच्या मार्फत हल्ला करण्याआधीच नास्मस कंपनीची यंत्रणा त्याचे अस्तित्त्व हवेतच संपवून टाकते. त्याचमुळे नास्मस ही कंपनी ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ या प्रकारची सुरक्षा यंत्रणा पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
मुंबईलाही सुरक्षा?
‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा हा प्रयोग भारतीय स्वदेशी बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स शिल्डच्या प्रकल्पासोबत होणार आहे. स्वदेशी बनावटीच्या बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स शिल्डच्या प्रकल्पाच्या अंतर्गत दिल्लीला सुरक्षा पुरविली जाणार आहे. तसेच मुंबईलाही ही सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती समोर येते आहे.
🔹‘रोसनेफ्ट’कडून एस्सार ऑईलची खरेदी पूर्णत्त्वास
एस्सार ऑईलने आपला व्यवसाय रशियन कंपनी रोसनेफ्टला 83 हजार कोटी रुपयांना विक्री करण्यासाठीचा व्यवहार पूर्ण केल्याची घोषणा सोमवारी केली. एस्सार ऑईलकडे बँकांचे 45 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याने या व्यवहाराला विलंब लागला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्यातील ब्रिक्स परिषदेवेळी 15 ऑक्टोबरला या व्यवहाराची घोषणा करण्यात आली होती.
या व्यवहाराला जून महिन्यात एलआयसीसमवेत अन्य कर्जदात्यांनी हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी मंजुरी दिली होती. हा व्यवहार जुलै महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होईल असे सांगण्यात येत होते. कंपनीजवळ एलआयसीचे 1,200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि अन्य 23 संस्थांकडून कंपनीने कर्ज घेतले आहे. या संस्थांच्यावतीने एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या नेत्वृत्त्वाच्या समुहाने या व्यवहाराला मंजुरी दिली होती. याचप्रमाणे रोसनेफ्टला हिस्सेदारी विक्री करण्यासाठी एस्सार ऑईलच्या समभागांना जारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. कंपनी एसबीआय, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, आयडीबीआय बँक आणि स्टॅन्डर्ड चार्टर्ड समवेत अन्य कर्जदात्यांना 70 हजार कोटी रुपयांचे देणे देईल. यामुळे कंपनीवरील कर्जाचे ओझे 60 टक्क्यांनी कमी होईल, असे एस्सार कॅपिटल कंपनीचे संचालक प्रशांत रुईया यांनी म्हटले.
एस्सार ऑईल आणि रोसनेफ्ट दरम्यानचा हा व्यवहार देशातील सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त रशियाकडून विदेशात करण्यात आलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे.
🔹टी-90 रणगाडा होणार अधिक घातक
तिसऱया पिढीची क्षेपणास्त्र प्रणाली बसविणार
सैन्य आपल्या क्षमतांमध्ये वाढ करण्याच्या प्रयत्नात असून यादृष्टीने टी-90 या मुख्य रणगाडय़ाला तिसऱया पिढीच्या क्षेपणास्त्र प्रणालीने युक्त करून आणखीन सक्षम करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. वर्तमानात टी-90 रणगाडा लेजर निर्देशित आयएनव्हीएआर क्षेपणास्त्र प्रणालीने सज्ज असून त्याच्याजागी तिसऱया पिढीच्या क्षेपणास्त्रांना तैनात करण्याचा निर्णय सैन्याने घेतला.
टी-90 रणगाडा भारतीय सैन्याच्या आक्रमक शस्त्रास्त्रांचा मुख्य स्रोत आहे. क्षेपणास्त्राला 800-850 एमएमचा डीओपी गाठावा लागेल. दिवसासोबत रात्री देखील 8 किलोमीटरच्या अंतरापर्यंतचे लक्ष्य भेदण्यास सक्षम व्हावे लागेल. स्थिर तसेच गतिमान लक्ष्यांना भेदण्याची क्षमता यात निर्माण केली जाईल.
टी-90 रणगाडय़ांसाठी मॉडय़ूलर इंजिन निर्मितीच्या प्रकल्पावर सैन्य काम करत आहे. या इंजिनामुळे अधिक उंचीवर होणाऱया लढाईत देखील हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. भारतीय उपखंडात सुरक्षा विषयक आव्हाने वाढल्याने सरकारने सैन्याची आक्रमण क्षमता वृद्धीसाठी अनेक पावले उचलली आहेत.
🔹आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या अध्यक्षपदी कौशिक बसू
23 जून 2017 रोजी भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या (आयईए) अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असणार आहे.
आयईए जगभरातील व्यावसायिक अर्थतज्ज्ञांचे नेतृत्व करणारा प्रथम महासंघ असून, जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला आकार देण्याचे व संशोधनाचे काम हा महासंघ करत असतो.
कौशिक बसू याआधी कॉर्नेल विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टडीज विभागात प्रख्यात व्याख्याते म्हणून कार्यरत होते.
2009 ते 2012 या काळादरम्यान कौशिक बसू यांनी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कारभार पार पाडले आहे.
तसेच 2012 ते 2016 दरम्यान जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.