Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, August 21, 2017

    तुमचा फोन ट्रॅक होतोय! कसे ओळखाल ?

    Views

    तुमचा फोन ट्रॅक होतोय! कसे ओळखाल ?








    सुरक्षितता हा स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेचा विषय. कारण, डाटा लिक झाल्याच्या, कोणाचे अकाऊंड हॅक झाल्याच्य बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. यात तुमचा स्मार्टफोनही अपवाद नाही. त्यामुळे तूमचा फोनही ट्रॅक होऊ शकतो. आपला फोन ट्रॅक होतोय हे कसे ओळखाल?


    मुंबई : सुरक्षितता हा स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेचा विषय. कारण, डेटा लिक झाल्याच्या, कोणाचे अकाऊंट हॅक झाल्याच्य बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. यात तुमचा स्मार्टफोनही अपवाद नाही. त्यामुळे तूमचा फोनही ट्रॅक होऊ शकतो. आपला फोन ट्रॅक होतोय हे कसे ओळखाल?
    टेकनीक हा सायबर क्षेत्रातील प्रत्येक चोरीवरचा रामबाण उपाय आहे. एकदा का हे टेकनीक तुम्हाला समजले की, तुम्ही सायबर क्षेत्रातील कोणतीही चोरी चुटकीसरशी पकडू शकता. आता स्मार्टफोन ट्रॅकींगचेच घ्या ना. तूमचा फोन ट्रॅक होतोय हे टेकनिकद्वारे तुम्ही ओळखू शकता. कसे ते घ्या जाणून...

     स्मार्टफोनची बॅटरी डाऊन होणे

    अनेकदा असे दिसते की, अचानकपणे स्मार्टफोनची बॅटरी सारखीच डाऊन होऊ लागते. इतकी की, सतत चार्जर किंवा पॉवर बॅंक सोबतच घेऊन फिरावे लागते. असा प्रकार घडत असेल तर, वेळीच सावध व्हा. एखाद्या माहितगार माणसाकडून एखादे चांगेल स्वॉफ्टवेअर डाऊनलोड करून ट्रॅकींगचा व्हायरस फोनमधून काढून टाका.

    फोन अचानक बंद होणे

    अनेकदा फोनमध्ये बॅटरी फूल असते. पण,फोन मध्येच बंद होण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळीही काही सॉफ्टवेअरनी तुमच्या नकळत तुमच्या फोनमध्ये शिरकाव केलेला असतो, हे समजून जा.



     बॅकग्राऊंड नॉईज


    अनेकदा आपल्याला फोनवर बॅकग्राऊंड नॉईज, बोलताना फोन मध्येच कट होणे, योग्य नंबर डायल करूनही भलत्याच माणसाला फोन लागणे, असे प्रकार घडतात. हा प्रकारही फोन ट्रॅकींगचाच एक भाग आहे.

     चुकीची अक्षरे टाईप होणे 

    अनेकदा फोनमध्ये टाईप करत असताना चुकीची अक्षरे टाईप होतात. जसे की अंक टाईप करताना आपल्या स्थानिक किंवा इंग्रजी भाषेत न टाईप होता विरामचिन्हे टाईप होणे. आपल्याला अवगत नसलेली भलत्याच कोणत्या तरी भाषेत टाईप होणे, असे प्रकार घडतात. अनेकदा नको त्या भाषेत संदेशही प्राप्त होतात अशा वेळीही आपला फोन ट्रॅक होतोय असा संशय घ्यायला हरकत नाही.
     दरम्यान, वरील प्रकार घडल्यावर लगेच  आपला फोन ट्रॅकच होतोय, असे वाटून घेऊ नका किंवा घाबरूही नका. काही वेळा चुकून चुकीच्या कमांड गेल्यानेही फोनमध्ये असे प्रकार घडतात. त्यामुळे शांतपणे तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.


    सौजन्य-झी मीडिया