इंटरनेचा इतिहास
१९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार? या भीतीपोटी त्यांनी चार केंद्रे स्थापून ती एकमेकांना जोडली. हेतू हा की कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील. हेच आर्पानेट. युध्द संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व आर्पानेटचा विस्तार झाला.
नवीन संशोधन व माहितीची देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरू झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि 'इंटरनेट` चा खऱ्या अर्थाने उपयोग सुरू झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणाऱ्या नेटवर्कमध्ये रूपांतरीत झाले. आता इंटरनेटमध्ये लक्षावधी नेटवर्क असून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेटमुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे.
What is ERNET?
भारतात एज्युकेशन (e) आणि रिसर्च (r) यासाठी इरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे. भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे.
baud rate??
मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
TELNET??
टेलनेट नावाचा प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते.
USENET??
सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.
Gopher??
गोफर या नावाच्या प्रोग्रॅम मध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्यामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते.