Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१)

                                लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१) 



    लॉर्ड आयर्विनच्या काळातील महत्वपूर्ण घटना –


    १) सायमन कमिशन :

    1. १९१९ च्या माँटेग्यु चेम्सफोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतात सायमन कमिशन पाठविण्याची घोषणा केली. तेंव्हा ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से mमॅक्डोनॉल्ड हे होते. घोषणेनुसार त्यांनी ७ सदस्य असलेली एक समिती इस. १९२७ मध्ये नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर जॉन सायमन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीतील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला. 
    2. इस. १९२८ मध्ये सायमन कमिशनने भारतभर दौरा केला. ठिकठिकाणी “सायमन गो बॅंक” ही घोषणा देवून सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. अशाच एका मोर्चाचे नेतृत्व करणा-या लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला. थोड्या दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
    3. १० ऑगस्ट १९२८ रोजी नेहरू अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मुस्लीम लीग व हिंदू महासभेने नेहरू अहवाल फेटाळून लावला. 
    4. लॉर्ड आयर्विनने ऑक्टोबर १९२९ मध्ये भारताला “डोमेनियन स्टेट” चा दर्जा देण्याची घोषणा केली. यालाच “दीपावली घोषणा” असे म्हटले गेले. 
    5. इस. १९२९ मध्ये कॉंग्रेसचे लाहोर येथे अधिवेशन भरले. लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. २६ जानेवारी १९३० रोजी प्रथम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
    २) सविनय कायदेभंग चळवळ :

    1. इंग्रजांनी नेहरू अहवाल फेटाळल्यामुळे महात्मा गांधीजीनी १२ मार्च १९३० रोजी सविनय कायदेभंग आंदोलन सुरु केले.
    ३) गोलमेज परिषद :

    1. सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी इंग्लंडमध्ये १९३० मध्ये पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु असल्यामुळे कॉंग्रेसचा एकही प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषदेला हजर नव्हता.
    2. सायमन कमिशनने केलेल्या शिफारशी नुसार भारतातील विविध पुढा-याना इंग्लडमधे भारतीय कायद्या विषयी विचार विनिमय करण्यासाठी बोलावण्यात आले.
    3. ४ ऑक्टो १९३० रोजी बाबासाहेब ’व्हॉइसरॉय ऑफ इंडिया”  या बोटीने मुंबईहुन लंडनला निघाले. याच काळात भारतात गांधीजीनी असहकारतेची चळवळ संपुर्ण ताकत लावुन उभी केली. ब्रिटिशाना सळो की पळो करणारी असहकारतेची चळवळ  अत्यंत प्रखरतेने चालविण्यात सर्व शक्ती एकवटुन कामाला लागल्या मुळे व सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्यामुळे गांधी या गोलमेज परिषदेस गेले नाही.
    4. १९३१ मध्ये दुसरी तर १९३३ मध्ये तिसरी गोलमेज परिषद लंडनला आयोजित करण्यात आली.
    ४) गांधी – आयर्विन करार (१९३१) :

    1. महात्मा गांधीजीनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घ्यावे आणि लंडनमध्ये आयोजित केलेल्या दुस-या गोलमेज परिषदेला हजर राहावे, याकरिता व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन व महात्मा गांधी यांच्यात ०३ मार्च १९३१ रोजी एक करार झाला.
    2. करारातील प्रमुख कलमे खालीलप्रमाणे होते
    अ) जकीय कैद्यांची सुटका व्हावी. त्यांच्यावरील दावे काढून टाकावेत. वटहुकूम परत घ्यावेत.

    ब) मिठावरील कर काही प्रमाणात रद्द व्हावा. गरिबांना मीठ तयार करण्यास परवानगी मिळावी.

    क) परदेशी दारू व माल विकणार्या दुकांनांवर शांततामय निदर्शने करण्याचा हक्क असावा.

    ड) कायदेभंग चळवळीत सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली आहे, ती त्यांना परत करावी.

    इ) कायदेभंग चळवळ स्थगित व्हावी.

    ई) राष्ट्रसभेने गोलमेज परिषदेत सहभाग घ्यावा.

    फ) बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.

    1. या करारानुसार महात्मा गांधीनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन मागे घेतले व ७ सप्टेंबर १९३१ रोजी सुरु झालेल्या दुस-या गोलमेज परिषदेत भाग घेतला.
    2. गोलमेज परिषदेच्या दुस-या अधिवेशनाला हजर राहिलेले महात्मा गांधी हे राष्ट्रीय कॉंग्रेसचे एकमेव प्रतिनिधी होते. 
    3. भगतसिंग व त्यांच्या क्रांतिकारी मित्रांनी सँडर्सची गोळ्या घालून हत्या केली. 
    4. दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोट घडवून आणण्यात क्रांतिकारी यशस्वी ठरले. 
    5. १९२९ मध्ये तुरुंगात असताना जतीन दास यांनी ६४ दिवसांचे उपोषण करून प्राणत्याग केला.

    No comments:

    Post a Comment