Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३)


    लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३) च्या काळातील महत्वाच्या घटना 




     कंपनीमध्ये प्रशासन कार्यक्षम बनविण्यासाठी सर्वांगीण सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न


    प्रशासकीय व अंतर्गत सुधारणा -
    1. संचालक मंडळीच्या आप्त स्वकीयांना दिली जात असलेली अनेक अनावश्यक पदे रद्द केली .
    2. १७७८ - व्यापाऱ्यांऐवजी प्रतिनिधींशी खरेदीचे करार .
    3. जमीन महसुल रक्कम कायम करण्यात आली व ती गोळा करुन भरण्याची जबाबदारी जमीनदारांकडे सोपवली.
    4. जमीन व महसुल बाबत लहान - सहान तंटे सोडविण्याचे काम जमीनदारांकडे सोपवले.
    5. जिल्हाधिकारीचे महसुलसंबंधी न्यायदानाचे अधिकार काढून घेऊन ते महसुल मंडळाकडे सोपविण्यात आले .
    6. कंपनीच्या अमलाखालील प्रदेशाची एकूण ३५ जिल्ह्यांची विभागणी २३ वर आणली .
    7. जिल्हाधिकारी प्रमुख असून तो महसुल मंडळाला प्रत्यक्षपणे जबाबदार व तो युरोपियन असला पाहिजे असा दंडक केला .
    8. कॉर्नवॉलिसने शासनाच्या प्रत्येक खात्याचे कामकाज विशिष्ट पद्धतीने होण्यासाठी तपशीलाने नियम तयार केले .
    9. जिल्हाधिकारी हा जिल्हा व केंद्र सरकार यातील प्रमुख दुवा म्हणून शासकीय कार्याचा केंद्रबिंदू .
    10. १७९० गव्हर्नर जनरलचे पद स्विकारल्यानंतर कॉर्नवॉलिसने टिपू विरूद्ध युद्ध पुकारले.मार्च १७९२ श्रीरंगपट्टणचा तह इंग्रज व टिपू सुलतान यांच्यात झाला .
    11. अवधच्या नवाबाकडून इंग्लिश फौजेकरिता ५० लाख रुपये रक्कम वसूल केले
    12. युरोपियनांना दिल्या जाणाऱ्या व्यापारी सवलती रद्द केल्या .
     न्याय खात्यात सुधारणा
    1. दिवाणी अदालत नावाची मुलकी न्यायालये जिल्हाधिकारीचे कार्यक्षेत्रात असण्याची व्यवस्था कॉर्नवॉलिस ने केली .
    2. जिल्हा न्यायालयांच्याव र कोलकाता , ढाका , पाटणा , मुर्शिदाबाद येथे चार प्रांतिक  न्यायालये स्थापन केली .
    3. खालच्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात एक फौजदारी न्यायालय स्थापन केले .
    4.  जिल्ह्याची लहान लहान क्षेत्रात विभागणी करुन त्या प्रत्येक भागावर एका दरोग्याची नियुक्ती केली .
    5. सर्व दरोग्यांवर जिल्ह्याच्या ठिकाणी नेमलेल्या कंपनी अधिकाऱ्याची देखरेख व नियंत्रण असे .
    १७९३ - लॉर्ड कॉर्नवॉलिस निवृत्त 

    No comments:

    Post a Comment