Current affairs | Evening News Marathi
Current affairs 30 May 2020 Marathi |
30 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
मुंबईच्या VAMS ग्लोबल कंपनीने जगातले पहिले कॉन्टॅक्टलेस विझिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेयर विकसित केले
मुंबईच्या VAMS ग्लोबल या कंपनीने ‘VAMS सेफगार्ड’ या नावाने स्वयंचलित मार्गाने शरीराचे तापमान आणि मास्क यांची तपासणी करणारे जगातले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘कॉन्टॅक्टलेस विझिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेयर’ विकसित केले आहे.
शरीराचे तापमान तपासणारे उपकरण आणि कॅमेरा अश्या उपकरणांचा वापर करून कोविड-19 रोगाची लक्षणे असणारी व्यक्ती, व्यक्तीने मास्क घातला आहे किंवा नाही आणि सामाजिक अंतर पाळले जात आहे किंवा नाही अश्या महत्त्वाच्या बाबींवर स्वयंचलित मार्गाने नजर ठेवणारी ही यंत्रणा आहे. ही प्रणाली संपर्कविरहित असल्यामुळे अगदी सुरक्षित आहे. 18 इंच अंतरावरुन एखाद्याची माहिती केवळ 3 ते 5 सेकंदात गोळा केली जाऊ शकते.
आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिन: 29 मे
दरवर्षी 29 मे या दिवशी संकायुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिन’ पाळला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामात बलिदान देणाऱ्या गणवेशधारी आणि नागरी कर्मचार्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.
2020 साली आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिन ‘विमेन इन पीसकीपिंग: ए की टू पीस’ या संकल्पनेखाली पाळला गेला.
या वर्षाची संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेनी स्वीकारलेल्या ‘महिला, शांती आणि सुरक्षा यासंदर्भातला ठराव क्रमांक 1325’ याच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ठरविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment