Current affairs | Evening News Marathi
Current affairs 29 May 2020 Marathi |
29 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘आधार’ निगडीत ई-KYC याच्या माध्यमातून ‘इन्स्टंट PAN’ देणाऱ्या सुविधेचा प्रारंभ
दिनांक 28 मे 2020 रोजी केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ‘आधार’ निगडीत ई-KYC याच्या माध्यमातून ‘इन्स्टंट पॅन (PAN)’ देणाऱ्या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
वैध आधार क्रमांक आणि 'आधार'कडे नोंदविलेला मोबाईल क्रमांक असलेल्या व्यक्तींनी कायमस्वरूपी खाता क्रमांक (Permanent Account Number -PAN) मिळविण्यासाठी अर्ज केला असल्यास, त्यांना आता ही सुविधा उपलब्ध असणार. तात्काळ PAN देण्याची ही प्रक्रिया कागदविरहित असून अर्जदारांना इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ई-PAN विनामूल्य देण्यात येत आहे.
पश्चिम नौदल कमांड येथे ‘अतिनील निर्जंतुकीकरण कक्ष’ ही सुविधा कार्यरत
पश्चिम नौदल कमांडमधील नौदल डॉकयार्ड (मुंबई) येथे ‘UV-C’ प्रकाशयोजनेसाठी एल्युमिनियम शीट्सच्या विद्युतीय व्यवस्थेच्या बनावटीद्वारे एका मोठ्या सामान्य खोलीचे ‘अतिनील निर्जंतुकीकरण कक्ष’ या सुविधेत रूपांतर करण्यात आले आहे. या सुविधेला ‘UV सॅनिटायझेशन बे’ असे नाव देण्यात आले आहे.
सुविधेत अतिनील किरण उत्सर्जित करणारे दिवे बसविण्यात आले आहे. या अतिनील उपकरणाचा उपयोग कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने, कपडे आणि इतर विविध वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जाणार आहे.
नामांकित संशोधन संस्थाच्या अभ्यासानुसार, UV-C या प्रकाशकिरणांचा विघातक परिणाम SARS, इन्फ्लूएंझा इत्यादी श्वसन रोगकारकांवर परिणामकारक रित्या सिद्ध झाला आहे.
No comments:
Post a Comment