Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 May 2020 Marathi |
16 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
भारताच्या कोविड-19 सामाजिक संरक्षण प्रतिसाद अभियानासाठी जागतिक बँकेची 1 अब्ज डॉलरची मदत
भारताच्या कोविड-19 सामाजिक संरक्षण प्रतिसाद अभियानाला गती आणि पाठबळ देण्यासाठी जागतिक बँकेनी 1 अब्ज डॉलर एवढ्या निधीची मदत जाहीर केली आहे. हा निधी दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये त्वरित 750 दशलक्ष डॉलरची मदत केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात वर्ष 2021 साली उर्वरित 250 दशलक्ष डॉलर दिले जाणार आहेत.
या मदतीपैकी 750 दशलक्ष डॉलरबाबतच्या करारावर भारत सरकार आणि जागतिक बँकेनी 15 मे 2020 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. या निधीतून कोविड-19 महामारीचा विपरीत परिणाम झालेल्या गरीब आणि दुर्बल कुटुंबांना मदत केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन: 16 मे
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात दरवर्षी 16 मे या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन’ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या दैनंदिन जीवनात प्रकाशावर आधारित असलेल्या तंत्रज्ञानाद्वारे पार पाडल्या जाणार्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी जनजागृती पसरविण्यासाठी जागतिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
1960 साली 16 मे रोजी थिओडोर मैमन या भौतिकशास्त्रज्ञाने केलेल्या लेजर प्रकाशाच्या पहिल्या यशस्वी प्रयोगाच्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment