Current affairs | Evening News Marathi
Current affairs 17 May 2020 Marathi |
17 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची चार वर्षे पूर्ण
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (PMUY) नुकतीच चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे देशभरातल्या आठ कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांच्या जीवनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी दिला जातो. महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.
जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन: 17 मे
संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) यांच्या नेतृत्वात दरवर्षी 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच 2020 साली हा दिवस “कनेक्ट 2030: ICTs फॉर द सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स (SDGs)” या संकल्पनेखाली पाळला गेला.
हा दिवस 17 मे 1865 रोजी स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचा (ITU) स्थापना दिन म्हणून ओळखला जात होता. या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे आणलेल्या सामाजिक बदलांविषयी जागतिक जागृती वाढविणे आणि डिजिटल विभाजन कमी करण्यात मदत करणे हे आहे.
No comments:
Post a Comment