Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 February 2020 Marathi |
13 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला
भारतीय स्त्रीवादी विद्वान आणि कार्यकर्त्या गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला आहे. डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार सेन यांना स्त्री-पुरुष समानता (वर्तमान श्रेणी) या गटात दिला जात आहे.
डेबोरा डिनीझ आणि सेन यांना हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जात आहे. डेबोरा डिनीझ हे इंटरनॅशनल प्लान्ड पॅरेन्टहुड फेडरेशन-वेस्टर्न हेमिस्फेयर रिजन यासाठी हक्क व न्याय केंद्राचे उपसंचालक आहेत.
इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. मे 2020 या महिन्यात तेल अवीव येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात तीन गटात सहा जणांना हा सन्मान दिला जाणार आहे.
‘BIMSTECच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात परिषद’चे नवी दिल्लीत आयोजन
नवी दिल्लीत ‘BIMSTECच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात परिषद’ आयोजित करण्यात आली. 13 फेब्रुवारी 2020 रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे आयोजन भारत सरकारचे ‘अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या तर्फे करण्यात आले.
BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम / Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation) ही सात देशांची संघटना आहे. या समूहात बंगालच्या उपसागरालगतच्या भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सात देशांचा समावेश आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment