Current affairs | Evening News Marathi
Current affairs 21 January 2020 Marathi |
21 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
दिल्लीत ‘युथ को: लॅब - नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा संपन्न झाली
17 जानेवारी ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत दिल्लीत ‘युथ को: लॅब - नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेत अव्वल ठरलेले चार संघ आता एप्रिल 2020 या महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशियात आयोजित केल्या जाणार्या ‘युथ को: लॅब रीजनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
प्रादेशिक आव्हानांना तोडगा काढण्यासाठी तरुणाईला नवकल्पकतेसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
नवी दिल्लीत द्वितीय ‘NIC तंत्रज्ञान परिषद’ संपन्न झाली
नवी दिल्लीत ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ (Tech Conclave) आयोजित करण्यात आली. 21 जानेवारी 2020 रोजी या दोन दिवस चालणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC) या संस्थेच्या वतीने ‘टेक्नॉलॉजीज फॉर नेक्स्ट-जेन गव्हर्नन्स’ या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment