Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 November Marathi |
23 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
दिविना मलौम आणि ग्रेटा थुनबर्ग यांना ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ मिळाला
कॅमरून देशाची 15 वर्षांची दिविना मलौम आणि स्वीडनची 16 वर्षांची ग्रेटा थुनबर्ग यांना यावर्षीचा ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक’ जाहीर झाला आहे.
20 नोव्हेंबर 2019 रोजी जगातील बाल दिनाच्या निमित्ताने हेग (नेदरलँड्स) येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात या पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
विजेत्यांविषयी
2014 साली दिविना मलौमने ‘चिल्ड्रेन फॉर पीस’ नावाची संस्था उघडली. बाल हक्कासाठी झटणारी दिविना मलौम हिने देशातल्या शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांना बोको हरामसारख्या दहशतवादी गटांमध्ये सहभागी होऊ नये असा संदेश दिला तसेच मुलांच्या त्यांच्या हक्कांविषयी जागृती देखील केली.
स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थुनबर्ग हिने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलेल्या क्रांतीसाठी तिला हा पुरस्कार दिला गेला आहे.
परितोषिकाविषयी
बाल हक्कांची वकिली आणि असुरक्षित मुलांची परिस्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या बालकांना आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक दरवर्षी देण्यात येतो.
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथे असलेल्या किड्सराईट्स फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक मार्क डुलार्ट यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार तयार करण्यात आला. नोव्हेंबर 2005 मध्ये रोममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिकाची स्थापना करण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली; तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदी
23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा एकदा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. आता सरकारला विधीमंडळात बहुमत सिद्ध करणे आवश्यक झाले आहे.
नवे सरकार स्थापन करण्याविषयीची कोणत्याही पक्षाची भूमिका स्पष्ट न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे.
पार्श्वभूमी
एकूण 288 जागांसाठी झालेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019’ यामध्ये भाजपने 105 जागा, शिवसेनाने 56, राष्ट्रवादीने 54, काँग्रेसने 44, बहुजन विकास आघाडीने 03, प्रहार जनशक्तीने 02, MIMने 02, समाजवादी पक्षाने 02, मनसेने 01, माकपने 01, जनसुराज्य शक्तीने 01, क्रांतिकारी शेतकरी पक्षाने 01, शेकापने 01, रासपने 01, स्वाभिमानी 01, अपक्षने 13 जागा जिंकल्या.
सरकार स्थापन करण्यासाठी 288 पैकी 145 संख्याबळ गरजेचे असते.
राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात सर्वाधिक जागा जिंकणार्या भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपने त्याला नकार दिला. त्यानंतर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही दिलेल्या वेळेत सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा आमदारांचा पाठिंबा मिळालेला नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 12 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यघटनेच्या कलम 356 नुसार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.
राष्ट्रपती राजवटीत कधीही कोणत्याही पक्षांकडे बहुमताची समीकरणे जमली तर तशा पत्रांसह ते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी अनिश्चित असतो.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment