Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 November Marathi |
22 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
भारताचा नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) प्रकल्प
India's National Intelligence Grid (NATGRID) project
NATGRID बाबत
About NATGRID
नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) या प्रकल्पाची सुरूवात 2009 साली करण्यात आली. डिजिटल सामाजिक माध्यमांच्या खात्यांना केंद्रीय डेटाबेस म्हणजेच नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) याच्याशी जोडण्याची भारत सरकारची योजना आहे.
नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) यावर खात्यांची संपूर्ण माहिती इमिग्रेशन एंट्री, बँकिंग आणि फोन क्रमांक अश्या विविध बाबींविषयीची माहिती संकलित केली जाणार, ज्यामुळे आजच्या सायबर जगात पोलीस तपासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आहे.
दूरसंचार, करासंबंधी अहवाल, बँक, इमिग्रेशन यासारख्या 21 संघांच्या 11 कार्यालयांकडून या व्यासपीठावर माहिती गोळा केली जाते. गुप्तचर विभाग (IB), रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW) यासारख्या सुमारे 10 केंद्रीय संस्था त्यामधली साठविलेली माहिती सुरक्षित मार्गाने प्राप्त करतात.
जागतिक दूरदर्शन दिन: 21 नोव्हेंबर
World Television Day: November 21
दूरदर्शन (टेलिव्हिजन) हे एक प्रसार माध्यम आहे जे मनोरंजन, शिक्षण, बातम्या, राजकारण, गप्पाटप्पा इत्यादी प्रदान करते. आज घराघरात दूरदर्शन संच उपलब्ध आहे. एका अभ्यासानुसार, 2023 सालापर्यंत जागतिक पातळीवर कुटुंबांकडे एकूण 1.74 अब्जांहून दूरदर्शन संच असतील.
दिनाचा इतिहास | The history of the day
दिनांक 21 आणि 22 नोव्हेंबर 1996 रोजी अमेरिका या देशाने पहिला जागतिक दूरदर्शन मंच (WTF) आयोजित केला. लोकांना माहिती पुरवण्यामध्ये दूरदर्शन संचाचे महत्व आणि बदलत्या जगात त्याची नक्की काय भूमिका असेल यावर या सभेत चर्चा झाली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी दिनांक 17 डिसेंबर 1996 रोजी ठराव मंजूर करीत, 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day) म्हणून साजरा करायला सुरुवात केली.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरूवातीला जागतिक पातळीवर बर्याच लोकांनी दूरदर्शन संच बनविण्यात विशेष कामगिरी केली होती. फिलो टी. फर्न्सवर्थ, चार्ल्स फ्रान्सिस जेनकिन्स, व्लादिमीर कोस्मा झ्वोरीकिन या शास्त्रज्ञांनी एक व्यवसायिक दूरदर्शन संच बनविण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. अमेरिकेचे फिलो फर्न्सवर्थ या संशोधकाने 1927 साली जगातली पहिली परिपूर्ण इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन सिस्टम तयार केली, ज्यामध्ये रिसीव्हर आणि कॅमेर्याचा समावेश होता.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment