Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 12 October Marathi | 12 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
वर्ष 2019-20 मध्ये भारताचा GDP वृद्धीदर 6.1 टक्के असेल: इंडिया रेटिंग
India's GDP growth rate for 2019-20 will be 6.1 percent: India rating
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (Ind-Ra) या संस्थेनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (GDP) अंदाज गेल्या दोन महिन्यांत दुसर्यांदा कमी केला आहे. हा अंदाज 6.1 टक्के इतका वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात वर्तविण्यात आलेल्या 7.3 टक्क्यांच्या अंदाजात घट करून 6.7 टक्क्यांवर आणला गेला होता.
‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारताचा समावेश
India included in 'G20 Global Smart Cities Alliance'
‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारत सामील झाला आहे. स्मार्ट शहरे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व नैतिक वापर करण्याच्या दिशेने कार्य करणार्या जगातल्या अग्रगण्य शहरांच्या जाळ्यातल्या 15 सदस्यांना सामील झाला आहे. जागतिक आर्थिक मंचाचा (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स’ हा समूह सार्वजनिक जागांवर जोडल्या गेलेल्या उपकरणांच्या वापरासाठी जागतिक मानदंड आणि धोरणांचे मानक तयार करणार आहे.
No comments:
Post a Comment