Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, July 17, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 17 July 2019 Marathi | 17 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 July  2019 Marathi | 
      17 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी



    झाकीर हुसेनसह 4 जणांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर

    जागतिक कीर्तीचे तबलावादक झाकिर हुसेन, नृत्यांगना सोनल मानसिंग, नर्तक व नृत्यदिग्दर्शक जतीन गोस्वामी, भरतनाट्यमचे प्रकाराचे नर्तक व शिक्षक के. कल्याणसुंदरम पिल्लई अश्या या चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे.
    अन्य सन्मान
    • तसेच अभिनेत्री सुहास जोशी, पार्श्वगायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह 44 नामवंतांची ‘अकादमी रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
    • उपयोजित कलाक्षेत्रातील सर्वांगीण कामगिरीबाबत देण्यात येणारे पुरस्कार दिवानसिंह बजेली, पुरु दधिच यांना जाहीर झाला आहे.
    ही फेलोशिप प्रत्येकी 3 लक्ष रुपये तर ‘अकादमी रत्न’ पुरस्कार प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा आहे. विजेत्यांना ताम्रपत्र दिले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात.
    अकादमी रत्न पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत,
    संगीत : मणिप्रसाद (हिंदुस्थानी शास्त्रीय गायन), मधुप मुद्गल (गायन), तरुण भट्टाचार्य (संतूरवादन), तजेंद्र नारायण मजुमदार (सरोदवादन), अलामेलू मणि, मल्लाडी सुरीबाबू (कर्नाटकी शैलीचे गायन), के. कासिम व एस. बाबू (नागस्वरम), गणेश व कुमारेश (व्हायोलिन वादन), सुरेश वाडकर, शांती हिरानंद (सुगम संगीत), एच. आशानग्बी देवी (नट संकीर्तन).
    नृत्य : राधा श्रीधर (भरतनाट्यम), इशिरा व मौलिक शाह (कथ्थक - पुरस्कार विभागून), अखाम लक्ष्मी देवी (मणिपुरी), सुरुपा सेन (ओडिशी), गोपिका वर्मा (मोहिनीअट्टम), तानकेश्वर हजारिका (बोर्बायन सत्तरिया), दीपक मजुमदार (समकालीन नृत्य), पशुमूर्ती रामलिंग शास्त्री (कुचिपुडी), तपनकुमार पट्टनायक (छाऊ).
    नाटक : राजीव नाईक (नाट्यलेखन), लाल्तलुअंग्लिआना खिआंग्ते (नाट्यलेखन), संजय उपाध्याय (दिग्दर्शन), एस. रघुनंदन (दिग्दर्शन), सुहास जोशी (अभिनय), टिकम जोशी (अभिनय), स्वपन नंदी (माईम), भागवत ए. एस. नांजप्पा (यक्षगान), ए. एम. परमेश्वरन (कुटियाट्टम).
    लोककला, लोकसंगीत इ. : मालिनी अवस्थी (लोकसंगीत), गाझी खान (बरना लोकसंगीत), नरिंदरसिंह (नेगी लोकसंगीत), निरंजन राज्यगुरू (गुजरात लोकसंगीत), मोहम्मद सादिक भगत (लोकनाट्य), कोटा सचिगानंद शास्त्री (हरिकथा), अर्जुन सिंग धुर्वे (लोकनृत्य), सोमनाथ बट्टू (लोकसंगीत), अनुपमा होसकेरे (कळसुत्री बाहुल्या सादरीकरण), हेमचंद्र गोस्वामी (मुखवटे निर्मिती).
    भारताची संगीत नाटक अकादमी
    संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारद्वारे स्थापन करण्यात कलाप्रदर्शनाच्या क्षेत्रात कार्य करणारी राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना दिनांक 31 मे 1952 रोजी झाली. संस्थेकडून अत्यंत प्रतिष्ठित मानले जाणारे फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रात कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सतत कार्यरत आहे.
    संगीत नाटक अकादमी पुरस्कार कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. 1952 साली या पुरस्काराची स्थापना झाली. तसेच संगीत नाटक अकादमी फेलोशिप, रत्न सदस्य या सन्मानांसाठी 1954 सालापासून दरवर्षी निवड केली जात आहे.
    संगीत नाटक अकादमीने आठ भारतीय नृत्य प्रकारांना शास्त्रीय दर्जा प्रदान केला आहेत, ते आहेत –
    • भरतनाट्यम: मूळ तामिळनाडूमधील
    • ओडिसी: मूळ उडीसामधील
    • कुचीपुडी: मूळ आंध्रप्रदेशामधील
    • मोहिनिअट्टम: मूळ केरळमधील (महिलांकडून सादर केले जाते)
    • सत्रिया: मूळ आसाममधील
    • कथकली: मूळ केरळमधील (पुरुषांकडून सादर केले जाते)
    • कथ्थक: मूळ उत्तर भारतामधील
    • मणीपुरी: मूळ मणीपूरमधील


    टाटा ग्रुप हा देशातला सर्वांत मौल्यवान ब्रँड आहेब्रँड फायनान्स

    इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेनी “इंडियाज 100 लिडिंग ब्रॅंड्स 2019” या शीर्षकाखाली देशातल्या सर्वांत मौल्यवान ब्रँडची एका यादी जाहीर केली आहे. त्यात टाटा ग्रुप हा सर्वांत मौल्यवान ब्रँड ठरला असून, त्याचे मूल्य 19.55 अब्ज डॉलर आहे.
    यादीत द्वितीय स्थानी 7.2 अब्ज डॉलरच्या मूल्यासह भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. तर तृतीय स्थानी इन्फोसिस 6.5 अब्ज डॉलरच्या मूल्यासह आहे.
    त्यापाठोपाठ अनुक्रमे चौथ्या ते दहाव्या स्थानावर भारतीय स्टेट बँक (SBI), महिंद्रा अँड महिंद्रा, HDFC बँक, एअरटेल, HCL, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि विप्रो हे ब्रॅंड आहेत.
    देशांतर्गत बँकिंग बाजारपेठ विविध आव्हानांचा सामना करीत असून देखील देशातल्या 14 बँकांचा या यादीत समावेश झाला आहे.

    No comments:

    Post a Comment