एका ओळीत सारांश, 19 जून 2019
पर्यावरण
यावर्षी पावसामुळे या खाडीत सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते असा लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तविला आहे - मेक्सिकोची खाडी.
आंतरराष्ट्रीय
दहशतवाद कमी करण्यासाठी वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये हा देश अपयशी ठरला - पाकिस्तान.
राष्ट्रीय
या ठिकाणी 1 ते 4 नोव्हेंबर 2019 या काळात 'वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2019' हा कार्यक्रम आयोजित करणार आहे - नवी दिल्ली.
व्यक्ती विशेष
मिस इंडिया 2019 - सुमन राव.
क्रिडा
WTA टूरवरील नॉटींगहॅम ओपन 2019 महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत एकेरीची विजेती - कॅरोलिनी गार्सिया.
ATP टूरवरील स्टुटगार्ट ओपन 2019 पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचा विजेता - मॅटो बेरेटेनी(इटली).
राज्य विशेष
या राज्य सरकारने देशातले पहिले ‘कौशल्य विद्यापीठ’ उभारण्याचा निर्णय घेतला – आसाम(दारंग जिल्हा).
विज्ञान व तंत्रज्ञान
जागतिक पशू-आरोग्य संघटनेच्या (OIE) मते, जगात दरवर्षी आढळणार्या पाच नवीन संक्रामक मानवी-रोगांपैकी एवढे प्राण्यांपासून होतात - तीन.
सामान्य ज्ञान
वित्तीय कृती कार्यदल (Financial Action Task Force -FATF) - स्थापना वर्ष: सन 1989; मुख्यालय: पॅरीस (फ्रान्स).
जागतिक पशू-आरोग्य संघटना (OIE) - स्थापना वर्ष: सन 1924; मुख्यालय: पॅरीस (फ्रान्स).
महिलांचा टेनिस संघ (WTA) - स्थापना वर्ष: सन 1973; मुख्यालय: सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा.
टेनिस व्यवसायिकांचा संघ (ATP) - स्थापना वर्ष: सन 1972; मुख्यालय: लंडन, ब्रिटन.
आसाम राज्याची राजधानी - दिसपूर.
No comments:
Post a Comment