सुमन रावने “मिस इंडिया 2019” याचा मुकुट जिंकला
यंदाच्या फेमिना ‘मिस इंडिया 2019’ याचा मुकुट राजस्थानच्या सुमन राव हिने जिंकला आहे. सुमन रावला मिस इंडिया 2018 च्या अनुकृती दासने ताज घातला.
30 सौंदर्यवतींनी मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात छत्तीसगडच्या शिवानी जाधवने दुसरे स्थान पटकावले. ती यावर्षी मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. बिहारच्या श्रेया रंजनने तिसऱ्या स्थानी बाजी मारली. ती मिस युनायटेड ब्युटी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
तर, तेलंगणाच्या संजना विज ही देखील रनरअप ठरली. 7 डिसेंबरला होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2019’ मध्ये यंदाचा ‘मिस इंडिया’ किताब पटकावणारी सुमन राव ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आसाम राज्यात ‘कौशल्य विद्यापीठ’उभारले जाणार
आसाम राज्य सरकारने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित संस्था ‘कौशल्य शहर’ म्हणून ओळखली जाईल.
हे देशातले पहिले कौशल्य विद्यापीठ असू शकते, जिथे 10 हजार जागा असतील. त्यापैकी 80 टक्के जागा आसामसाठी राखीव तर उर्वरित जागा ईशान्येकडील राज्यांसाठी राखीव ठेवले जातील.
पाकिस्तान दहशतवाद कमी करण्यातअपयशी ठरला: FATF
दहशतवाद कमी करण्यासाठी वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाकिस्तान या देशाला आधीच चेतावणी दिलेली आहे. निकषांची पूर्तता न झाल्यास देशाला "ग्रे लिस्ट"मध्ये ठेवले जाणार किंवा ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये देखील ठेवले जाऊ शकते. 2018 सालापासून पाकिस्तान FATFच्या ‘ग्रे ग्रुप’मध्ये आहे.
पॅरीस (फ्रान्स) येथे मुख्यालय असलेले वित्तीय कृती कार्यदल (Financial Action Task Force -FATF) ही अग्रगण्य आंतर-सरकारी वित्तीय तपास संस्था आहे. बेकायदेशीर कृत्यांना वित्तीय सहाय्य बंद करण्यासाठी कायदेशीर, नियामक आणि क्रियान्वयन उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही संस्था कार्य करते आणि जागतिक स्तरावर बॅंकांसाठी मानदंड निश्चित करते. FATF ची स्थापना सन 1989 मध्ये करण्यात आली. अमेरिका, ब्रिटन, भारत, जपान, चीन आणि फ्रान्ससह मंडळाचे 38 सदस्य आहेत.
मेक्सिकोची खाडी येथील ‘मृत क्षेत्र’ विस्तारत आहे
नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे मेक्सिकोच्या खाडीत सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.
मेक्सिकोच्या खाडीतले मृत क्षेत्र मिसिसिपी नदीच्या मुखापासून निघणार्या पाण्याने तयार होते, जे जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे मृत क्षेत्र आहे. प्रत्येक उन्हाळ्यात ते उष्णतेने वाढते. जेव्हा उबदार पाण्यामुळे सूक्ष्मजीवांचे चयापचय वाढते आणि वातावरण बदलत असते तेव्हा ही परिस्थिती आणखीनच वाईट होऊ शकते.
मृत क्षेत्र म्हणजे काय?
शहरीकरण आणि कृषी यासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे एकपेशीय वनस्पती (अल्गी) यांचे प्रमाण वाढल्यामुळे जलमार्गांमध्ये ऑक्सीजन नसलेले "मृत क्षेत्र" दिसून येते. या घटनेला “युट्रोफिकेशन” असे म्हणतात.
युट्रोफिकेशनच्या घटनेत नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचे प्रमाण वाढते, जे एकपेशीय वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते. तसेच त्यामधून कार्बन डाय-ऑक्साईड देखील तयार होतो, जो सागरी पाण्याचे pH कमी करते, ज्यामुळे पाण्यात अम्लता वाढते. ही स्थिती माशांच्या वाढीचा वेग कमी करते.
No comments:
Post a Comment