Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 March 2019 Marathi |
20 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
नव्या दिवाळखोरी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी IBBI आणि SEBI यांच्यात करार झाला
भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) आणि भारतीय रोखे व विनिमय महामंडळ (SEBI) यांच्यादरम्यान एक सामंजस्य करार झाला. ‘नादारी व दिवाळखोरी नियम-2016’ याची त्यामधील नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी त्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या कराराच्या अंतर्गत,
भारतातल दिवाळखोरीसंबंधी कारवाई आणि भारतातल्या नादारी व्यवसायिक संस्था (IPA), नादारी व्यवसायिक (IP) आणि इन्फॉर्मेशन यूटिलिटिज (IU) सारख्या संस्थांना हे मंडळ नियमित करते. दिनांक 1 ऑक्टोबर 2016 रोजी मंडळाची स्थापना झाली आणि त्याला नादारी व दिवाळखोरी नियमावलीद्वारे वैधानिक अधिकार दिले गेले आहेत. त्यामध्ये वित्त व कायदा मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या प्रतिनिधीसह 10 सभासद असतात.
भारतीय रोखे व विनिमय महामंडळ (SEBI)
हे भारतामधील सिक्युरिटी (सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने) संदर्भात बाजारपेठेचे नियामक आहे. 1988 साली संस्थेची स्थापना केली गेली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये संस्थेला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. मुंबईत मंडळाचे मुख्यालय आहे.
या कराराच्या अंतर्गत,
- दोन्ही संस्था कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एकमेकांना सहकार्य आणि मदत करतील.
- दोन्ही संस्था मनुष्यबळ आणि स्त्रोतांची देवाणघेवाण करतील.
- नियमित बैठकांद्वारे दोन्ही संस्था परस्परांना प्रभावित करणाऱ्या जबाबदाऱ्या, अंमलबजावणी प्रकरणे, संशोधन आणि माहितीची देवाणघेवाण करतील.
- दोन्ही संस्था परस्परांच्या मनुष्यबळाला प्रशिक्षण देतील.
- दिवाळखोरी कायद्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन्ही संस्था संयुक्तरित्या कार्य करतील.
भारतातल दिवाळखोरीसंबंधी कारवाई आणि भारतातल्या नादारी व्यवसायिक संस्था (IPA), नादारी व्यवसायिक (IP) आणि इन्फॉर्मेशन यूटिलिटिज (IU) सारख्या संस्थांना हे मंडळ नियमित करते. दिनांक 1 ऑक्टोबर 2016 रोजी मंडळाची स्थापना झाली आणि त्याला नादारी व दिवाळखोरी नियमावलीद्वारे वैधानिक अधिकार दिले गेले आहेत. त्यामध्ये वित्त व कायदा मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या प्रतिनिधीसह 10 सभासद असतात.
भारतीय रोखे व विनिमय महामंडळ (SEBI)
हे भारतामधील सिक्युरिटी (सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने) संदर्भात बाजारपेठेचे नियामक आहे. 1988 साली संस्थेची स्थापना केली गेली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये संस्थेला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. मुंबईत मंडळाचे मुख्यालय आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 March 2019 Marathi |
20 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
दिल्लीत आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा संदर्भात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा झाली
दिनांक 18 मार्च 2019 रोजी आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा (Disaster Resilient Infrastructure) संदर्भात दोन दिवस चाललेली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नवी दिल्लीत यशस्वीरित्या पार पडली.आपत्ती जोखिम कमतरता संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (United Nations Office for Disaster Risk Reduction -UNISDR) यांच्या सहकार्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) ही कार्यशाळा आयोजित केली होती. ग्लोबल कमिशन ऑन अडॉप्टेशन (GSA), संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि जागतिक बँक यांच्या भागीदारीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला.
33 देशातले तज्ञ या कार्यशाळेत उपस्थित होते. या तज्ञांमध्ये विकास आणि आपत्ती व्यवस्थापन, विकास बँका, संयुक्त राष्ट्रसंघ, खासगी क्षेत्र, धोरण आखणीकर्ते आणि इतर संबंधितांचा समावेश होता.
आपत्ती स्थितीस्थापक सोयी-सुविधांसाठी एकत्रित कार्य करण्याची गरज भासत आहे आणि त्यामुळे शहरी स्थितीस्थापकत्व ही शाश्वततेची गुरूकिल्ली आहे. त्यासंदर्भात संबंधितांनी राज्य सरकारांसोबत काम करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत वाहतूक, ऊर्जा, दूरसंचार आणि जल यांसारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. हवामानाच्या बदलासंदर्भात नवीन तंत्रज्ञान तसेच निसर्गावर आधारित शोध याविषयावरही चर्चा झाली.
पार्श्वभूमी
भारत सरकार आणि UNISDR यांनी 5 नोव्हेंबर 2016 या कालावधीत झालेल्या सातव्या ‘आपत्ती जोखीम कमतरता संदर्भात आशियाई मंत्री परिषद’ (AMCDRR 2016) यामध्ये सेंडाई कार्यचौकटी संदर्भात सहकार्य घोषणापत्र (Statement of Cooperation on Sendai Framework) या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आली. ‘आपत्ती जोखीम कमतरता संदर्भात सेंडाई कार्यचौकटी’ (Sendai Framework on Disaster Risk Reduction वा SFDRR 2015-2030) याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, उद्दिष्ट्ये आणि सहकार्य क्षेत्र या बाबींवर या घोषणापत्रात स्पष्टता दिली गेली आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 March 2019 Marathi |
20 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
‘हायाबुसा-2’: जपानचे अंतराळयान
‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संस्थेद्वारे संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले. हे यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या निरीक्षणासाठी पाठवले होते.
या अंतराळयानावर असलेले 'रोव्हर' ‘Ryugu’ या नावाच्या अशनीवर उतरविण्यात आले. अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले आहे.
लघुग्रहावरील माती आणि खडकाचे नमुने गोळा केले. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा केले गेले.
अशनी काय आहेत?
सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे अशनी आणि उल्का होय. ‘Ryugu’ हा अगदी प्राथमिक अशनी आहे. या अशनीचा अभ्यास केल्याने ग्रहांच्या निर्मितीबाबत माहिती मिळू शकते. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.
या अंतराळयानावर असलेले 'रोव्हर' ‘Ryugu’ या नावाच्या अशनीवर उतरविण्यात आले. अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले आहे.
लघुग्रहावरील माती आणि खडकाचे नमुने गोळा केले. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा केले गेले.
अशनी काय आहेत?
सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे अशनी आणि उल्का होय. ‘Ryugu’ हा अगदी प्राथमिक अशनी आहे. या अशनीचा अभ्यास केल्याने ग्रहांच्या निर्मितीबाबत माहिती मिळू शकते. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 March 2019 Marathi |
20 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
“सारी-अरका-अॅंटी टेरर 2019”: SCO याचा दहशतवाद-विरोधी सराव
यावर्षी “सारी-अरका-अॅंटी टेरर 2019” या शीर्षकाखाली शांघाय सहकार संघटना (SCO) याचा दहशतवाद-विरोधी सराव आयोजित केला जाणार आहे.उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात रशियाच्या नेतृत्वात SCO समुहाच्या ‘रिजनल अॅंटी-टेररीस्ट स्ट्रक्चर’ (RATS) परिषदेच्या 34 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय बैठकीत "सॉलिडटरी 2019-2021" या नावाने संयुक्त सीमावर्ती कार्यक्रमाचा प्रथम टप्पा आयोजित करण्याविषयीची योजना जाहीर करण्यात आली.
शांघाय सहकार संघटना (SCO)
शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची 2001 साली स्थापना झाली. त्याचे बिजींग (चीन) येथे मुख्यालय आहे. चीन SCO चा संस्थापक देश आहे. भारत 2017 साली समुहाचा पूर्ण सदस्य बनला. वर्तमानात रशियाकडे समूहाचे अध्यक्षपद आहे.
समूहामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 March 2019 Marathi |
20 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
“मित्र शक्ती-6”: भारत आणि श्रीलंका यांचा संयुक्त लष्करी सराव
भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-6” हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे. 2018-19 या वर्षासाठी 26 मार्च ते 8 एप्रिल या काळात श्रीलंकेत हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे.दोन्ही देशाच्या लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘मित्र शक्ती’ लष्करी सराव दरवर्षी आयोजित केला जातो.
दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी डावपेचात्मक कारवाईचा यात समावेश असेल.
श्रीलंका हा हिंद महासागरातला भारताच्या दक्षिणेकडे असणारा एक बेटराष्ट्र आहे. कोलंबो ही देशाची राजधानी असून श्रीलंकाई रुपया हे त्याचे राष्ट्रीय चलन आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 March 2019 Marathi |
20 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
दिल्लीत पोलाद मंत्रालयाची ‘दक्षता परिषद’ संपन्न झाली
दिनांक 20 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीत भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाने आयोजित केलेली ‘दक्षता परिषद’ पार पडली.
अधिग्रहण, करार, कर्मचारी आणि वित्त यासह विविध कार्यांच्या संबंधित महत्त्वाचे प्रशासकीय आणि व्यवसायिक निर्णय घेताना अनुसरण केली जाणारी मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रियांच्या बाबतीत पोलाद निर्मिती क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रमांच्या अधिकार्यांना संवेदनशील बनविण्याचा या परिषदेचा उद्देश होता.
परिषदेत दक्षतेसंबंधी मूलभूत मुद्दे, सार्वजनिक खरेदीसंबंधी नियम आणि नियमांचे पालन करणे, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता, इलेक्ट्रॉनिक खरेदी, GeM, GFR, इलेक्ट्रॉनिक लिलाव, शासनातली नैतिकता, तक्रारीसंबंधी हाताळणी प्रणाली आणि इतर बाबी अश्या मूलभूत मुद्द्यांवर चर्चा झाली.

No comments:
Post a Comment