Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
इराणी नववर्ष हा “नवरोज” सण म्हणून साजरा करतात
20 मार्च 2019 रोजी इराणमध्ये “नवरोज” या वार्षिक सणाचा शुभारंभ झाला.‘वसंत विषुववृत्त’ या उत्तर गोलार्धाकडे झुकणार्या सूर्याच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जातो.
हा दिन जगभरात कित्येक जातीय-भाषिक समुदायांकडून तसेच अनेक देशांमध्ये त्यांचा नववर्ष म्हणून साजरा करतात. भारतात हा दिन पारसी समाजाचा नववर्ष असलेल्या 'नवरोज' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारसी समाजात नवरोज साजरा करण्याची परंपरा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. ग्रेगोरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
अंतराळात NASAने गतिमान पल्सर शोधला
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांनी ‘पल्सर’ ही अंतराळातली अद्भुत घटना शोधून काढली आहे. अलीकडेच झालेल्या सुपरनोव्हाच्या विस्फोटानंतर ‘PSR J0002+6216 (J0002)’ नावाचा गतिमान पल्सर दिसून आला.2017 साली शोधला गेलेला हा पल्सर तासाला सुमारे चार दशलक्ष किलोमीटर एवढ्या अत्याधिक वेगाने मार्गक्रम करीत आहे. याचा वेग एवढा आहे की तो केवळ सहा मिनिटांमध्ये पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यानचे अंतर कापू शकतो.
पल्सर म्हणजे काय?
पल्सर हा अंतरळातला एक प्रकाशमान घटक आहे. हा घटक अत्याधिक केंद्रीत विद्युत चुम्बकीय विकिरणे उत्सर्जित करतो आणि अत्याधिक घनता असलेल्या या घटकाचे गुरुत्वाकर्षण अधिक असते.
मोठ्या तार्याच्या विस्फोटानंतर अत्यंत गतिमान असे स्वताःभोवती फिरणारे न्यूट्रॉन तारे मागे सोडतात. त्यांना पल्सर म्हणून ओळखले जाते. याला ब्रह्मांडाचे प्रकाशस्थान असेही म्हटले जाते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
जागतिक जीवनावश्यक खर्च 2019
इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट या संस्थेनी ‘जागतिक जीवनावश्यक खर्च सर्वेक्षण 2019’ (Worldwide Cost of Living Survey) या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.या सर्वेक्षणात जगभरातल्या शहरांमधील 160 उत्पादने आणि सेवांमध्ये 400 पेक्षा जास्त वैयक्तिक किमतींची तुलना केली गेली.
ठळक मुद्दे
- सिंगापूर, हाँगकाँग आणि पॅरिस (पहिल्यांदाच) या तीन शहरांना जगातल्या सर्वात महागड्या शहरांचे शीर्षक मिळाले आहे. तीनही शहरांमध्ये राहण्याचा खर्च हा न्यूयॉर्कच्या तुलनेत 7% अधिक आहे.
- सिंगापूर सलग सहाव्यांदा या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
- व्हेनेझुएलाची राजधानी काराकास यावर्षीच्या यादीत तळाशी आहे. व्हेनेझुएलातल्या अत्याधिक महागाईमुळे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
नुरसुलतान: कझाकीस्तानच्या राजधानीचे नवे नाव
कझाकीस्तानचे राजधानी शहर असलेल्या ‘अस्ताना’ याचे नाव बदलून ‘नुरसुलतान’ असे नामकरण करण्यात आले आहे. ‘नुरसुलतान’ या शब्दाचा अर्थ कझाक भाषेत "प्रकाशाचा राजा" असा होतो.अंतरिम राष्ट्रपती कासीम-जोमर्त तोकाएव्ह यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला काही तासाभरातच मंजूर करण्यात आले.
कझाकीस्तान हा एक मध्य आशियाई देश आणि माजी सोवियत प्रजासत्ताक आहे. या देशाची राजधानी नुरसुलतान (पूर्वीचे अस्ताना) हे शहर आहे आणि कझाकस्तानी टेंगे हे चलन आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
जागतिक आनंद अहवाल 2019
संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशाचे उच्च सकल स्थानिक उत्पन्न (GDP) असले तरी आणि दरडोई उत्पन्न जास्त असले तरीही ते सर्वाधिक आनंदी देश नाहीत. लोकांचा आनंदीपणा देशातले कायदे आणि नियमांशी निगडीत आहे.
ठळक मुद्दे
- सलग दुसर्यांदा फिनलँड हा जगातला सर्वाधिक आनंदी देश घोषित करण्यात आला आहे.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत सात स्थानांनी खाली घसरत 140 व्या क्रमांकावर आहे.
- सुदान देशाचे लोक त्यांच्या जीवनमानाशी नाखुश आहेत.
14 परिमाणांच्या आधारावर हे सर्वेक्षण केले गेले, ज्यात व्यवसाय व आर्थिक, नागरी प्रतिबद्धता, संपर्क आणि तंत्रज्ञान, विविधता (सामाजिक), शिक्षण व कुटुंब, भावना (कल्याण), पर्यावरण व ऊर्जा, अन्न व निवारा, सरकार व राजकारण, कायदा व सुव्यवस्था (सुरक्षा), आरोग्य, धर्म व नैतिकता, परिवहन आणि कार्य यांचा समावेश आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
वसंत विषुववृत्त 2019
20 मार्च 2019 हा उत्तर गोलार्धामध्ये वसंत ऋतूचा प्रथम अधिकृत दिवस आहे, ज्याला ‘वसंत विषुववृत्त’ (Spring Equinox) म्हणून ओळखले जाते. ही एक खगोलीय घटना आहे.हा दिन भारतात वसंत ऋतूच्या अंतिम दिनाच्या रूपात साजरा केला जातो. या दिनी पृथ्वीची भू-मध्य रेखा सूर्याच्या मध्यातून जाते, ज्यामुळे या दिवशी दिवस आणि रात्री याचा कालावधी समान असतो. ही घटना दरवर्षी 20 मार्च आणि 23 सप्टेंबर असे दोनदा घडते आणि त्यांना वसंत विषुववृत्त आणि शीतकालीन विषुववृत्ताच्या रूपात ओळखले जाते.
या दिनापासून सूर्य हळूहळू उत्तर गोलार्धाकडे झुकतो, ज्यामुळे दिवसाचा काळ मोठा आणि रात्रीचा काळ छोटा होत असतो आणि तापमान वाढू लागते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 March 2019 Marathi |
22 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
शत्रुतापूर्ण अधिग्रहण म्हणजे काय? : एल अँड टी आणि माइंडट्री अधिग्रहण
देशात माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात या काळात एक उद्योग छेडले गेले आहे. देशातल्या लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपनीवर माइंडट्री (Mindtree) या दुसर्या एका माहिती तंत्रज्ञान कंपनीचे जबरदस्तीने अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला. हा आरोप माइंडट्री कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने लावला आहे.L&T कंपनीवर आरोप आहे की कंपनीने व्यवस्थापनाच्या माध्यमातून नाही तर थेट समभाग धारकांद्वारे अधिग्रहनाचा प्रयत्न केला गेला. व्यापाराच्या भाषेत याला ‘शत्रुतापूर्ण अधिग्रहण’ असे म्हणतात.
माइंडट्री ही बेंगळुरू येथील माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.
शत्रुतापूर्ण अधिग्रहण (Hostile Takeover) याची व्याख्या: एका कंपनीला (टारगेट कंपनी) दुसर्या कंपनीकडून (अॅक्वायरर कंपनी) अधिग्रहीत केले जाते, ज्यामध्ये टारगेट कंपनीचे समभाग थेट विकत घेतले जातात किंवा अधिग्रहण मंजूर करवून घेण्यासाठी टारगेट कंपनीचे व्यवस्थापन मंडळ बदलण्यासाठी लढा दिला जातो.
तसं तर कोणत्याही कंपनीत संस्थापक किंवा व्यवस्थापन मंडळाची हिस्सेदारी समभाग धारकांपेक्षा अधिक असतो, परंतु L&T कंपनीच्यातर्फे माइंडट्रीच्या 67 टक्के हिस्सेदारीच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव 10,800 कोटी रूपयांचा आहे. हे देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पहिला शत्रुतापूर्ण केला गेलेला अधिग्रहण असणार.
त्याच्या अंतर्गत L&T कंपनीने कॅफे कॉफी डे कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांची माइंडट्रीमध्ये 20.32 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी एक करार केला आहे. हा सौदा रोख 3,269 कोटी रुपयांमध्ये होणार. त्याव्यतिरिक्त कंपनीने ब्रोकरांना माइंडट्रीची 15 टक्के अतिरिक्त हिस्सेदारी खुल्या बाजारातून खरेदी करण्यासाठी म्हटले आहे.
त्यासाठी कंपनी जवळपास 2,500 कोटी रुपये देय करणार. तर 31 टक्के हिस्सेदारीच्या अधिग्रहणासाठी 5,030 कोटी रुपयांचा खुला प्रस्ताव आहे. त्यासाठी कंपनी प्रति समभाग 980 रुपये देय करणार. याप्रमाणे माइंडट्रीमध्ये L&T जवळपास 67 टक्के हिस्सेदारी अधिग्रहीत करण्यासाठी एकूण 10,800 कोटी रुपये देय करणार.
No comments:
Post a Comment