Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
कर्नाटक सरकार ‘वर्षाधार’ क्लाऊड-सीडिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करणार
राज्यातल्या दुष्काळप्रणव भागात 76 तालुक्यांत येणार्या वर्षाऋतुत अधिकाधिक पाऊस पाडण्याकरिता कर्नाटक राज्य सरकारने ‘वर्षाधार’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘प्रोजेक्ट वर्षाधार’ हा क्लाऊड-सीडिंग तंत्रावर आधारित असलेला प्रकल्प आहे. 2018 साली हा प्रकल्प राबवविला गेला होता, परिणामी 27.9% अधिक पाऊस राज्यात पडला.
क्लाउड सीडिंग म्हणजे काय?
क्लाउड सीडिंग (ढगांचे बीजारोपण) म्हणजे हवामानात सुधारणेचा एक प्रकार आहे, ज्यात ढगांपासून होणार्या पावसाचे प्रमाण सुधारण्यासाठी हवेमध्ये एक विशेष पदार्थ सोडल्या जातो. या प्रक्रियेसाठी सामान्यपणे सिल्वर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड आणि ड्राय आइस (सॉलिड कार्बन डाइऑक्साइड) शिवाय वायू रूपातले लिक्विड प्रोपेन वापरले जाते. क्लाऊड-सीडलींग प्रकल्पासाठी सामान्यपणे दुपारचे 1-4 वाजेपर्यंतचा काळ चांगला असतो. भारतात 2003 साली जल संसाधन मंत्रालयाने ‘प्रोजेक्ट वरुण’ या नावाने पहिला क्लाउड सीडिंग प्रकल्प राबवला होता.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
स्टीफन हॉकिंग यांच्या स्मृतीत ब्रिटन सरकारने ‘ब्लॅक होल’ नाणे प्रसिद्ध केले
कृष्णविवराबाबत अनेक खुलासे करणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या स्मृतीत ब्रिटनच्या रॉयल मिंट कडून पन्नास स्मारक नाणी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
नाण्यावर कृष्णविवराचे चित्र कोरलेले आहे. ही नाणी 55 आणि 795 पाउंड यादरम्यान असलेल्या विविध मूल्यांसह चांदीची आणि सोनेनी तयार केली आहेत.
स्टीफन हॉकिंग
विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे मार्च 2018 मध्ये निधन झाले. विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.
विश्वशास्त्र (cosmology) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे 1942 साली जन्मलेले स्टीफन हॉकिंगचे मोठे योगदान होते. 2009 साली त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आणि त्यांना कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर ही पदवी देखील बहाल केली.
हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित 'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक खूप गाजले.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
UN चा ‘ग्लोबल एनव्हीरोंमेंट आउटलुक’ अहवाल
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘ग्लोबल एनव्हीरोंमेंट आउटलुक’ या शीर्षकाखाली आपला पर्यावरण विषयक ताजा अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालाची ही पाचवी आवृत्ती आहे.
त्या अहवालामुळे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) याला पर्यावरण विषयक धोरणे तयार करण्यास मदत होते.
ठळक मुद्दे
- जगभरात होणारे सर्व अकाली मृत्यू आणि आजारांचा एक चतुर्थांश भाग मानवनिर्मित प्रदूषण आणि पर्यावरणाच्या होणार्या नुकसानामुळे आहे. केवळ 2015 सालीच सुमारे 9 दशलक्ष मृत्यू झालेत.
- घातक कार्बन उत्सर्जन, पिण्याचे पाणी प्रदूषित करणारी रसायने अब्जावधी लोकांच्या उपजीविकेला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहचवित आहे.
- श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये असलेली तफावत वाढत आहे. त्यामधून भूखमरी, गरिबी आणि रोगांचा प्रादुर्भाव यात वाढ होत आहे.
- स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने दरवर्षी 1.4 दशलक्ष लोकांचा अनेक आजारांमुळे मृत्यू होत आहे.
- वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 60-70 लक्ष लोकांचा जगभरात अकाली मृत्यू होतो.
- श्रीमंत देशात 56% अन्नाची नासाडी होते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
नवी दिल्लीत ‘इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरम’ संदर्भातली पहिली कार्यशाळा पार पडली
14 आणि 15 मार्चला नवी दिल्लीत NITI आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय विकास संस्था (USAID) यांची ‘इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरम’ याच्या विकासासाठी पहिली कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत भारताला केंद्रस्थानी ठेवत ऊर्जा पद्धती मंच स्थापन करण्यासंदर्भातल्या विविध पैलूंवर चर्चा झाली.
ऊर्जा आणि पर्यावरणविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ आणि धोरणकर्त्यांना ‘इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरम’द्वारे एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिला जात आहे.
USAID बाबत
संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय विकास संस्था (United States Agency for International Development - USAID) ही यूनाइटेड स्टेट्स फेडरल गव्हर्नमेंट या अमेरिकी संस्थेची एक स्वतंत्र संस्था आहे, जी प्रामुख्याने नागरी परकीय मदत आणि विकास सहाय्य यांच्या प्रशासनासाठी जबाबदार आहे. संस्थेचे संस्थापक जॉन एफ. केनेडी यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 1961 रोजी स्थापना केली. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी. (अमेरिका) येथे आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
स्वदेशी कमी वजनाच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वी
स्वदेशात विकसित केलेल्या हाताळण्यास सोपे अश्या कमी वजनाच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची (MPATGM) संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) राजस्थानमधल्या वाळवंटात 14 मार्चला दुसरी यशस्वी चाचणी घेतली.
यामध्ये ‘इमेजिंग इन्फ्रारेड रडार’ याचा वापर करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 13 मार्चला झाली होती. या दोनही चाचण्यांदरम्यान क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्याचा अचूक भेद घेतला.
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
बांग्लादेशात भारतासोबतच्या “संप्रिती” या युद्धसरावाची सांगता झाली
2 मार्च ते 14 मार्च 2019 या काळात भारत आणि बांग्लादेश यांचा “संप्रिती 2019” या नावाने वार्षिक संयुक्त लष्करी युद्धसराव चालला.
बांग्लादेशाच्या तंगेल येथे हा सराव झाला. यावर्षी “संप्रिती” सराव मालिकेची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली. 14 दिवस चाललेल्या या सरावात दोन्ही देशांच्या दलांनी धोरणात्मक कार्ये, पद्धती आणि सहकार्यासंबंधी पैलूंवर अनुभवांचे आदानप्रदान केले.
बांग्लादेश हा बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश आहे. ढाका ही देशाची राजधानी असून चलन बांग्लादेशी टाका हे आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचे वाटप
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 14 मार्चला झालेल्या संरक्षण प्रतिष्ठापणा समारंभात शौर्य पुरस्कार तसेच विशिष्ट सेवा सन्मानांचे वाटप केले.
- किर्ती चक्र – सेपोय व्रहमा पाल सिंग (मरणोत्तर), राजेंद्र कुमार नैन (मरणोत्तर), तुषार गौबा
- शौर्य चक्र – रविंद्र बबन धनावडे (मरणोत्तर) आणि अन्य 14 जणांना
- परम विशिष्ट सेवा पदक – 15 जणांना
- अतिविशिष्ट सेवा पदक – 25 जणांना
- उत्तम युद्ध सेवा पदक – लेफ्टनंट जनरल सरनजीत सिंग
पुरस्काराविषयी
किर्ती चक्र आणि शौर्य चक्र (1952 सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत. महावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.
अशोक चक्र (1952 सालापासून) हा देशातील सर्वोच्च शांतता वेळीचा शौर्य पुरस्कार असून शौर्याचे प्रदर्शन दाखविणार्या सैनिकाला या शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते.
विशिष्ट सेवा पदक भारत सरकारतर्फे सशस्त्र दलांच्या सर्व रॅंकच्या कर्मचार्यांना ‘विशिष्ट आदेशावरून दिलेल्या असाधारण सेवेसाठी" दिला जाणारा सन्मान आहे. याची स्थापना दिनांक 26 जानेवारी 1960 रोजी केली गेली. त्यात उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदक यांचा समावेश आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 March 2019 Marathi |
15 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
“अल नागह 2019”: भारत आणि ओमान याचा संयुक्त युद्धसराव
दिनांक 13 मार्च 2019 रोजी भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्धसरावाचा शुभारंभ झाला.
भारतीय पायदळ आणि रॉयल आर्मी ऑफ ओमानी यांचा दोन आठवडे चालणारा हा सराव ओमानमध्ये निझवा येथील तळावर आयोजित करण्यात आला आहे.
ओमान हा आशिया खंडातला अरबी द्वीपकल्पवरील एक देश आहे. मस्कट ही या देशाची राजधानी आहे आणि ओमानी रियाल हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment