Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
युद्धकैद्यांना संरक्षण देणारा "जिनेव्हा करारनामा"
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे स्पष्ट केले की पाकिस्तानवर केलेल्या कारवाईदरम्यान दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताचे एक विमान कोसळले आणि भारतीय हवाई दलाचा एक पायलट पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि तो आता पाकिस्तानाच्या ताब्यात होता. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे - विंग कमांडर अभिनंदन.
विंग कमांडर अभिनंदन यांना अलीकडेच पाकिस्तानने आपल्या ताब्यातून सोडले आणि भारताला सोपवले. ही सर्व प्रक्रिया जिनेव्हा करारनामानुसार चालली.
आज आपण येथे जिनेव्हा करारनाम्याविषयी जाणून घेऊयात.
जिनेव्हा करारनामा ही खरं तर सन 1864 ते सन 1949 ह्या काळात झालेल्या एकूण चार करारांची एक मालिका आहे. युद्धकैदी म्हणून ताब्यात असलेल्या सामान्य नागरिक व सैनिकांवर गंभीर परिणाम होऊ नयेत किंवा त्रास होऊ नये म्हणून हे करार करण्यात आले आहेत.
दिनांक 12 ऑगस्ट 1949 रोजी ह्या चार करारांना जिनेव्हामध्ये मान्यता देण्यात आली. 1977 साली ह्या कायद्याच्या अंतर्गत सैनिकांसह सामान्य नागरिकांनाही संरक्षण मिळावे ह्यावर शिक्कामोर्तब झाले. रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनन्ट ह्यांनी 1864 साली झालेल्या युद्धाच्या वेळी जखमींना मदत करण्यासाठी वाटाघाटी केल्यामुळे हे करार अस्तित्वात आले आहेत.
करारमालिकेच्या पहिल्या करारामध्ये आजारी किंवा जखमी सैनिकांना पकडण्यापासून संरक्षण, तसेच आजारी व जखमी सैनिकांना उपचार ह्याबद्दल नियम आहेत.
दुसऱ्या करारात सर्व सैनिकांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता चांगली व समान वागणूक देणे ह्याबद्दल नियम आहेत.
तिसऱ्या करारामध्ये युद्धकैद्यांबद्दल मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली आहेत. ह्यात कुणाला युद्धकैदी समजण्यात यावे आणि त्यांना कशी वागणूक मिळावी व त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक देण्यात येऊ नये ह्याबद्दलचे नियम आहेत.
आणि चवथ्या करारामध्ये रेड क्रॉसच्या चिन्हाचा उपयोग माणसांना ओळखण्यासाठी व रेड क्रॉसच्या उपकरणांची ओळख पटवण्यासाठी करणे ह्याबाबत नियम आहेत.
तिसऱ्या करारात युद्धकैद्यांना विस्तृत संरक्षण देण्यात आले आहे. युद्धकैद्यांच्या हक्कांबाबत तसेच त्यांना सोडून देण्याबाबत माहिती व ते ताब्यात असताना त्यांना देण्यात येणारी वागणूक ह्याबाबत विस्तृतपणे नियमावली देण्यात आली आहे.
‘युद्धकैदी’ ही संज्ञा तिसऱ्या करारात स्पष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धादरम्यान पकडल्या गेलेल्या सैनिकांनाच युद्धबंदी किंवा युद्धकैदी ही संज्ञा लागू पडते.
नियमांप्रमाणे युद्धकैद्यांनी शत्रूवर थेट कारवाई केलेली असली तरी त्या गुन्ह्याअंतर्गत शत्रूराष्ट्र त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. त्यांना फक्त ह्यासाठी त्याब्यात घेण्याची परवानगी असते की त्यांना अधिक कारवाई करता येऊ नये. युद्ध संपल्यानंतर लगेच ह्या युद्धकैद्यांना सोडून देण्यात यावे असा नियम आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
पद्मा लक्ष्मी: UNDPच्या नव्या सदिच्छा दूत
8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे त्याच्या नव्या सदिच्छा दूत (गुडविल अॅम्बेसेडर) पदी भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या निवासी असलेल्या पद्मा लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे.
पद्मा लक्ष्मी या जगभरात असलेल्या असमानता आणि भेदभावविरोधी लढ्याचे समर्थन करणार. त्या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, उद्योजिका आणि लेखिका आहेत. त्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या दूत आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे. 1965 साली याची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या सहा विशेष मंडळांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
ह्या कार्यक्रमद्वारे जगातील 177 देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. दारिद्र्य निर्मुलन, HIV/एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी उपक्रम यामार्फत चालवले जातात.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
भारतात स्त्रियांना मिळणारे वेतन पुरूषांच्या तुलनेत 19 टक्क्यांनी कमी आहे: मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स
मॉन्स्टर इंडिया या नोकरी-संबंधी ऑनलाइन व्यासपीठाने प्रसिद्ध केलेल्या ‘मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स’ या अहवालानुसार, भारतात स्त्रियांना मिळणारे वेतन पुरूषांच्या तुलनेत 19 टक्क्यांनी कमी आहे.
सर्वेक्षणाच्या ठळक बाबी
- 2018 साली भारतात पुरुषांना मिळणारे सरासरी वेतन तासाला 242.4 9 रुपये एवढे होते, तर स्त्रियांसाठी ते 196.3 रुपये एवढे होते.
- माहिती तंत्रज्ञान (IT / ITES) सेवा क्षेत्रामध्ये स्त्री-पुरुषांमधली वेतनातली तफावत सर्वाधिक (म्हणजेच 26%) आहे. त्यानंतर उत्पादन क्षेत्र (24%); आरोग्य सेवा, उपचार आणि सामाजिक कार्य ही क्षेत्रे (21%); आर्थिक सेवा, बँकिंग आणि विमा ही क्षेत्रे (2%) यांचा क्रम लागतो.
- प्रारंभिक काळात स्त्री-पुरुषांमधली वेतनातली तफावत मध्यम होती परंतु कालांतराने त्यात वाढ झाली आहे. 10 वर्षांहून अधिकच्या अनुभवावरून हे दिसून आले आहे की पुरुष स्त्रियांच्या तुलनेत 15% अधिक कमावतात.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नव-नव्या योजना
हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातल्या कामगार स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने नव-नव्या योजना तयार केल्या आहेत.
त्या पुढीलप्रमाणे आहेत -
हातमाग क्षेत्र
2009-10 सालाच्या तिसऱ्या हातमाग जनगणनेनुसार देशात सुमारे 43.31 लक्ष हातमाग विणकर आणि सहयोगी कामगार आहेत, ज्यापैकी 77% स्त्रिया आहेत. त्यांच्यासाठी चार योजना सादर करण्यात आल्या आहेत -
- राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (त्याचे घटक – विभागीय समूह; हातमाग विपणन सहाय्यता, सवलती पत/विणकर मुद्रा योजना)
- हातमाग विणकरांची व्यापक कल्याणकारी योजना
- धागा पुरवठा योजना
- व्यापक हातमाग गट विकास योजना
हस्तकला क्षेत्र
‘पेहचान’ पुढाकार या कार्यक्रमाच्या अंतर्गत हस्तकला कारागीरांना ओळखपत्र दिले जात आहे. देशभरात हस्तकला क्षेत्रात सुमारे 7 दशलक्ष कारागीर आहेत, त्यात स्त्रियांची टक्केवारी 56.07% एवढी आहे.
रेशीम क्षेत्र
‘सिल्क समग्र’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत, भारत सरकारने 38500 दशलक्ष टन कच्चा रेशीम उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. भारतात सुमारे 55% स्त्रिया रेशीम क्षेत्राशी संबंधित श्रृंखलेमध्ये गुंतलेल्या आहेत.
याशिवाय, भारत सरकारने 2020 सालापर्यंत 10,000 ‘बुनियाद’ रीलिंग यंत्रे पुरवून आरोग्यास अहितकारक असलेली पारंपरिक पद्धत दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉवरलूम क्षेत्र
‘स्टँड-अप इंडिया’ योजनेच्या अंतर्गत अनुसूचीत जाती/जमाती तसेच स्त्री उद्योजकांना नवीन पॉवरलूम संयंत्रासाठी एकूण खर्चाच्या 25% एवढी मदत दिली जाते.
एकात्मिक कौशल्य विकास योजना (ISDS)
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी लागणार्या महत्त्वपूर्ण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने ही योजना सादर केली.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
ग्रेटर नोएडा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्थेचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 9 मार्च 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्यातल्या ग्रेटर नोएडा या शहरात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्था’ याच्या परिसराचे उद्घाटन करण्यात आले. या संस्थेचा परिसर 25 एकर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात उभारण्यात आला आहे.
संस्थेबाबत
1959 साली प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ बी. बी. लाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (ASI) कडून ‘स्कूल ऑफ आर्किऑलॉजी’ हे विद्यालय सुरू केले गेले. पुढे 1983 साली या संस्थेला ‘पुरातत्त्व संस्था’ (Institute of Archaeology) हे वर्तमान नाव प्राप्त झाले.
ही संस्था संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (ASI) याचा एक शैक्षणिक विभाग आहे. ही संस्था पुरातत्त्वशास्त्र विषयात विद्यार्थ्यांना एक समर्थक, उत्साही आणि आव्हानात्मक शैक्षणिक वातावरण प्रदान करते. पुरातत्त्वशास्त्राच्या जुन्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
विद्यार्थ्यांसाठी ‘बौद्धिक संपदा अधिकार’ विषयक GI संकेतस्थळाचे उद्घाटन
शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘बौद्धिक संपदा अधिकार (IPR)’ विषयक एका मार्गदर्शनपर चित्रफितीचे (ट्यूटोरियल व्हिडिओ) तसेच GI (भौगोलिक खूण) संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ही चित्रफिती बौद्धिक संपदा अधिकार (IPR) जाहिरात व व्यवस्थापन विभागाने (CIPAM) क्वालकॉम कंपनीच्या मदतीने तयार केली आहे.
GI द्वारे भारताचा वैविध्यपूर्ण भूगोल व प्राचीन इतिहास जतन करण्यासाठी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला आहे. हे संकेतस्थळ कलात्मकतेचा अधिक प्रचार करण्यासाठी आणि GI नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी भारताच्या कुशल कारागीरांना प्रेरित करण्यास मदत करेल.
भौगोलिक खूण (GI)
भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि ती त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी.
CIPAM बाबत
बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) हे भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व जाहिरात विभागाच्या (DIPP) अंतर्गत कार्य करते. बौद्धिक संपदा अधिकारांच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने CIPAM द्वारा #लेट्सटॉकआईपी चळवळ देखील सुरू केली गेली आहे.
याव्यतिरिक्त, बनावट उत्पादनाला आळा घालण्यासाठी भारताने जागतिक व्यापार संघटना (WTO) याच्या 1995 सालाच्या ‘बौद्धिक संपदा अधिकारांच्या व्यापाराशी संबंधित बाबींवरील करार’ (Agreement on Trade-Related Aspects of Intellectual Property Rights –TRIPS) यावर स्वाक्षरी केलेली आहे. सोबतच या कराराशी सुसंगतता आणण्यासाठी नवीन कायदे तयार करण्यात आले आहे तसेच अस्तित्वातील कायदे सुधारित केले गेले आहेत. याशिवाय, बौद्धिक संपदा याच्यासंदर्भात ‘IP नानी’ नावाने भारताचे पहिलेच शुभंकर (किंवा प्रतीक चिन्ह किंवा बोधचिन्ह) तयार करण्यात आले.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 March 2019 Marathi | 9 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
कर्करोगावरील 390 औषधांच्या किरकोळ दरात 87 टक्क्यांची घट
केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधे-निर्मिती मूल्य प्राधिकरणाने (NPPA) कमाल किरकोळ किंमतीत (MRP) 87 टक्क्यांनी घट झालेल्या कर्करोगावरच्या अनुसूचित नसलेल्या 390 औषधांची यादी 8 मार्चला जाहीर केली. या सुधारित किंमती 8 मार्च 2019 पासून लागू करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी 27 फेब्रुवारी 2019 रोजी प्राधिकरणाने 30% ट्रेड मार्जिन कॅप अंतर्गत कर्करोगावरील 42 औषधांची यादी सूचित केली होती. सध्या कर्करोगावरील उपचार घेणार्या रूग्णांचा सरासरी खर्च हा इतर रोगांच्या तुलनेत अडीच पट आहे. देशातल्या सुमारे 22 लक्ष कर्करुग्णांना याचा लाभ होणार असून ग्राहकांची वर्षाला सुमारे 800 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
प्राधिकरणाबाबत
राष्ट्रीय औषधे-निर्मिती मूल्य प्राधिकरण (National Pharmaceutical Pricing Authority -NPPA) ही एक सरकारी नियामक संस्था आहे जी भारतातल्या औषधांच्या किंमती नियंत्रित करते. या संस्थेची स्थापना दिनांक 29 ऑगस्ट 1997 रोजी झाली.
No comments:
Post a Comment