Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, March 25, 2019

    वसंत गोवारीकर-ज्येष्ठ शास्त्रज्ञ

    Views

    वसंत गोवारीकर


    ज्येष्ठ शास्त्रज्ञ


    जन्मदिन - २५ मार्च १९३३

    🔹अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. 

    🔹डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. 

    🔹या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. 

    🔹१९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. 

    🔹सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वर्षे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे.

    🔹 १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले.

    🔹 १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला 'गोवारीकर मॉडेल' म्हणून नाव देण्यात आले.

    🔹वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. 

    🔹हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे.


    No comments:

    Post a Comment