Current affairs | Evening News Marathi
Current affairs 25 March 2019 Marathi |
25 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
बिहार राज्याच्या स्थापनेस 107 वर्षे पूर्ण
दरवर्षी 22 मार्चला ‘बिहार दिन’ साजरा केला जातो. राज्याच्या स्थापनेस यंदा 107 वर्षे पूर्ण झाली.
दिनांक 22 मार्च 1912 रोजी ब्रिटिश प्रशासनाने बिहारच्या प्रदेशाला बंगाल प्रेसिडेंसीपासून वेगळे करून नवा राज्य घोषित केला. 2010 सालापासून दरवर्षी 22 मार्चला राज्यात ‘बिहार स्थापना दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताव्यतिरिक्त अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिरात, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि मॉरीशस या देशांमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो.
बिहार उत्तर भारतातले राज्य आहे. राज्याच्या उत्तरेकडे नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तरप्रदेश राज्य, दक्षिणेस झारखंड राज्य तर पूर्वेकडे पश्चिम बंगाल राज्य आहे. 2017 सालापासून नितीश कुमार हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
नवी दिल्लीत ‘फिनटेक परिषद 2019’ आयोजित
दिनांक 25 मार्च 2019 रोजी राष्ट्रीय भारत पारिवर्तन संस्था (NITI) आयोगाकडून नवी दिल्लीत ‘वित्तीय तंत्रज्ञान’ (financial technologies) विषयक ‘फिनटेक परिषद 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारताच्या फिनटेक क्षेत्रात विकासात्मक ध्येय गाठणे, भविष्यातली धोरणे आणि धोरणात्मक प्रयत्नांसाठी योजना बनविणे तसेच व्यापक वित्तीय समावेशनासाठी प्रयत्नांवर विचार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
भारतीय फिनटेक प्रणाली
भारत वैश्विक रूपाने सर्वाधिक वेगाने वाढणार्या फिनटेक विषयक बाजारपेठांपैकी एक आहे आणि असा अंदाज लावण्यात आला आहे की 2029 सालापर्यंत 1 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलर किंवा किरकोळ व SLE कर्जाच्या 60% डिजिटल पद्धतीने वितरित केले जाईल.
भारतीय फिनटेक प्रणाली जगातली तिसरी सर्वात मोठी प्रणाली आहे, ज्याने 2014 सालापासून जवळपास 6 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आकर्षित केली आहे. भारतीय फिनटेक उद्योग भारताला जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात पुढे वाढण्यास मदत करणार.
ललित कला अकादमीतर्फे 2019 सालासाठी राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांचे वाटप
ललित कला अकादमीच्या 60 व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील 15 कलावंतांची निवड करण्यात आली. 25 मार्चला एका सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण मुंबईत केले गेले. यानिमित्ताने 25 मार्च ते 8 एप्रिल या काळात 60 वी राष्ट्रीय कला प्रदर्शनी देखील भरविण्यात आली.
महाराष्ट्रातले जितेंद्र सुरेश सुतार, डगलस मरियन जॉन, सचिन काशीनाथ चौधरी, वासुदेव तारनाथ कामथ ह्यांना यंदा पुरस्कार दिला गेला आहे.
पुरस्काराचे अन्य विजेते - चंदन कुमार समाल (ओडिशा), गौरी वेमुला (तेलंगणा), हेमंत राव (मध्यप्रदेश), हिरण कुमार छोटू भाई पटेल (गुजरात), जया जेना (ओडिशा), जयेश के. के. (केरळ), प्रताप चंद्र चक्रवर्ती (पश्चिम बंगाल), रश्मी सिंग (उत्तरप्रदेश), सुनील कुमार विश्वकर्मा (उत्तरप्रदेश), तबस्सूम खान (बिहार) आणि विनीता सद्गुरु चेंदवणकर (गोवा)
ललित कला अकादमी
ललित कला अकादमी हे प्रतिभावंत कलाकार व कलांचा गौरव करणारे व त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारे व्यासपीठही आहे. ही स्वतंत्र भारतातली एक स्वायत्त संस्था आहे, ज्याची दिनांक 5 ऑगस्ट 1954 रोजी भारत सरकारने स्थापना केली. या व्यतिरिक्त देशात 12 राज्य ललित कला अकादमी आहेत, ज्या केंद्रीय अकादमीच्या सहकारी संस्था आहेत.
ज्येष्ठ शिल्पकार तसेच प्रसिद्ध चित्रकार उत्तम पाचरणे हे ललित कला अकादमी (नवी दिल्ली) याचे अध्यक्ष आहेत. या संस्थेकडून राष्ट्रीय अकादमी पुरस्कार दिला जातो. प्रमाणपत्र आणि 1 लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment