Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, February 21, 2019

    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    हलक्या लढाऊ तेजस विमानाला FOC प्रमाणपत्र मिळाले

    दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या ‘तेजस’ या देशी वजनानी हलक्या लढाऊ विमानाला (LCA) शस्त्रास्त्रांनी सुसज्जीत लष्करी जेट-विमान म्हणून भारतीय हवाई दलामध्ये सामील करवून घेण्यासाठी सेंटर फॉर मिलिटरी एयरवर्दीनेस अँड सर्टिफिकेशन (Cemilac) या लष्करी हवाई नियामकाकडून अंतिम परिचालन निर्दोषत्व प्रमाणपत्र (final operational clearance certificate -FOC) प्राप्त झाले आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    सौदी अरब भारतात $100 अब्जची गुंतवणूक करणार

    सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या दौर्‍यावर होते. झालेल्या चर्चेनंतर भारतात विविध क्षेत्रांमध्ये USD 100 अब्ज एवढ्या रकमेची गुंतवणूक करण्याची संधी त्यांनी दिली आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी यात गुंतवणूक करण्यासंदर्भात भारत सरकार आणि सौदी अरब सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: 21 फेब्रुवारी

    दरवर्षी 21 फेब्रुवारी या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ पाळला जातो. 1999 साली संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) सर्वप्रथम या दिनाची घोषणा केली होती. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी 2000 पासून दरवर्षी हा दिन पाळला जातो. जगात बोलल्या जाणार्‍या अंदाजे 6000 भाषांपैकी किमान 43% भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    स्ट्रँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत निखात, मीना आणि अमित यांना सुवर्णपदक

    भारताच्या निखात झरीन व मीना कुमारी देवी यांनी सोफिया (बल्गेरिया) येथे झालेल्या ‘स्ट्रँडा मेमोरियल मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सुवर्णपदक जिंकले आहे आणि त्या या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणार्‍या पहिल्या भारतीय महिला मुष्टियोद्धा ठरल्या. निखात झरीनने महिलांच्या 51 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत फिलिपिन्सच्या आयरिश मँग्नोचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. तर मीना कुमारी देवीने महिलांच्या 54 किलो बँटमवेट गटात आयरा व्हिलेगासचा पराभव केला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    12 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये रु. 48,239 कोटींची भांडवली गुंतवणूक होणार

    भारत सरकार कर्ज घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पंजाब नॅशनल बँकेसह 12 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये (PSBs) 48,239 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा सर्वाधिक हिस्सा कॉर्पोरेशन बँकेला (9,086 कोटी रुपये) मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवलाचे प्रमाण राखण्यास आणि वित्तीय नियोजन करण्यास मदत होणार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे निधन झाले

    हिंदी साहित्य जगतातले ज्येष्ठ लेखक, समीक्षक नामवर सिंह यांचे 20 फेब्रुवारीला वयाच्या 92 वर्षी निधन झाले. हिंदी साहित्यामध्ये नामवर सिंह यांना 1971 साली 'कविता के नये प्रतिमान'साठीच्या साहित्य समीक्षनासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 21 February 2019 Marathi | 21 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment