राम गणेश गडकरी- (२६ मे १८८५ - २३ जानेवारी १९१९) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
जागतिक दिवस
-
ठळक घटना, घडामोडी
१९८६ : युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
१९९१ : लॉडा एर फ्लाइट ००४ हे बोईंग ७६७ प्रकारचे विमान हवेत असताना थ्रस्ट रिव्हर्सर लागल्याने थायलंडमध्ये पडले. २२३ ठार.
१९९९ : भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
जन्म/वाढदिवस
१४७८ : पोप क्लेमेंट सातवा.
१५६६ : महमद तिसरा, ओट्टोमन सम्राट.
१६६७ : आब्राम द म्वाव्र, फ्रेंच गणितज्ञ.
१७९९ : अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.
१८६७ : टेकची मेरी, पंचम जॉर्जची राणी.
१८८५ : राम गणेश गडकरी, मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी.
१९०६ : बेंजामिन पिअरी पाल, भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.
१९०७ : जॉन वेन, अमेरिकन अभिनेता.
१९०८ : न्विन न्गॉक थो, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
१९०९ : आदोल्फो लोपेझ मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
१९१२ : यानोस कादार, हंगेरीचा पंतप्रधान.
१९४९ : हँक विल्यम्स जुनियर, अमेरिकन संगीतकार.
१९६६ : झोला बड, दक्षिण आफ्रिकेची धावपटू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
२००० : प्रभाकर शिरुर, चित्रकार.
No comments:
Post a Comment