Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 20, 2018

    २० मार्च दिनविशेष

    Views
    सर आयझॅक न्यूटन - (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?" आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे.



    -

    ठळक घटना/घडामोडी

    १६०२: डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना.

    १७३९: नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.

    १९१६: अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.

    जन्म/वाढदिवस

    ४३: पब्लियस ओव्हिडियस नासो तथा ओव्हिड, रोमन कवी.

    १७२५: अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट.

    १७३७: बुद्ध योद्फा चुलालोक, थायलंडचा राजा.

    १८११: फ्रान्सचा राजा दुसरा नेपोलियन.

    १९१५: रुडॉल्फ कर्चश्लागर, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.

    १९३९: ब्रायन मुलरोनी, कॅनडाचा पंतप्रधान.

    १९८२: टेरेंस डफिन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १४१३: हेन्री चौथा, इंग्लंडचा राजा.

    १६१९: मॅथियास, पवित्र रोमन सम्राट.

    १७२६: सर आयझॅक न्यूटन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.

    १९३१: हर्मन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.

    १९३४: एम्मा, नेदरलँड्सची राणी.

    २००४: जुलियाना, नेदरलँड्सची राणी.



    No comments:

    Post a Comment