Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, March 15, 2018

    १५ फेब्रुवारी दिनविशेष

    Views

    गॅलिलिओ गॅलिली - (१५ फेब्रुवारी १५६४ - ८ जानेवारी १६४२) गॅलिलिओ गॅलिली हे इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.

    जागतिक दिवस


    • -

    ठळक घटना/घडामोडी


    • ३९९: सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
    • १६३७: फर्डिनांड तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.
    • १७६४: अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.
    • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रँटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.
    • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
    • १८९८: क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरात अमेरिकन युद्धनौका यु.एस.एस. मेन वर स्फोट. २६० ठार. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू.
    • १९४२: दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
    • १९६१: सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
    • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
    • १९७०: डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी. ९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
    • १९८२: खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
    • २०१३: रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.

    जन्म/वाढदिवस


    • १४७१: पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
    • १५६४: गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.
    • १७१०: लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
    • १८२०: सुझन बी. अँथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
    • १८४१: मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
    • १८७१: आल्फ़्रेड व्हॉइटहेड, सुप्रसिध्द शिक्षण तज्ञ.
    • १८७८: जॅक शार्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९१९: आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
    • १९३०: वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
    • १९३४: निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
    • १९५६: डेसमंड हेन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
    • १९५९: गाय डि आल्विस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९६५: क्रेग मॅथ्युस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९७९: हामिश मार्शल, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ११४५: पोप लुशियस दुसरा.
    • १६३७: फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
    • १८४४: हेन्री ऍडिंग्टन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
    • १८४७: जर्मिनल पिएर डँडेलिन, बेल्जियन गणितज्ञ.
    • १८४९: पिएर फ्रांस्वा वेर्हल्स्ट, बेल्जियन गणितज्ञ.
    • १८६९: मिर्झा गालिब, उर्दू कवी.
    • १८२८: एच.एच. ऍस्क्विथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
    • १९५०: सरदार वल्लभाई पटेल, पेशाने वकील असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय राजकीय व सामाजिक नेते देखिल होते.
    • १९५९: ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
    • १९६५: नॅट किंग कोल, अमेरिकन संगीतकार.
    • १९८०: कुष्ठरोग्यांचे पहिले भारतीय सेवक पद्मश्री मनोहर दिवान यांचे निधन.
    • १९८८: रिचर्ड फाइनमन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
    • १९९९: हेन्री वे केन्डॉल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ

    No comments:

    Post a Comment