स्वदेशी ‘आकाश’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- जमिनीवरून हवेत मारा करणार्या स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राची ITR रेंज चांदीपुर येथून यशस्वी चाचणी घेतली गेली आहे.
- या क्षेपणास्त्राला भारतीय लष्करात जमिनीवरून हवेत कमी पल्ल्याची मारक क्षमता असणारे क्षेपणास्त्र (SRSTM) म्हणून सामील करण्यात आलेले आहे. हे पहिले SAM आहे, ज्यामध्ये रेडियो तरंगांच्या आधारावर आपल्या लक्ष्यला भेदण्यास स्वदेशी तंत्रज्ञान युक्त प्रणालीचा वापर केला गेला आहे.
स्त्रोत: PIB
ओखी चक्रीवादळाने प्रभावित लोकांसाठी ‘ऑपरेशन सिनर्जी’ ला सुरुवात
- ओखी चक्रीवादळाचे संकट कमी झाल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागांतून मच्छीमार तसेच प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून ‘ऑपरेशन सिनर्जी’ चालविण्यात येत आहे.
- आतापर्यंत मासेमारी करण्यास समुद्रात गेलेल्या 32 मच्छीमारांना वाचविण्यात आले तसेच आणखी 91 लोकांचा शोध चालू आहे. याशिवाय विविध स्वरुपात मदतकार्ये सुरू आहेत.
स्त्रोत: द हिंदू
दिल्लीत 22 व्या ‘एशियन हर्मोनायझेशन वर्किंग पार्टी (AHWP)’ परिषदेला सुरुवात
- आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते 5 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत 22 व्या ‘एशियन हर्मोनायझेशन वर्किंग पार्टी (AHWP)’ परिषदेला सुरुवात करण्यात आली आहे.
- 5 दिवस चालणार्या या परिषदेचे आयोजन मंत्रालयाच्या सहकार्याने केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (CDSCO) आणि राष्ट्रीय औषधी नियामक प्राधिकरण (NDRA) द्वारा केले गेले आहे.
- या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आशिया आणि त्याबाहेरील क्षेत्रात वैद्यकीय उपकरणांच्या नियमनाच्या एककेंद्राभिमुखता आणि एकरूपता यासाठी दृष्टीकोन विकसित करण्याहेतू शिफारसी देणे आणि नियामक व या उद्योगांमध्ये ज्ञान व तज्ञांचे आदान-प्रदान करण्यामध्ये सुविधा प्रदान करणे हा आहे.
- 30 सदस्य देश आणि औद्योगिक सदस्यांच्या राष्ट्रीय नियामकांच्या ‘एशियन हार्मोनायजेशन वर्किंग पार्टी (AHWP)’ ची स्थापना सन 1999 मध्ये ना-नफा संस्थेच्या रूपात केली गेली होती. याचा उद्देश्य आंतरराष्ट्रीय वैद्यकीय उपकरण नियामकांचा मंच (IMDRF) द्वारा तयार कलेल्या दिशानिर्देशाखाली आशिया आणि अन्य क्षेत्रामध्ये उपकरणांच्या नियमनावर नियामक एकरूपतेला प्रोत्साहन देणे हा आहे.
स्त्रोत: PIB
बीजिंगमध्ये तृतीय DRC-NITI संवाद कार्यक्रम संपन्न
- NITI आयोग आणि चीनची विकास संशोधन परिषद यांचा तृतीय वार्षिक संवाद कार्यक्रम ‘DRC-NITI संवाद’ 5 डिसेंबरला बीजिंगमध्ये संपन्न झाला.
- बैठकीत सन 2018 मध्ये भारतात ‘DRC-NITI वार्षिक संवाद’ कार्यक्रम आयोजित केले जाणार यास संमती दिली गेली. तसेच भारत-चीन अर्थिक सहकार्य आणि शाश्वत वाढीसाठी सरावपद्धती यात सहकार्याचा आढावा घेतला गेला तसेच व्यापर आणि गुंतवणुकीमध्ये द्वैपक्षीय सहकार्याला वाढविण्यास समर्थन देण्यात आले.
स्त्रोत: बिजनेस स्टँडर्ड
छत्तीसगड शासनाने नदी जोडणी प्रकल्पाच्या प्रक्रियेला सुरुवात केली
- छत्तीसगड शासनाच्या जलस्त्रोत विभागाने सिंचन सुविधेचा विस्तार करण्यासाठी राज्यातील नदी जोडणी प्रकल्पाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
- प्राथमिक टप्प्यात त्यासंबंधी आंतर-जोडणी प्रकल्प बनविण्यात आला आहे आणि सर्वेक्षणाचे कार्य केले जात आहे. यात महानदी-तांदुला, पैरी-महानदी, रेहर-अटेम, अहिरन-खारंग आणि हसदेव-केवई नदी जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे.
- जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, NWDA कडून हिमालयीन नद्यांचे घटक अंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्यांचे घटक अंतर्गत 16 आंतर-जोडणी प्रकल्पांना ओळखले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य प्रकल्प राबविण्यात येत आहे.
स्त्रोत: PTI
IOC ने आगामी हिवाळी खेळांसाठी रशियावर बंदी घातली
- रशियाच्या ऑलंपिक संघाला दक्षिण कोरियाच्या पेयँगचंगमधील 2018 हिवाळी खेळात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. WADA च्या डोपिंग चाचणीत रशियाचे खेळाडू मोठ्या प्रमाणात अयोग्य ठरत असल्यामुळे त्यांच्यावर वरचेवर प्रतिबंध घातले जात आहेत, अश्या पार्श्वभूमीवर अलीकडेच आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ (IAAF) परिषदेने रशियावर घातलेल्या डोपिंग प्रतिबंधला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
- रशियाकडून डोपिंगमुळे काढून घेतलेल्या ऑलंपिक पदकांची एकूण संख्या 41 वर पोहचलेली आहे, जी दुसर्या क्रमांकावरील संख्येच्या चौपटीने जास्त आहे. मॅक्लारेन अहवालाने याची पुष्टी केलेली आहे की सन 2012 ते सन 2015 या काळात रशियात 30 हून अधिक खेळांमधील 1000 हून अधिक खेळाडूंना राज्य प्रायोजित डोपिंग प्रक्रियेत सवलत दिली गेली होती.
- आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ (IAAF) ही अॅथलेटिक्सच्या खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. याचे मुख्यालय मोंटे कार्लो, मोनॅको येथे आहे. या महासंघाचे 215 सदस्य संघ आहेत. याची स्थापना 17 जुलै 1912 रोजी स्टॉकहोम (स्वीडन) येथे झाली.
स्त्रोत: न्यूयॉर्क टाइम्स
भारताने प्रथमच दक्षिण आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकले
- गुवाहाटी (आसाम) मध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2017’ च्या भारतीय संघाने सांघिक विजेतेपद मिळविले आहे.
- यासोबतच भारताने नेपाळचा पराभव करत आपले पहिले दक्षिण आशियाई क्षेत्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकले आहे.
- त्यात आर्यमान टंडन (मुलांचा एकल गट), अश्मिता चालीहा (मुलींचा एकल गट), अर्निताप दासगुप्ता व कृष्ण प्रसाद जी. (मुलांचा दुहेरी गट) यांनी स्पर्धेच्या तीनही गटात विजेतेपद जिंकले.
स्त्रोत: इंडियन एक्सप्रेस
RBI कडून प्रमुख व्याजदर 6% वर कायम राखले
- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नव्या अहवालानुसार, त्यांचे मुख्य व्याजदर 6% वर कायम राखले जाणार आहे.
- RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय मौद्रिक धोरण समितीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत महागाई अंदाज 4.3-4.7% पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
- विक्रीकेंद्र यंत्रणेच्या वापराने व्यापार्यांचे जाळे वाढविण्याच्या उद्देशाने व्यापारी सवलती दर देखील तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला गेला.
- भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
स्त्रोत: द हिंदू
पुण्यात 36 व्या ‘सीनियर राष्ट्रीय रोविंग अजिंक्यपद’ स्पर्धेला सुरुवात
- महाराष्ट्राच्या पुणे शहरातील आर्मी रोविंग नोड येथे 36 वी ‘सीनियर राष्ट्रीय रोविंग अजिंक्यपद’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2017 दरम्यान चालणारी ही स्पर्धा भारतीय रोविंग महासंघ (RFI) यांच्या वतीने सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाकडून (SSCB) आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा पुरूष सिंगल स्कल, महिला सिंगल स्कल, पुरूष कॉक्सलेस जोडी आणि महिला कॉक्सलेस जोडी या गटांमध्ये खेळली जाणार आहे. रोविंग हा नौकायनाचा एक प्रकार आहे.
स्त्रोत: डेलीन्यूज
2022 सालापर्यंत भारतीय आरोग्यसेवा व्यापार $372 अब्जवर पोहचणार
- RNCOS या संशोधन संस्थेच्या सहकार्याने ASSOCHAM ने तयार केलेल्या अहवालानुसार, जीवनशैलीसंबंधित आजारांचे वाढते प्रमाण आणि स्वस्त आरोग्यसेवा पुरवठा व्यवस्थेची वाढती मागणी यामुळे आरोग्यसेवांचा व्यापार 2022 सालापर्यंत $372 अब्जवर पोहचणार, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
- सन 2016 मध्ये आरोग्यसेवांचा व्यापार $110 अब्जवर पोहचलेला होता आणि पुढे यात 22% चा चक्रवाढ वार्षिक वृद्धीदर (CAGR) दिसेल. याशिवाय, याच काळात भारतात वैद्यकीय उपकरणांचा व्यापार $4 अब्ज इतका होता, जो 2022 सालापर्यंत $11 अब्जचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे.
- चक्रवाढ वार्षिक वृद्धीदर (CAGR) हा एकापेक्षा जास्त कालावधींमध्ये वृद्धीचा एक उपयुक्त उपाय आहे. एखाद्या कालावधीमध्ये झालेल्या सुरुवातीच्या गुंतवणूकीपासून ते शेवटच्या गुंतवणूकीच्या मूल्यांच्या आधारावर ठरविण्यात आलेला हा वृद्धीदर आहे.
स्त्रोत: डीडी न्यूज
No comments:
Post a Comment