मेरी क्युरी
(काॅपी-पेस्ट, दै लोकसत्ता)
(जन्म : ७ नोव्हेंबर १८६७, वॉर्सा, पोलंड; मृत्यू : ४ जुल १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)
सन १८९६ मध्ये हेन्री बेक्वेरल नावाच्या एका फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाला युरेनियम क्षारातील किरणोत्साराचा शोध लागला. या किरणोत्साराचा प्रभाव त्याला एका वापरल्या न गेलेल्या फोटोग्राफिक फिल्मवर आढळून आला. नंतर सन १८९७ मघ्ये मेरी क्युरी आणि तिचे पती पियरे क्युरी यांनी पोलोनियम व रेडियम या दोन किरणोत्सारी पदार्थाना वेगळे करण्यात यश मिळवले. या किरणोत्सारी पदार्थापासून उत्सर्जति किरणांची ओळख अल्फा (a), बीटा(b), गॅमा (g) या नावांनी पटवली गेली. अँटोनी हेन्री बेक्वेरल हे एक नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते. उत्स्फूर्त किरणोत्साराचा शोध लावल्याखातर त्यांना मेरी क्युरी आणि पिअरे क्युरी यांच्यासोबत १९०३ मध्ये नोबेल पारितोषिक दिले गेले. पुढे असे लक्षात आले की, या अल्फा, बीटा आणि गॅमा किरणांचा उगम अणूच्या संरचनेत होत असतो.
१८९१ मध्ये सॉबरेन्न येथे भौतिक आणि गणितीय विज्ञानातील विद्यावृत्ती (लायसेन्शियेटशिप) मिळाल्याने क्युरी, पुढील शिक्षणाकरिता फ्रान्समध्ये गेल्या. १८९४ मध्ये स्कूल ऑफ फिजिक्समधील प्रोफेसर पिअरे क्युरी यांच्याशी त्यांची गाठ पडली. १८९५ मध्ये त्यांचे लग्न झाले. मिळालेल्या अनेक पारितोषिकांद्वारेच मादाम क्युरींच्या कामाचे महत्त्व ध्यानात येते. त्यांना अनेक विज्ञान, वैद्यक आणि कायदा या विषयांतील सन्माननीय पदव्या प्राप्त झालेल्या होत्या. जगभरातील अनेक ज्ञानवंत संस्थांचे सदस्यत्वही त्यांना मिळाले होते.
बेक्वेरल यांनी शोधून काढलेल्या उत्स्फूर्त किरणोत्साराच्या अभ्यासाकरिता, त्यांना पतीसोबत १९०३ सालचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते. या पारितोषिकाचे अर्धे मानकरी बेक्वेरल हेही होते. १९११ मध्ये त्यांना किरणोत्सारातील त्यांच्या कामाकरिता, केमिस्ट्रीमधील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
अमेरिकेतील स्त्रियांच्या वतीने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हार्डिंग यांनी त्यांना १९२१ मध्ये त्यांच्या विज्ञानसेवेकरिता १ ग्रॅम रेडियम भेट दिले होते. त्यांच्या कामाच्या गौरवार्थ किरणोत्साराच्या एककास त्यांचे नाव दिले गेले. १ ग्रॅम रेडियमपासून दर सेकंदास प्राप्त होणाऱ्या किरणोत्सारास ‘१ क्युरी’ असे संबोधले जाऊ लागले. १ क्युरी किरणोत्सार म्हणजे ३७ अब्जविघटने/सेकंद.
➖➖➖➖➖➖
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! !