शिक्षक अभियोग्यता चाचणी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे , Online form filling in mahapariksha.gov.in OnlinePortal
How to fill Maha TAIT form in https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage#
⏭ खालील संकेतस्थळाला भेट द्या www.mahapariksha.gov.
↧
⏭ कृपया शालेय शिक्षण विभागाने प्रकाशित केलेली परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, वेळापत्रक, आवश्यक प्रमाणपत्रं इ.ची माहिती काळजीपूर्वक वाचा.
↧
खालील हवी ती माहिती डाऊनलोड करा ! 👇
↧
⏭ नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी उमेदवाराला आपल्या उजव्या बाजूला असलेल्या ‘सूचना’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
↧
⏭ नोंदणीच्या पोर्टलवरील बटणावर क्लिक केल्यावर उमेदवाराला थेट नोंदणीच्या मुख्य पृष्ठावर नेले जाईल.
↧
⏭ पहिल्यांदा नोंदणी करत असल्यास उमेदवाराला नोंदणीच्या बटणावर क्लिक करून युजरनेम, पासवर्ड आणि इमेल आयडी टाकावा लागेल.
↧
⏭ उमेदवाराला त्याच्या/तिच्या प्रमाणित इमेल आयडीवर एक ऍक्टिव्हेशन लिंक मिळेल जी त्याच्या साइनअपशी जोडलेली असेल.
↧
⏭ उमेदवाराला त्याच्या खात्यावर इ-मेलद्वारे आलेल्या ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करावे लागेल. उमेदवाराने त्याच्या/तिच्या लॉगईन संबंधीची माहिती गोपनीय ठेवणे अपेक्षित आहे.
↧
⏭ एकदा खाते सक्रीय झाले की, उमेदवाराला त्याचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून नोंदणीच्या पोर्टलवर लॉग ऑन होता येईल.
↧
⏭ लॉगइन करण्यापुर्वी उमेदवाराने सगळ्या नियम व अटी मान्य करणे बंधनकारक असेल.
↧
⏭ उमेदवाराला प्रोफाईल, रहिवासी पत्ता, अतिरिक्त माहिती, शैक्षणिक पात्रता इ. व्यक्तिगत माहिती भरावी लागेल.
↧
⏭ छायाचित्र आणि स्वाक्षरी सूचनापत्रकात दिलेल्या निकषांनुसार अपलोड करावे लागतील.
↧
⏭ पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरूपी पत्ता, तात्पुरता पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफीस, राज्य, जिल्हा, पिन कोड इ.सहित भरावा.
↧
⏭ त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात संवर्गाबद्दल माहिती भरावी. उमेदवाराला जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाऊन मधून त्याने/तिने आपला जात संवर्ग निवडावा.
↧
⏭ ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती टाकावी. उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास त्याने/तिने आधारकरिता नोंदणी करून त्यांचा आधार नोंदणी क्रमांक द्यावा.
↧
⏭ उमेदवारांना अपंग आणि इतर आरक्षणांचा पर्याय पण दिलेला आहे. मदतनीसाची निकड असल्यास उमेदवार तत्संबंधी पण अर्ज करू शकतो. उमेदवारांनी संबंधित घोषणापत्राचा नमुना नोंदणी नियम व सूचनापत्र tab मध्ये पाहावा (तुमच्या अपंगत्वाचे प्रमाण ४०% व त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला शुल्कातून सवलत आणि मदतनीसाचा पर्याय मिळेल.)
↧
⏭ उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे किंवा सीमाप्रांतातील ८६५ वादग्रस्त गावांतील रहिवासी आहे हे आधी घोषित करावे लागेल.
↧
⏭ शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपापली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. बाराबी आणि दहावीची माहिती अनिवार्य आहे. परिक्षेची पदवी कुठून मिळाली, मिळालेले गुण, कमाल गुण, उत्तीर्ण झालेले साल, विद्यापीठाचे नाव इ. माहिती सुद्धा टाकली जावी. त्यानुसार टक्केवारी काढली जाईल.
↧
⏭ एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केले की अर्जदारास पुढे या बटणावर क्लिक करावे लागेल , त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदारांकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
↧
⏭ त्यानंतरचा अर्ज प्रत्येक विभागानुसार आवश्यक त्या माहितीनुसार भरून घेतला जाईल. उमेदवाराला त्यानुसार माहिती द्यावी लागेल.
↧
⏭ व्यावसायिक शिक्षणाबाबत उमेदवाराला त्याच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती द्यावी लागेल. बारावी, दहावीसह संबंधित एक व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार टीएआयटी परिक्षेसाठी पात्र असतील.
↧
⏭ पुढे जाण्यासाठी अर्जदाराला परीक्षा दाखवा ऑप्शन्सवर क्लिक करावे लागेल. पुढे अर्जदाराने अर्ज करण्यासाठी "शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी - 2017" हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर त्यास प्रोसिड या बटनावर क्लिक करावे लागेल.
↧
⏭ प्राथमिक पदांकरिता किंवा माध्यमिक आणि प्राथमिक अशा दोन्ही पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार टीइटी परिक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. उमेदवाराने टीइटी परिक्षेची आसन क्रमांक, उत्तीर्ण झालेले वर्ष, मिळालेले गुण, कमाल गुण इत्यादी माहिती नोंदणी करताना द्यावी लागेल.
↧
⏭ उमेदवाराने परिक्षेचे हवे असलेले माध्यम निवडले पाहिजे उदाः मराठी, इंग्रजी आणि उर्दू.
↧
⏭ एकदा उमेदवाराने त्याचा प्रोफाईल तयार केला की, त्याला त्याने निवडलेल्या परिक्षेनुसार आणि तो शुल्क भरू शकेल त्या पदासाठी आवश्यक ती माहिती सविस्तर स्वरूपात मागितली जाईल.
↧
⏭ उमेदवार त्याच्या/तिच्या सोईनुसार परिक्षेचा जिल्हा निवडू शकतो/शकते. उमेदवार दिलेल्या यादीतून तीन पर्याय निवडू शकतो आणि शक्यतो सर्वांनाच त्यांच्या पहिल्या पसंतीचा पर्याय मिळावा असा प्रयत्न केला जाईल.
↧
⏭ अर्ज सर्वथा पूर्ण झाला की, उमेदवाराने त्याच्या राखीव/खुल्या प्रवर्गाच्या निकषांप्रमाणे शुल्क भरणा करावा.
↧
⏭ उमेदवाराची भरणा माहिती (उदाः व्यवहाराचा क्रमांक, व्यवहाराचा दिनांक, व्यवहाराची रक्कम) नोंदणी अर्जाच्या प्रिव्ह्यू मध्ये दिलेली असेल.
↧
⏭ उमेदवाराने त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून अर्ज दाखल करावा. सबमिट बटणावर क्लिक केल्याने उमेदवाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
↧
⏭ उमेदवार त्याचा/तिचा अर्ज सेव्ह करू शकतो किंवा त्याची प्रिंटआऊट घेऊ शकतो ज्यामध्ये त्याच्या/तिच्या नोंदणीची सविस्तर माहिती असेल.
✍️ धन्यवाद !
No comments:
Post a Comment