Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, October 2, 2017

    चालू घडामोडी २ ऑक्टोबर २०१७ [ text]

    Views
    🔹ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं निधन

    प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं 1 ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि प्रेक्षक-समीक्षकांची दाद मिळवलेलं 'दोन स्पेशल' हे नाटक हमोंच्याच 'न्यूज स्टोरी' या कथेवर आधारित आहे.

    १९७०च्या सुमारास ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ आणि ‘काळेशार पाणी’ या दोन लघु कादंबऱ्यांमुळे लेखक म्हणून वाचकांसमोर आलेले ह. मो. मराठे बघता-बघता वाचकांचे लाडके 'हमो' होऊन गेले होते. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अत्यंत साध्या-सोप्या शैलीत त्यांनी महानगरातील औद्योगिक जीवन रेखाटलं, त्यावर मार्मिक भाष्य केलं.

    पाच वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या ८६व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ह मो मराठे यांनी अर्ज भरला होता. त्यावेळी एका जुन्या लेखामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अध्यक्षपदासाठी प्रचार करताना दोन जातींमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे लेखन केल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या आरोपावरून मराठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यानंतर हमोंनी आपली भूमिका स्पष्ट करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

    विचार:
    'माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातींत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे', असं निवेदन त्यांनी केलं होतं.


    🔹क्रीडा पुरस्कार २०१७ :

    ▪️ राजीव गांधी खेलरत्न – २०१७

    • देवेंद्र झाजरिया, पॅरा एथलिट
    • सरदार सिंह, हॉकी

    ▪️अर्जुन पुरस्कार – २०१७

    • चेतेश्वर पुजारा, क्रिकेट
    • हरमनप्रीत कौर, क्रिकेट
    • व्ही. जे. सुरेखा, तिरंदाज
    • खुशबीर कौर, अॅथलेटिक्स
    • अरोकिया राजीव, अॅथलेटिक्स
    • प्रशांती सिंह, बास्केट बॉल
    • सुभेदार लैशराज देबोंद्रो सिंह, बॉक्सिंग
    • ओइनम बेम्बम देवी, फूटबॉल
    • एस. एस. पी. चौरसिया, गोल्फ
    • एस. व्ही. सुनील, हॉकी
    • जसवीर सिंह, कबड्डी
    • पी. एन. प्रकाश, नेमबाज
    • ए. अमलराज, टेबल टेनिस
    • साकेत मिनेनी, टेनिस
    • सत्यवर्त कादियान, कुस्ती
    • मरियप्पन, पॅरा अॅथलिट
    • वरुण सिंह भाटी, पॅरा अॅथलिट

    ▪️ द्रोणाचार्य पुरस्कार – २०१७

    • स्‍व. डॉ. आर. गांधी, अॅथलेटिक्‍स
    • हिरानंद कटारिया, कबड्डी
    • जी. एस. एस. व्ही. प्रसाद, बॅडमिंटन
    • ब्रिज भूषण मोहंती, बॉक्सिंग
    • पी. ए. राफेल, हॉकी
    • संजॉय चक्रवर्ती, नेमबाजी
    • रोशन लाल, कुस्ती

    ▪️ ध्यानचंद पुरस्कार – २०१७

    • भूपेंद्र सिंह, अॅथलेटिक्स
    • सय्यद शाहीद हकीम, फूटबॉल
    • सुमाराई टेटे, हॉकी .

    No comments:

    Post a Comment