Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, October 26, 2017

    दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?

    Views
    दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?

    नळाचे पाणी कधी कधी खूपच खराब दिसते. गढुळ पाणी पिण्यास अयोग्य असते, हे कोणीही सांगेल; पण वरून स्वच्छ दिसणारे पाणीही पिण्यास योग्य असेलच असे नाही. साध्या डोळ्यांनी न दिसणारे असंख्य जिवाणू व विषाणू तसेच परजीवी त्यात असू शकतात. काही रासायनिक पदार्थ असल्यामुळे किंवा किरणोत्सर्गी पदार्थांमुळेही पाणी दूषित होऊ शकते. रासायनिक पदार्थ कोणता आहे त्यावर रोगाची लक्षणे अवलंबून राहतील. पाण्यात जिवाणू असतील तर ते पाणी पिण्याने टायफॉइड, कॉलरा, हगवण असे रोग होऊ शकतात. विषाणूंमुळे कावीळ, पोलिअो यांसारखे रोग होतात. परजीवी जंतूंमुळे अमिबा व जिआर्डीया यांची लागण होते. गोल कृमी, अंकुश कृमी, तंतु कृमी इत्यादींची लागण त्या जंतुंची अंडी पाण्यात असतील तर होते. पाण्यात सायक्लोप्स नावाचे कीटक असल्यास नारू हा रोग होऊ शकेल, तर गोगलगायीमुळे शिस्टोसोमीयासीस हा रोग होईल.
    दूषित पाण्यामुळे असे अनेक रोग होतात. नुसते पाहून पाणी चांगले की वाईट ते कळत नाही. त्यामुळे पिण्याच्या आधी ते शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी हेच चांगले. पाण्यात तुरटी फिरवणे, गाळणे, उकळून गार करणे या उपायांनी जंतूंचा नाश होतो. क्लोरीनच्या गोळ्या व द्रावण वापरून सुद्धा पाणी शुद्ध करता येते. ही पाण्याच्या शुद्धीकरणाची स्वस्त व परिणामकारक अशी पद्धत आहे. पाणीच बाबतीत 'दिसते तसे नसते, म्हणून जग त्याला फसते' ही म्हण अगदी सार्थ ठरते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास प्रदूषित पाण्यापासून होणाऱ्या रोगांना आपण सहजपणे प्रतिबंध करू शकतो.

    डॉ. जगन्नाथ दीक्षित

    No comments:

    Post a Comment