कुतूहल
भासमान तारकीय प्रत
(काॅपी-पेस्ट, दै लोकसत्ता)
ताऱ्यांचा अभ्यास करताना त्यांची तेजस्विता ठरविणे म्हणजे तिचे मापन करणे आवश्यक असते. परंतु विश्वात अतिफिक्या ताऱ्यांपासून ते अतितेजस्वी ताऱ्यांपर्यंत असे वेगवेगळ्या तेजस्वितेचे अब्जावधी तारे अस्तित्वात आहेत. त्यामुळे हे मापन अवघड बनलेले आहे.
यावरही शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला असून यासाठी त्यांनी लॉगॅरिदमिक श्रेणीचा वापर केला आहे. या श्रेणीत तेजस्विता ‘भासमान तारकीय प्रत’ या शब्दांत व्यक्त केली जाते. या श्रेणीचे वैशिष्टय़ म्हणजे ती सापेक्ष पद्धतीची आहे. म्हणजे अभिजित (Vega) नावाच्या ताऱ्याची प्रत शून्य आहे, असे मानून इतर ताऱ्यांची प्रत ठरविली जाते. (प्रत शून्य आहे याचा अर्थ अभिजितची तेजस्विता शून्य आहे असे नाही, ही गोष्ट अगदी उघडच आहे.) जे तारे अभिजितपेक्षा फिके आहेत त्यांची प्रत धन (positive) चिन्हाने दाखविली जाते, तर जे तारे अभिजितपेक्षा अधिक तेजस्वी आहेत त्यांची प्रत ऋण (negative) चिन्हाने दाखविली जाते. तारकीय प्रत श्रेणीनुसार दोन ताऱ्यांपकी जो तारा अधिक तेजस्वी दिसत असेल त्याची प्रत कमी असते.
तारकीय प्रत ही सापेक्ष श्रेणी असल्याने तिला कोणतेही एकक नसते.
सूर्याची तारकीय प्रत (-२६.७२ ) इतकी आहे. आकाशात नेहमी उत्तरेलाच दिसणाऱ्या ध्रुवाची तारकीय प्रत आहे(+१.९७).
उत्तर गोलार्धातून दिसणाऱ्या सर्वात तेजस्वी ताऱ्याची म्हणजे व्याधाची प्रत आहे (-१.४६).
निरोगी डोळे असलेली व्यक्ती साधारणपणे (+६) एवढय़ा प्रतीपर्यंतचे तारे कोणत्याही साधनाशिवाय पाहू शकते. काही प्रसिद्ध ताऱ्यांच्या प्रती अशा आहेत :
स्वाती (-०.०४ ), रोहिणी (+०.८५),
चित्रा (+०.९८) इ. याचा अर्थ असा की, स्वातीचा तारा रोहिणीपेक्षा अधिक तेजस्वी आहे; तर रोहिणी चित्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे.
तारकीय प्रतीची ही संकल्पना आकाशातील इतर वस्तूंच्या तेजस्वितेसाठी ही वापरली जाते. उदा. पौर्णिमेच्या चंद्राची (सरासरी) प्रत (-१२.७४) इतकी आहे. या पद्धतीने आकडेमोड केली तर सूर्य चंद्रापेक्षा सुमारे ४ लक्ष पट तेजस्वी आहे, असे उत्तर मिळते. चंद्राप्रमाणे ग्रहांचीही प्रत ठरविता येते.
– डॉ. गिरीश पिंपळे

No comments:
Post a Comment