Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, September 15, 2017

    "दुरदर्शन"...!

    Views
    "दुरदर्शन"...!


    आज १५ सप्टेंबर...! आजच्या दिवशी १९५९ साली भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे...! पु.लं.नीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य झाले....!

    म्हणून दुरचे दर्शन जवळ आहे, अशी ज्याची महती गायली जाते ते म्हणजे दूरदर्शन: दुरचे दर्शन... विद्येचे वैभव आणि मनोरंजनाची खैरात... यामुळे दुरदर्शनला मोठेपणा प्राप्त होतो. मग दुरदर्शन किती दूर किती जवळ असा तुलनात्मक प्रश्न का निर्माण व्हावा. खरं आहे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. दुरदर्शन मुळे दहा दिशांचे तट कोसळले, ध्रूव दोन्ही जवळ आले, आम्ही जगाच्या अगदी जवळ आलो घरबसल्या विश्वातील घडामोडींचे दर्शन घडविणारी दिव्यदृष्टी मिळाली.

    भारतीय माध्यमातील इलेक्ट्रॉनिक युगाची सुरूवात दूरदर्शनमुळे झाली. आज दूरदर्शनचा ५८ वा वाढदिवस.! आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा हे माध्यम अवतरलं. त्यामुळे ५८ वर्षापूर्वी दूरदर्शनची किती नवलाई असेल याची कल्पनाही करणं कठीणच आहे. दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरूवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरलाय. प्रत्येक राज्यासाठी दूरदर्शनने स्वतंत्र प्रादेशिक वाहिनी दिली.

    १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते.

    दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक (नेटर्वक) जाळे आहे. डीडी -१ ही वाहिनी १०४२ प्रादेशिक ट्रान्समिटर्स पर्यंत याचे जाळे पसरले आहे. देशात ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१ चे कार्यक्रम पोहेचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समिटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इन्सॅट) वर अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे. देशात ४९ शहरांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती केंद्र कार्यरत आहेत. दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले.

    दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. या बरोबरच राष्ट्रीय प्रसारणास सुरुवात. रंगीत दूरदर्शनचे युगही याचवेळी सुरु झाले.

    १९५५ साली दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणी च्या वास्तूत उभारल्या गेलेल्या दूरदर्शन केंदाने निर्मिलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले ते १५ सप्टेंबर १९५९ रोजी. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी दूरदर्शन असे नाव सुचवले होते. पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी जो एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता, त्यात पपेट शो, वैजयंती माला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणा-या घटकांचा अंतर्भाव होता. १९६५ पासून दूरदर्शनच्या कार्यक्रमांचे नियमित प्रक्षेपण सुरू झाले.

    आज "प्रसार भारती" या संस्थेच्या अखत्यारीत असलेले दूरदर्शन त्यावेळी ऑल इंडिया रेडिओचाच एक भाग होते. १९७२ साली दूरदर्शनचे मुंबई केंद्र सुरू झाले. पहिली काही वर्ष महाराष्ट्रात मुंबई-पुण्यातच कार्यक्रम दिसत. त्याचा पसारा ख-या अर्थाने वाढला तो १९८२ साली देशात झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमुळे..!! तेव्हा दूरदर्शन खेड्यापाड्यात पोचले. सुरुवातीला या माध्यमाला अनेकांनी विरोध केला. लोकांना टीव्हीची नाही तर भाकरीची गरज आहे, असे म्हणणारे पुष्कळ होते. पण गमंतीची गोष्ट अशी की लोकांनीच हे म्हणणे खोटे पाडले. ज्या खेड्यांत वीज नव्हती तिथे ती आल्यावर अनेकांनी पहिल्यांदा दूरदर्शन संच विकत घेतले.

    रामानंद सागर यांच्या 'रामायण', 'हमलोग', 'बुनियाद' यासारख्या हिंदी मालिका, 'छायागीत', 'चित्रहार' असे गाण्यांचे कार्यक्रम, प्रादेशिक चित्रपट तसेच मराठीतील 'प्रतिभा आणि प्रतिमा', 'शरदाचं चांदणं', 'गजरा' यांनी लोकांची मनोरंजनाची भूक चांगल्या अर्थाने भागवली. आज मात्र खाजगी वाहिन्यांच्या स्पर्धेत दूरदर्शन मागे पडले आहे. त्याचे सरकारीपण पूर्णतया पुसले जात नाही. प्रसार भारतीला अजूनही संपूर्ण स्वायत्तता दिली जात नाही. दूरदर्शनच्या इतिहासाची पाने चाळताना सध्याच्या परिस्थिती बरोबरही नकळत तूलना होते. तेव्हा दूरदर्शनने जपलेला प्रबोधनाचा वारसा इतर वाहिन्यांवर दिसून येत नाही. मात्र असे असूनही दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग आधीच्या तूलनेत बराच कमी झालाय, हे ही तेवढंच खरं आहे. खाजगी वाहिन्यांच्या आक्रमणात "दुरदर्शन" चे नाव हळुहळु मागे पडत चालले आहे. भारतात टेलिव्हिजन युगाचा प्रारंभ करणा-या "दुरदर्शन" ला गरज आहे ती ऊत्तमोत्तम, दर्जेदार कार्यक्रमाची आणि किमान थोड्या प्रमाणावर स्वातंत्र्याची...प्रेक्षकांची "चव" आता बदलली आहे, बदलत्या चवी बरोबरच आपले रंगरूप "दुरदर्शन" ने बदलण्याची गरज आहे.

    दूरदर्शनच्या इतिहासाची पाने चाळताना सध्याच्या परिस्थिती बरोबरही नकळत तूलना होते. तेव्हा दूरदर्शनने जपलेला प्रबोधनाचा वारसा इतर वाहिन्यांवर दिसून येत नाही. मात्र असे असूनही दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग आधीच्या तूलनेत बराच कमी झालाय, हे ही तेवढंच खरं आहे. बदाम, काजू गोड लागत नसले तरी शरीरासाठी आरोग्यवर्धक आहेत. तर मिठाई कितीही आकर्षक आणि गोड असली तरी तिच्यामुळे शेवटी शरीराचे नुकसानच होणार आहे. सध्या प्रेक्षकांचंही तसंच झालं आहे. प्रेक्षक दूरदर्शनच्या बदामापेक्षा खाजगी वाहिन्यांच्या मिठाईकडे मोठ्या प्रमाणात ओढला गेलाय.

    दूरदर्शनवर अर्ध्या तासाचा चित्रहार असायचा, दर शनिवारी अर्ध्या तासाचा कार्टूनचा कार्यक्रम असायचा, आठवड्यातून एक हिंदी आणि एक मराठी सिनेमा प्रसारीत केला जायचा, ठराविक वेळीच अर्ध्या तासाच्या बातम्या प्रसारीत व्हायच्या मात्र आता वरील प्रत्येक कार्यक्रमासाठी डझनावारी २४ तासांच्या वाहिन्या सुरू झाल्या आहेत. सुमारे वीस वर्षापूर्वी सर्व कुटुंब एकत्रितपणे दूरदर्शनचे कार्यक्रम बघायचे. मात्र आता दूरदर्शनप्रमाणे इतर कोणत्याही वाहिन्यांवरील कार्यक्रम आपण सहकुटुंब पाहू शकतो काय ? मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरातच दूरदर्शनचं कार्याचं उत्तर सामावलंय .

    No comments:

    Post a Comment