मराठी व्याकरण माला
1) मराठी शब्दातील शेवटचे अक्षर हे
मूळ अक्षर असताना त्याआधीच्या अक्षराला उकार लिहावा लागला तर
तो नेहमी दुसरा लिहावा.
उदा...जांभूळ, लाकूड , शेपूट, कापूस,
मूळ अक्षर असताना त्याआधीच्या अक्षराला उकार लिहावा लागला तर
तो नेहमी दुसरा लिहावा.
उदा...जांभूळ, लाकूड , शेपूट, कापूस,
2) मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला काना असेल आणि त्याआधीच्या अक्षराला उकार लिहावा लागला तर तो नेहमी पहिला लिहावा.
उदा...काटकुळा ,नमुना , पाहुणा , बुवा , भुगा.
अपवाद-अनसूया, केशभूषा, मंजूषा, वेशभूषा.
3) मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी असेल आणि त्याआधीच्या अक्षराला उकार लिहावा लागला तर तो नेहमी पहिला लिहावा.
उदा...केरसुणी, सदाफुली, खुशी, पुरी, मेहुणी.
अपवाद- भूमी, मूर्ती , रणाभूमी, सूची,.
4) मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला दुसरा उकार असेल आणि त्याआधीच्या अक्षराला उकार लिहावा लागला तर तो नेहमी पहिला लिहावा.
उदा.....घुसू, चुकू, पुसू,
उदा.....घुसू, चुकू, पुसू,