विभाज्यतेच्या कसोट्या
| संख्या | कसोटी |
| २ ची कसोटी | ज्या संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असतो, त्या संख्येला २ ने नि:शेष भाग जातो. |
| ३ ची कसोटी | ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग जातो त्या पूर्ण संख्येला ३ ने नि:शेष भाग जातो. |
| ४ ची कसोटी | ज्या संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जातो त्या पूर्ण संख्येला ४ ने नि:शेष भाग जातो. |
| ५ ची कसोटी | ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५ असतो त्या पूर्ण संख्येला ५ ने नि:शेष भाग जातो. |
| ६ ची कसोटी | ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातो. |
| ७ ची कसोटी | संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्या संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो. |
| ८ ची कसोटी | संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेष भाग जात असल्यास अथवा संख्येत शेवटी कमीतकमी ३ शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो. |
| ९ ची कसोटी | संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ९ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ९ ने भाग जातो. |
| ११ ची कसोटी | ज्या संख्येच्या विषम स्थानच्या या समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्या पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भाग जातो. |
| १२ ची कसोटी | ज्या संख्येला ३ व ४ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्येला १२ ने नि:शेष भाग जातो. |
| १५ ची कसोटी | ज्या संख्येला ३ व ५ अंकानी नि:शेष भाग जातो त्या संख्येला १५ ने नि:शेष भाग जातो. |