Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, August 19, 2017

    चालू घडामोडी : १७ ऑगस्ट

    Views

    चालू घडामोडी : १७ ऑगस्ट

    अमेरिकेकडून हिज्बुल दहशतवादी संघटना घोषित

    • काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत केला आहे.

    • त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे.

    • दहशतवादी संघटनांच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे धक्का बसला आहे.  

    • अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे अमेरिकेतील संघटनेच्या सर्व संपत्तीवर टाच
    येणार आहे.

    • तसेच या दहशतवादी संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येऊ नयेत, असे निर्देश अमेरिकी नागरिकांना देण्यात येतील.

    • त्यामुळे हिज्बुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय या दहशतवादी संघटनेत कोणालाही सामीलदेखील होता येणार नाही.

    • यापूर्वी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.

    १९८९मध्ये स्थापन झालेली हिज्बुल मुजाहिद्दीनचा ही दहशतवादी संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करते आहे.

    • या संघटनेने एप्रिल २०१४मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यात १७ लोक जखमी झाले होते.

    मलालाला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश

    • पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती
    मलाला युसुफजाईला ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची संधी
    मिळाली आहे.

    • ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत मलाला युसुफजाई
    तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहे.

    • मलाला युसुफजाई हिच्यावर ऑक्टोबर २०१२मध्ये पाकिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता.

    • त्यावेळी तिच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर तिला तत्काळ उपचारासाठी ब्रिटन येथे हलविण्यात आले होते.

    • त्यानंतर या परिस्थितीतून मलाला पूर्ण बरी झाली. त्यानंतर तिने  ब्रिटनमध्येच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. 

    • मलाला यूसुफजाईला २०१४मध्ये भारताचे कैलास सत्यार्थी यांच्याबरोबर संयुक्तरित्या शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

    • त्यावेळी मलाला अवघ्या १७ वर्षांची होती.
    नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी ती सर्वांत कमी वयाची विजेता होती.

    एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

    • सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असल्याचे फोर्ब्स मॅगझिनने घोषीत केले आहे.

    • एमा स्टोन या २८ वर्षीय अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १६६.४ कोटी रूपये कमावले
    आहेत. 

    • 'ला ला लॅंड' या सिनेमात केलेल्या तगड्या अभिनयाचे बक्षीस म्हणून तिला ऑस्करकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

    लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला
    होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती.

    • या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा नंबर लागतो. जेनिफर एनिस्टनने गेल्या वर्षात २.५५ कोटी डॉलरची कमाई केली आहे.

    • प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे.

    •गेल्या दोन वर्षांपासून या यादीत प्रथम स्थानी असलेली जेनिफर लॉरेन्स यावर्षी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

    🌞वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना आपले हे पोस्ट नक्की शेअर करा.

    No comments:

    Post a Comment