Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, July 12, 2017

    इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ वी विद्यार्थी प्रमोशन सुविधा व सदर प्रमोशन पूर्ण करावयाचे वेळापत्रक उपलब्ध करून दिल्याबाबत

    Views

    __________________________________________
    ➡ *इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ वी विद्यार्थी प्रमोशन सुविधा व सदर प्रमोशन पूर्ण करावयाचे वेळापत्रक उपलब्ध करून दिल्याबाबत* __________________________________________

    *सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की,दरवर्षीप्रमाणे सरल student पोर्टल मध्ये करावयाचे student प्रमोशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या सुविधेचा उपयोग करून मागील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातून पुढील २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी सध्या ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गात प्रमोट करून घ्यावेत.या वर्षांची संच मान्यता शासनाने दिलेल्या नियोजित तारखेला होणार असल्याने student प्रमोशन चे काम सर्वांनी प्राधान्याने पूर्ण करावयाचे आहे.*

    ⌛ *आपल्या शाळेचे student प्रमोशन चे काम पूर्ण करावयाची अंतिम मुदत पुढील प्रमाणे.*

    इयत्ता १ ते ८ वी (सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम)

        ➡ *दिनांक : १५/०७/२०१७*

    इयत्ता ९ वी  (सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम)

         ➡ *दिनांक : १७/०७/२०१७*

    इयत्ता ११ वी (सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम)

         ➡ *दिनांक : १९/०७/२०१७*

    *टीप:* *१)*इयत्ता १ ते ८ वी आणि इयत्ता ९ वी प्रमोशन ची सुविधा student पोर्टल च्या मुख्याध्यापक लॉगिन ला यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. *इयत्ता ११ वी विद्यार्थी प्रमोशन सुविधा ही आजपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.*इयत्ता १० वी व १२ वी विद्यार्थी प्रमोशन सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    *२)* इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करण्यापूर्वी इयत्ता ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन केले तर काही समस्या निर्माण होईल का अशी शंका येत असेल तर कृपया काळजी करू नये.आपण *मागील शैक्षणिक वर्षातून पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याचे प्रमोशन करत असल्याने* आपणास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही हे लक्षात घ्यावे.

    *विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे याविषयीचे सविस्तर मॅन्युअल संकेत स्थळावर व आमच्या* pradeepbhosale.blogspot.in *या ब्लॉग वर Download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.*

    ✏ *इयत्ता १ ली ते ८ वी व इयत्ता ९ वी च्या वर्गाचे प्रमोशन करण्यासाठीचे  मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

           *लिंक:* goo.gl/whzgQG

    ✏ *प्रमोशन प्रोसेस कशी करावी ? याबाबत सविस्तर नियमावली काय आहे? प्रमोशन करताना आपणास कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात व त्या अडचणी येऊ नये म्हणून प्रमोशन करण्याची योग्य प्रोसेस काय आहे हे सविस्तर समजून घेण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा*

                इयत्ता १ ली ते ८ वी साठी

        ➡ *लिंक:* goo.gl/9YW45B

                    इयतत ९ वी साठी

       ➡ *लिंक:* goo.gl/nP855X


      सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी या सुविधेचा उपयोग करून विनाविलंब आपल्या शाळेतील सर्व मुलांचे प्रमोशन पूर्ण करून घ्यावे.अंतिम मुदतीच्या काळात संकेतस्थळावर लोड येऊन ते बंद होण्याचा अनुभव लक्षात घेता आपले काम राहून जाणार नाही यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित सदर प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे हे लक्षात घ्यावे.

    *आपल्या कार्यक्षेत्रातील किती शाळांनी प्रमोशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे या बाबतचा रिपोर्ट केंद्रप्रमुख,गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी व इतर सर्व वरिष्ठ लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी दिलेल्या मुदतीमध्ये ही कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकारी यांनी प्राधान्याने लक्ष देऊन सर्व शाळांचे प्रमोशन पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.*

    ➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                                   *लिंक*
                            *goo.gl/j9nFGk*

    अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

    *धन्यवाद*
    *प्रदीप भोसले*
    *हवेली,पुणे*
    Mobile no. :9404683229
    *(Dont call,only whatsapp message)*
    Email: egov.saral@gmail.com

     ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी._