Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 31, 2017

    सध्या ‘वंदे मातरम्’ ची सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे!

    Views
    सध्या ‘वंदे मातरम्’ ची सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे! ही अर्थातच चांगली गोष्ट आहे, कारण वंदे मातरम हे आपलं ‘राष्ट्रीय गीत’ आहे पण सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या किती मंडळींना वंदे मातरम्चं एक तरी कडवी पाठ आहे ? निदान त्याचा अर्थ तरी माहित आहे का ? कडवी पाठ नसतील तर अर्थ तर लांबची गोष्ट आहे राव…

    १८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. त्यावेळी हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं प्रतिकही.. सर्वजण् वंदे मातरम त्याच जोशात म्हणायचे. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.

    मुळात वंदे मातरम् बंगाली-संस्कृत मिश्रित असल्याने काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं.  म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत वंदे मातरमचा संपूर्ण अर्थ आपल्या मायमराठीत…

    चला तर जाणून घेऊ काय आहे आपल्या राष्ट्रीय गीताचा नेमका अर्थ :

    मूळ वंदे मातरम् !

    वन्दे मातरम्
    सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
    सस्यश्यामलाम् मातरम्।

    शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
    फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
    सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
    सुखदाम् वरदाम् मातरम्‌ ॥ १ ॥
    वन्दे मातरम्‌ ।

    मराठी स्वैर अर्थ :
    हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो.

    शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम !



    Source By : bobhata.com

    No comments:

    Post a Comment